Breking News
‘बाल्यावस्थेतील प्रारंभिक विकास’ विषयावरील कार्यशाळेचे मुख्य सचिव राजेशकुमार अग्रवाल यांच्या हस्ते उद्घाटनराष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त पुण्यात क्रीडा जागृती प्रभातफेरीऔषध निर्मिती कंपनीत नोकरीच्या आमिषाने ४ लाखांची फसवणूकविश्रांतवाडीत कौटुंबिक वादातून मुलाकडून आईचा खूनपुणे जिल्ह्यातही ‘प्लाझ्मा’, ‘लेझर’ झोतांवर बंदीराज्यातील 404 नागरिक सुरक्षित व 338 संपर्कात; प्रवास सुविधा व मदतीचे नियोजन सतर्कतेने करण्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देशहातमाग, स्थानिक कारागिरांसाठी केंद्र सरकारचा पुढाकारबिबवेवाडी परिसरात वैमनस्यातून तरुणावर शस्त्राने वारविवाहविषयक संकेतस्थळावरील ओळख महागातबेकायदा सावकारीतून कोट्यवधींची वसुली; तिघांविरुद्ध गुन्हा

दिवसाढवळ्या डोळ्यात स्प्रे मारून २६ लाखांची रोकड पळवली

दिवसाढवळ्या डोळ्यात स्प्रे मारून २६ लाखांची रोकड पळवली

धनकवडीतील घटना

marathinews24.com

पुणे – शहरात कायदा सुव्यवस्थेबाबत अनेक प्रश्नचिन्ह निर्माण होत असतानाच, दिवसाढवळ्या दुचाकीस्वाराच्या डोळयात स्प्रे मारून चोरट्यांनी तब्बल २६ लाख रूपये असलेली बॅग हिसकावून नेली आहे. ही घटना २५ मे रोजी सकाळी सव्वानउच्या सुमारास धनकवडी पोस्ट कार्यालयाजवळ घडली आहे. याप्रकरणी सहकारनगरात राहणार्‍या ४७ वर्षीय नागरिकाने सहकारनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. त्यानुसार दोघा चोरट्याविरूद्ध गुन्हा दाखल केला आहे.

कॉलसेंटरच्या बहाण्याने ७१ लाखांची फसवणूक; दोघांना अटक – सविस्तर बातमी 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदाराचा चलन बदलाचा व्यवसाय असून, दरदिवशी काही रक्कम ते स्वतः बॅगेत भरून दुचाकीवर प्रवास करत कार्यालयात जात होते. २५ मे रोजी सकाळी सव्वा नउच्या सुमारास तक्रारदार हे २५ लाख ९० हजारांची रोकड बॅगेत भरून दुचाकीवरून जात होते. त्यावेळी धनकवडी पोस्ट कार्यालयाजवळ दुचाकीस्वार दोघा चोरट्यांनी त्यांना अडवून डोळ्यात स्प्रे मारला. त्यानंतर तक्रारदाराच्या हातातील रोकड असलेली बॅग हिसकावून चोरट्यांनी पळ काढला. अवघ्या काही मिनीटात लुटीचा थरार घडल्यामुळे तक्रारदाराला प्रतिकार करता आला नसल्याचे पोलिसांनी सांगितले. दरम्यान, सीसीटीव्ही फुटेजनुसार आरोपींच्या दुचाकीचा क्रमांकानुसार पोलिसांनी तपासाला गती दिली आहे. याप्रकरणी पोलीस उपनिरीक्षक स्वप्नील लोहार तपास करीत आहेत.

औंधमध्ये घरफोडी, ७ लाखांची रोकड चोरीला

फ्लॅटचे कुलूप तोडून आतमध्ये प्रवेश करीत चोरट्यांनी तीन लाखांची रोकड आणि सोन्या-चांदीचे दागिने असा ७ लाख २५ हजारांचा ऐवज चोरून नेला आहे. ही घटना १३ ते २३ मे कालावधीत औंधमधील सिद्धार्थनगरात घडली आहे. याप्रकरणी नलिनी कुमार (वय ६९, रा. औंध ) यांनी चतुःशृंगी पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. त्यानुसार अज्ञात चोरट्याविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार नलिनी कुमार औंधमधील सिद्धार्थनगरात राहायला असून, १३ ते २३ मे कालावधीत त्या बाहेर गेल्या होत्या. त्यावेळी चोरट्यांनी त्यांच्या बंद फ्लॅटचे कुलूप तोडून कपाटातील ३ लाखांची रोकड, सोन्या-चांदीचे दागिने असा सव्वा सात लाखांचा ऐजव चोरून नेला. दरम्यान, घरी आल्यानंतर महिलेला चोरी झाल्याचे दिसून आले. त्यानंतर त्यांनी पोलीस ठाण्यात धाव घेतली. याप्रकरणी सहायक पोलीस निरीक्षक अनिकेत पोटे तपास करीत आहेत.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×