Breking News
पुणे महापालिकेच्या सर्व्हर रूममधून कॉम्प्युटरची हार्ड डिस्क चोरीलापर्वती परिसरात सिक्युरटेक कंपनीची १९ लाखांची फसवणूकगाडी चालकावरून झाला वाद; डोक्यात घातला दगडदारू पिताना झालेल्या वादातून मित्राची हत्यागुजरातहून पुण्यात विक्रीसाठी आणलेला २२ लाखांचा गुटखा जप्तएकल महिला धोरणासाठी कार्यशाळा संपन्नस्टँड अप इंडिया योजनेअंतर्गत नवउद्योजकांना मार्जिन मनी योजनेचा लाभ घेण्याचे आवाहनमहिला शेतकऱ्यांच्या सक्षमीकरणासाठी महाराजस्व शिबिरामध्ये प्रमाणपत्र वाटप करा-डॉ. नीलम गोऱ्हेसफाई कामगारांचे प्रलंबित प्रश्न तातडीने मार्गी लावापुण्यात समरसता लोककला संमेलनाचे २८ जूनला आयोजन

सांस्कृतिक कार्यक्रम रद्द, पूरग्रस्त शेतकऱ्यांना मदतीचा हात

माजी नगरसेविका हर्षाली माथवड यांच्याकडून संवेदनशीलता

marathinews24.com

पुणे – नवरात्रोत्सवाच्या निमित्ताने आयोजित केलेला ‘स्त्रीजन्माच्या स्वागताची मानाची पैठणी’ हा भव्य सांस्कृतिक कार्यक्रम रद्द करून पूरग्रस्त शेतकऱ्यांना मदतीचा हात देत माजी नगरसेविका हर्षाली दिनेश माथवड यांनी संवेदनशीलपणाचे दर्शन घडवले आहे. त्यांनी सांस्कृतिक कार्यक्रमाऐवजी थेट जनतेच्या मदतीसाठी पाऊल उचलले आहे. त्यांनी मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी आर्थिक मदत जमा केली असून, पूरग्रस्त शेतकऱ्यांसाठी जीवनावश्यक वस्तूंचे किट भारतीय जनता पार्टी, पुणे कार्यालयात जमा केले आहेत. हे किट शेतकऱ्यांपर्यंत लवकरच पोहोचविण्यात येणार आहेत.

पुणे जिल्ह्यात जागतिक पर्यटन दिन विविध उपक्रमाने साजरा – सविस्तर बातमी

नवरात्रोत्सवात दरवर्षी हर्षाली दिनेश माथवड यांच्या पुढाकाराने सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन केले जाते. यंदाही माथवड यांनी रविवारी (दि. २८ सप्टेंबर) जीत मैदान, कोथरूड पुणे सांस्कृतिक कार्यक्रम आयोजिला होता. मात्र, राज्यभरात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे आणि निर्माण झालेल्या पूरपरिस्थितीमुळे हा कार्यक्रम तात्पुरता रद्द केला आहे.

पावसामुळे अनेक शेतकऱ्यांची घरे, पिके आणि जनावरे वाहून गेली असून, त्यांचे मोठे नुकसान झाले आहे. ही बाब लक्षात घेऊन पूरग्रस्तांना मदत करण्याचा निर्णय माथवड यांनी घेतला आहे. पूरामुळे शेतकऱ्यांच्या घरांसह जनावरे वाहून गेली आहेत. अनेक ठिकाणी जनजीवन विस्कळीत झाले आहे. अशा गंभीर परिस्थितीत, सांस्कृतिक कार्यक्रम पुढे ढकलून, शेतकऱ्यांसोबत उभे राहणे हीच खरी सामाजिक बांधिलकी आहे,” असे मत हर्षाली दिनेश माथवड यांनी व्यक्त केले.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×