Breking News
खूनाचा कट रचणारे टोळके गजाआडविशेष वृत्त ; साडेतीन हजार लक्ष रुपयाहून अधिक पुरक टंचाई आराखड्यास जिल्हाधिकाऱ्यांची मंजूरीमहाराष्ट्र ऊर्जा विकास अभिकरण नियामक मंडळ व वार्षिक सर्वसाधारण बैठक पुणे येथे संपन्नराज्यातील ९९ टक्के वीज ग्राहकांना ग्रीड सपोर्ट चार्ज नाही‘महाज्योती’च्या गुणवंतांचे यूपीएससी निकालात ‘शतक’; भारतीय वन सेवा परीक्षेत ८ विद्यार्थ्यांची बाजीआईच्या प्रियकराचा तरुणीच्या प्रियकराकडून खूनहंगाम सन २०२५ राज्यस्तरीय पिकस्पर्धेत पुणे जिल्ह्यातील ८ शेतकरी ‍विजेतेचाकसमान धरणग्रस्तांच्या पुनर्वसनासाठी समाधान शिबिर आयोजित करागॅसबील अपडेटच्या बहाण्याने घातला गंडाविद्यार्थ्यांनी ‘पुणे ॲग्री हॅकॅथॉन-२०२६’ स्पर्धेचा लाभ घ्यावा

संत गाडगेबाबा यांच्या १५० व्या जयंतीनिमित्ताने सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन

भजन, कीर्तन, भारूड आणि शाहिरीच्या माध्यमातून संत गाडगेबाबांच्या विचारांचा जागर

marathinews24.com

पुणे – थोर समाजसुधारक, कीर्तनकार आणि लोकसंत गाडगेबाबा यांच्या १५० व्या जयंती निमित्ताने सदाशिव पेठ येथील भरत नाट्य मंदिर येथे सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्या वतीने विशेष सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

अर्थसंकल्प, उद्योग आणि महिला सक्षमीकरणावर संवाद; TACCI परिषदेत डॉ. नीलम गोऱ्हे यांची भूमिका – सविस्तर बातमी

या कार्यक्रमाच्या माध्यमातून संत गाडगेबाबांच्या विचारांचा जागर केला जाणार असून, यात भजन, कीर्तन आणि भारुडाचा बहारदार कार्यक्रम सादर केला जाईल. या सोहळ्याचे वैशिष्ट्य म्हणजे प्रसिद्ध निवेदिका अनघा मोडक यांचे निरूपण लाभणार असून, गायिका केतकी भावे-जोशी आणि ओमकार प्रभूघाटे यांच्या गायनाने हा सोहळा रंगणार आहे. या सर्वांना यशस्वी वाद्यवृंद साथसंगत करणार आहेत. तसेच, हमीद सय्यद यांचे प्रबोधनात्मक भारूड, शाहिर बाळासाहेब मालुसकर यांची शाहिरी आणि कीर्तनकार संदीप पाल महाराज यांचे कीर्तन श्रोत्यांसाठी पर्वणी ठरेल.

हा संपूर्ण कार्यक्रम सर्व नागरिकांसाठी प्रवेश विनामूल्य असून, जास्तीत जास्त लोकांनी उपस्थित राहून या सांस्कृतिक आणि प्रबोधनात्मक कार्यक्रमाचा आनंद घ्यावा, असे आवाहन सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्यावतीने करण्यात आले आहे.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 403
  • Message : The request cannot be completed because you have exceeded your quota.
error: Content is protected !!
Scroll to Top
×