Breking News
पुण्यातील टेकड्यांच्या संरक्षणासाठी मंजूर 26 कोटींचा निधी वापरात नाहीपोलीस तक्रार केल्याच्या रागातून तरुणावर केला गोळीबारमहाराष्ट्र हे उद्योगांना प्रोत्साहन देणारे राज्य – उद्योग मंत्री उदय सामंतस्वारगेट एसटी स्थानकात प्रवाशांचे दागिने चोरणार्‍या महिलेला अटकपुण्यात तब्बल १ कोटी १३ लाखांवर गुटखा, सिगारेट जप्तशासकीय संस्थांकरिता पाण्याच्या टाक्यांचे वितरणक्रेडीट कार्ड योजनेच्या नावाखाली जेष्ठाची १० लाखांची फसवणूकथेउर फाटा परिसरात वाहनाच्या धडकेत पादचारी ठारजबरी चोरीप्रकरणी ५ महिन्यांपासून फरार आरोपीला बेड्याजादा परताव्याचे आमिष पडले ३६ लाखांना

रायगडच्या रोहा एमआयडीसीत ‘सीट्रिपल आयटी’ मंजूर

रायगडच्या रोहा एमआयडीसीत ‘सीट्रिपल आयटी’ मंजूर

उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या पुढाकार यशस्वी

marathinews24.com

मुंबई– राज्यातील बीड, नांदेड, छत्रपती संभाजीनगरनंतर आता रायगड जिल्ह्यासाठी 105 कोटी खर्चाचे ‘सेंटर फॉर इन्व्हेंशन, इनोव्हेशन, इक्युबेशन अँन्ड ट्रेनींग’ अर्थात ‘सीट्रिपलआयटी’ मंजूर झाले आहेत. ‘टाटा टेक्नॉलॉजी’ कंपनीने केंद्र मंजूरीचे पत्र उपमुख्यमंत्री अजित पवार यांना पाठविले असून टाटा आणि राज्यशासनाच्या सहकार्यातून रोहा एमआयडीसी क्षेत्रात हे नवीन केंद्र उभे राहणार आहे. यामुळे रायगड जिल्ह्यातील युवकांना उद्योगांच्या गरजेनुसार अत्याधुनिक ‘एआय’ तंत्रज्ञानासह रोजगाराभिमुख कौशल्यविकासाचे प्रशिक्षण मिळणार आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केंद्र मंजूरीसाठी केलेला पाठपुरावा आणि सहकार्याबद्दल राज्याच्या महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे तसेच खासदार सुनील तटकरे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे आभार मानले आहेत.

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते केडगाव व लोणंदसह राज्यातील १५ अमृत स्थानकांचे आज उद्घाटन – सविस्तर बातमी 

रायगड जिल्ह्याच्या रोहा एमआयडीसीमध्ये होणाऱ्या या ‘सीट्रिपलआयटी’ केंद्राच्या एकूण 105 कोटींच्या खर्चापैकी 89 कोटी रुपये टाटा कंपनीतर्फे तर 16 कोटी रुपये राज्य शासन व जिल्हा प्रशासनातर्फे उपलब्ध करण्यात येणार आहेत. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या प्रयत्नांमुळे गेल्या चार महिन्यात राज्यात मंजूरी मिळालेले हे चौथे केंद्र आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पत्र लिहिल्यानंतर ‘टाटा टेक्नॉलॉजी’ कंपनीने अवघ्या दोन आठवड्यात बीड जिल्ह्यातील केंद्रास, दीड महिन्यात नांदेड आणि नांदेड आणि छत्रपती संभाजीनगरच्या दोन केंद्रांना तसेच चार महिन्यात रायगड जिल्ह्यातील रोह्याच्या या ‘सीट्रीपलआयटी’ केंद्रास मंजूरी दिली आहे.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी घोषणा केल्यानंतर अल्पावधीतंच ही चार ‘सीट्रीपलआयटी’ केंद्रे मंजूर करुन आणल्यामुळे चारही जिल्ह्यांमधील युवकांना रोजगाराभिमुख अत्याधुनिक कौशल्यविकासाचे प्रशिक्षण मिळण्याचा तसेच जिल्ह्यांमध्ये उद्योगपुरक वातावरण निर्माण होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. यातून ‘बोलेन ते करेन…’ ही अजित पवार यांची ओळख अधिक ठळक झाली आहे.

रायगडच्या रोहा एमआयडीसीत उभारण्यात येणाऱ्या सीट्रीपलआयटी’ केंद्रामुळे जिल्ह्यातील, कोकणातील युवकांना ‘एआय’ वापरासह जागतिक दर्जाचे आधुनिक प्रशिक्षण, तांत्रिक कौशल्यविकासाची, रोजगार, स्वयंरोजगाराची संधी मिळणार आहे. उद्योगक्षेत्राला स्थानिक पातळीवर कुशल मनुष्यबळ उपलब्ध होणार आहे. कोकणातील नवउद्योगांना प्रोत्साहन देण्यासह अनेक उद्दीष्टांची पूर्तता या ‘सीट्रीपलआयटी’ केंद्रामुळे होणार आहे.‘टाटा टेक्नॉलॉजी’ कंपनीने उपमुख्यमंत्री अजित पवार यांना पाठविलेल्या पत्रात, रायगड जिल्ह्यातील रोहा एमआयडीसीमध्ये 105 कोटी रुपये खर्चून नवीन ‘सीट्रिपलआयटी’ स्थापन करण्याचा निर्णय घेतल्याचे कळविले आहे.

यापैकी 89 कोटी 25 लाख रुपये टाटा टेक्नॉलॉजी तर, उर्वरीत रक्कम राज्य शासन आणि संबंधित जिल्हा प्रशासन देणार आहे. नव्या सेंटरमधून दरवर्षी 3 हजार युवकांना प्रशिक्षित केले जाईल, त्यातून कोकणात उद्योगपुरक वातावरण निर्माण होण्यास मदत होईल, असा विश्वास व्यक्त करण्यात येत आहे.

‘सीट्रिपलआयटी’च्या स्थापनेनंतर पहिल्या तीन वर्षांसाठी प्रशिक्षण खर्च ‘टाटा टेक्नॉलॉजी’ उचलणार आहे. त्यानंतर प्रशिक्षणाचा खर्च ‘टाटा टेक्नॉलॉजी’ आणि जिल्हा प्रशासन दरवर्षी प्रत्येकी पन्नास टक्क्यांप्रमाणे विभागून करणार आहेत. यामुळे रायगडसह कोकणातील युवकांना उद्योगक्षेत्राच्या गरजेप्रमाणे औद्योगिक, तांत्रिक प्रशिक्षण मिळेल. त्यांची कौशल्यवृद्धी होईल. उद्योगांना प्रशिक्षित मनुष्यबळ मिळेल. यातून जिल्ह्यात उद्योगपुरक वातावरण निर्माण होण्यास मदत होईल, असा विश्वास व्यक्त करण्यात येत आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या धडाकेबाज, निर्णयक्षम कार्यपद्धतीबद्दल रोहा आणि रायगड जिल्हावासियांकडून आनंद, समाधान व्यक्त करण्यात येत आहे.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 403
  • Message : The request cannot be completed because you have exceeded your quota.
error: Content is protected !!
Scroll to Top