Breking News
टँकरचे चाक डोक्यावरून गेल्याने दुचाकीस्वाराचा मृत्यूरॅपिडो चालकाला प्रवाशांकडून बेदम मारहाण; मनगट फ्रॅक्चरचेतन चौधरीने लोहगडावरील प्रवेशशुल्क भरले नसल्याचे उघडकेतनच्या खुनासाठी गुगल गुरू, लोहगड मर्डर मिस्ट्रीराष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहीम २८ जून रोजीपुलं म्हणजे आनंददायी ऊर्जा-पंडित सुरेश तळवलकरआषाढी वारीत भाविकांची कोणतीही गैरसोय होणार नाही – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसई-स्पोर्ट्स धोरणात सायबर बुलिंग, व्यसनाधीनता, अंमलबजावणी यंत्रणेचा समावेश आवश्यक – डॉ. नीलम गोऱ्हेसंत तुकाराम महाराज पालखी मार्गाची उपमहापौर परशुराम वाडेकर यांच्याकडून पूर्वपाहणीविशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रम (एसआयआर) बाबत जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक संपन्न

सायबर चोरट्यांचा ज्येष्ठ वकिलाला १४ कोटींचा गंडा

पुण्यात शेअर बाजारात गुंतवणुकीच्या आमिषाने १२ काेटीची फसवणूक

शेअर ट्रेडिंगमधील जादा परताव्याच्या आमिषाने फसवणूक

marathinews24.com

पुणे – शहरातील ज्येष्ठ वकिलांना सायबर चोरट्यांनी शेअर ट्रेडिंगमधील जादा परतावा मिळवून देण्याच्या आमिषाने तब्बल १४ कोटी २५ लाख ६६ हजारांचा गंडा घातला आहे. ही फसवणूक ऑक्टोंबर ते डिसेंबर २०२५ या कालावधीत घडली आहे. याप्रकरणी ६८ वर्षीय नागरिकाने सायबर पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यानूसार, मोबाईल धारक व विविध बँक खातेधारक यांच्याविरूद्ध आयटी ऍक्टनुसार गुन्हा नोंद केला आहे.

पर्वतीत दशहत पसरविणारे अटकेत – सविस्तर बातमी 

पोलिसांच्या माहितीनुसार, तक्रारदार हे वकिल आहेत. त्यांना ऑनलाईनच्या माध्यमातून सायबर चोरट्यांनी संपर्क साधला होता. त्यांना शेअर ट्रेडिंगची माहिती दिली. त्यानंतर त्यांना एका व्हॉट्सअप ग्रुपमध्ये ऍड केले. त्यातून तक्रारदारांना इतर व्यक्तींना होत असलेला फायदा दाखविण्यात आला. त्यानंतर त्यांना एक लिंक पाठवून अँप डाऊनलोड करण्यास सांगितले. तक्रारदारांनी ते अँप डाऊनलोड केले. नंतर त्यांना या अँपच्या माध्यमातून वेगवेगळ्या बँक खातेवर पैसे भरण्यास सांगितले. तक्रारदारांनी थोडे-थोडे पैसे भरण्यास सुरूवात केली. तेव्हा त्यांना अँपमध्ये त्यांचा पोर्टफोलिओ मोठ्या प्रमाणात दिसू लागला. त्यांना सायबर चोरट्यांनी दाम दुप्पट करून देण्याची बतावणी केली.

त्यानूसार, तक्रारदारांनी त्यांच्या आमिषाला बळी पडत त्यांच्याकडून तब्बल १४ कोटी २५ लाख ६५ हजार रुपये उकळले. त्यानंतर त्यांनी अँपमधून पैसे काढून घेण्याचे प्रयत्न केले. पण, ते होत नव्हते. त्यांनी सायबर चोरट्यांशी पुन्हा संपर्क साधला. विचारणा केली. तेव्हा त्यांना वेगवेगळ्या कारणांसाठी आणखी पैसे भरण्यास सांगण्यात आले. तेव्हा त्यांना फसवणूक होत असल्याचे लक्षात आले. त्यानंतर त्यांनी पोलिसांकडे तक्रार दिली. अधिक तपास पोलिस करत आहेत.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×