Breking News
Pimpri Chinchwad LokSamvad : पिंपरी-चिंचवड महोत्सवातील लोकसंवाद उपक्रमMedicine Safety Law : औषध सुरक्षा कायदा, रुग्णालयीन बिलांचे ऑडिट कराNavale Bridge Accident : नवले पुलाजवळ पुन्हा अपघात; कंटनेरच्या धडकेत तरुणाचा मृत्यूShubhangi Garad Suicide Case : शुभांगी गरड आत्महत्याप्रकरणाची सखोल चौकशी करा : डॉ. नीलम गोऱ्हेMorya Gosavi Palkhi : ‘दगडूशेठ’ गणपती उत्सवमंडपात श्री मोरया गोसावी पालखी सोहळ्याचे स्वागतSeva Sankalp Abhiyan Pune : ‘सेवा संकल्प अभियान’ लोकाभिमुख पद्धतीने राबवून पात्र नागरिकांना योजनांचा थेट लाभ द्या-जिल्हाधिकारी जितेंद्र डुडीE-Pik Pahani : शेतकऱ्यांनी ई-पिक पाहणी पूर्ण करावी : तहसीलदार स्वप्निल रावडेPune Crime News : पुणे रेल्वे स्थानकाच्या आवारात प्रवाशाला लुटलेTractor Accident : ट्रॅक्टरच्या चाकाखाली सापडून मुलीचा मृत्यूGaneshotsav 2026 : ‘बाप्पा डॉट ऑर्ग’वर गणेशोत्सवातील पाच वैशिष्ट्यपूर्ण कथांची निवड, त्यात पुण्यातला एक

कॉलसेंटरच्या बहाण्याने ७१ लाखांची फसवणूक; दोघांना अटक

क्रेडीट कार्डची बतावणी, जेष्ठाला ६ लाखांचा गंडा

खराडी पोलिसांनी अहमदाबाद येथून दोघांना केली अटक

marathinews24.com

पुणे – फुड डिलेव्हीरी व कार रेंटल प्रोजेक्टचे कॉल सेंटर चालू करून देण्याच्या बहाण्याने व्यवसायिक तरुणाची ७१ लाखांची फसवणूक केली आहे. याप्रकरणी खराडी पोलिसांनी अहमदाबाद येथून खुशी कौशल परमार उर्फ सान्वी शहा (वय.23), तुषार महेश कुमार तलपाडा उर्फ तुषार पटेल (वय. 32, दोघे रा. गुजरात) यांना अटक केली आहे. तर कशिश शर्मा ऊर्फ श्रृती उर्फ रचना रमेश खुराणा, एरीका स्मीथ, जसप्रित कौर, पार्शिव सिंग उर्फ सिद्धार्थ उर्फ राहूल शर्मा यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. याबाबत वाघोलीतील तरुणाने फिर्याद दिली आहे. ही टोळी भासविण्यासाठी इंटरनॅशनल मोबाईल क्रमांकाचा वापर करून दुबईतून कॉल केल्याचे भासवित होती. मात्र प्रत्यक्षात ते अहमदाबाद येथून कॉल करत होते.

हांडेवाडीत अवैध हातभट्टी दारूविक्री रडारवर – सविस्तर बातमी 

तरुणाची एक कंपनी असून, ही कंपनी ऑनलाईन फुड डिलेव्हरी प्लॅटफार्मला ग्राहक सेवा देण्याचे काम करते. जानेवारी महिन्यात सोशलमिडीयावर तरुणाला आरोपींच्या सीट्रीक्स प्रोजेक्ट डेव्हलपमेंट कन्सलटंटं या कंपनीची माहिती मिळाली होती. तरुणाने त्यांच्यासोबत संपर्क केला तेव्हा त्याला सांगितले ही कंपनी दुबईस्थित असून, विविध प्रोजेक्टवर काम करते. त्यातील तरुणाने फुड डिलेव्हरी प्लॅटफॉर्म आणि कार रेंटल हा प्रोजेक्ट निवडला. आरोपींनी तरुणाला दुबई येथे बोलावून घेतले. त्याला कंपन्यांची माहिती देऊन डिपॉजिट व इतर कारणे सांगून पैसे भरून घेतले. एवढेच नाही तर तरुणाकडून पुण्यात ४५ लोकं बसतील एवढे ऑफिस तयार करून घेतले. त्यासाठी तरुणाने ४१ लाख रुपये खर्च केला. एकेदिवशी दिया भट नावाच्या त्याच कंपनीत काम करणाऱ्या तरूणीने तरुणाला फोन करून सांगितले, की अशी कोणतीच दुबईची कंपनी नाही. तुझी फसवणूक झाली आहे. हे सर्व कॉल तुला अहमदाबाद येथील प्रमोटप एचआर सोल्युशन अहमदाबाद या कंपनीतील लोकांनी केल्याचे सांगितले. तरुण अहमदाबाद येथे गेला. त्यावेळी त्याला फसवणूक झाल्याचे समजले. त्याने याबाबत खराडी पोलिस ठाण्यात तक्रार दिली होती.

पोलिसांनी गुन्हा दाखल करून दोघा आरोपींनी अटक केली आहे. ही कामगिरी वरिष्ठ पोलिस निरीक्षक संजय चव्हाण, पोलिस उपनिरीक्षक राहुल कोळपे, पोलिस हवालदार सुरेंद्र साबळे, अशोक केदारी यांच्या पथकाने केली. दरम्यान, फसवणूकीची व्यप्ती देश-परदेशापर्यंत
या टोळीने देशातील अनेक व्यवसायिकांना आर्थिक गंडा घातल्याचा संशय आहे. पुण्यात सुद्धा अनेकजण या टोळीच्या ट्रॅपमध्ये अडकल्याचा अंदाज आहे. ही टोळी देशभरासह बाहेरच्या व्यावसायिकांना आर्थिक गंडा घातल होती. खराडी पोलिस त्या दृष्टीने तपास करत आहेत.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×