Breking News
विषारी दारू प्रकरणानंतर उत्पादन शुल्क विभागाकडून छापेविमानात बाँम्ब ठेवल्याची धमकीडोक्यात वीट पडल्याने बांधकाम मजुराचा मृत्यू१ लाखांची लाच प्रकरणी ग्राम महसूल अधिकाऱ्याविरुद्ध गुन्हाहडपसरमधील गावठी दारु धंद्याकडे पोलिसांचे दुर्लक्षआयुर्वेदामध्ये व्याधींचे मूळ शोधण्याची क्षमता- प्रा. डाॅ. मेधा कुलकर्णीबारामती बसस्थानक राज्यात प्रथम; ‘स्वच्छ सुंदर बसस्थानक’ अभियानात १ कोटींचे पारितोषिकजनगणना वेळेत पूर्ण होण्याकरिता प्रगणकास सहकार्य करावे‘विषारी दारु पिल्यामुळे १६ जणांचा मृत्यूमहाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या डिझेल बचतीच्या अनुषंगाने उपाययोजना

सायबर चोरट्यांकडून ९७ लाखांची फसवणूक

पुण्यात सायबर चोरट्यांकडून ३३ लाखांची फसवणूक

सायबर चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल

marathinews24.com

पुणे – सायबर चोरट्यांकडून वेगवेगळी आमिषे दाखवून नागरिकांची फसवणूक करण्याचे सत्र कायम आहे. शेअर बाजारात गुंतवणूक, घरातून ऑनलाइन कामाची संधी, तसेच कारवाईची भीती दाखवून चोरट्यांनी तक्ररादारांची ९७ लाख ७६ हजार रुपयांची फसवणूक केल्याचे उघडकीस आले आहे.

वाहनाच्या धडकेत दुचाकीस्वार तरुणाचा मृत्यू – सविस्तर बातमी

शेअर बाजारात गुंतवणुकीच्या आमिषाने कात्रज भागातील ज्येष्ठ नागरिकाची सायबर चोरट्यांनी २९ लाख ६९ हजार रुपयांची फसवणूक केल्याचे उघडकीस आले आहे. याबाबत ज्येष्ठ नागरिकाने भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, सायबर चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार ज्येष्ठ नागरिकाच्या मोबाइल क्रमांकावर सायबर चोरट्यांनी संपर्क साधला होता. शेअर बाजारातील गुंतवणुकीबाबत त्यांना माहिती देण्यात आली. त्यानंतर चोरट्यांनी त्यांना चांगल्या परताव्याचे आमिष दाखवून जाळ्यात ओढले. चोरट्यांनी त्यांना सुरुवातीला काही रक्कम भरण्यास सांगितले. चोरट्यांच्या खात्यात त्यांनी पैसे जमा केले. पैसे जमा केल्यानंतर चोरट्यांनी त्यांना परतावा मिळाल्याचे भासविले. त्यानंतर ज्येष्ठ नागरिकाने चोरट्यांच्या खात्यात आणखी रक्कम जमा केली. एकूण मिळून २९ लाख ६९ हजार रुपये चोरट्यांच्या खात्यात जमा करण्यात आले. त्यानंतर चोरट्यांनी त्यांचे मोबाइल क्रमांक बंद केले. फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर त्यांनी नुकतीच पोलिसांकडे तक्रार दिली. वरिष्ठ पोलीस निरीक्षक राहुल खिलारे तपास करत आहेत.

शेअर बाजारात गुंतवणुकीच्या आमिषाने एका तरुणाची ३३ लाख १२ हजार रुपयांची फसवणूक करण्यात आली. याप्रकरणी चोरट्यांविरुद्ध काळेपडळ पोलिसांनी गुन्हा दाखल केला. याबाबत तरुणाने काळेपडळ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अमर काळंगे तपास करत आहेत. अशाच पद्धतीने सायबर चोरट्यांनी बिबवेवाडी भागातील एका तरुणाची चार लाख रुपयांची फसवणूक केली. याबाबत तरुणाने बिबवेवाडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सूरज बेंद्रे तपास करत आहेत.

घरातून ऑनलाइन पद्धतीने कामाची संधी (ऑनलाइन टास्क) असे आमिष दाखवून सायबर चोरट्यांनी महात्मा फुले पेठेतील एका तरुणाची ११ लाख ३५ हजार रुपयांची फसवणूक केली. याबाबत एका तरुणाने खडक पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. तक्रारदार तरुणाच्या मोबाइल क्रमांकावर सायबर चोरट्यांनी संदेश पाठविला होता. ऑनलाइन पद्धतीने काम केल्यास चांगला परतावा मिळेल, असे आमिष दाखवून चोरट्यांनी त्याला जाळ्यात ओढले. तरुणाला सुरुवातीला ऑनलाइन पद्धतीने केलेल्या कामाचे पैसे दिले. त्यानंतर तरुणाने आणखी पैसे चोरट्यांच्या खात्यात जमा केले. फसवणूक झाल्याचे उघडकीस आल्यानंतर त्याने तक्रार दिली. गुन्हे शाखेच्या पोलीस निरीक्षक शर्मिला सुतार तपास करत आहेत.

काळ्या पैसे व्यवहारात बँक खात्याचा वापर करण्यात आल्याची भीती दाखवून सायबर चोरट्यांनी कोंढवा परिसरातील एका ज्येष्ठ नागरिकाची १९ लाख ६० हजार रुपयांची फसवणूक केली. याबाबत एका ज्येष्ठ नागरिकाने कोंढवा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. वरिष्ठ पोलीस निरीक्षक कुमार घाडगे तपास करत आहेत. गेल्या काही दिवसांपासून सक्त वसुली संचानालय (ईडी), अमली पदार्थ विरोधी पथक,(नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो), तसेच केंद्रीय गुन्हे अन्वे्षण विभागाकडून (सीबीआय) कारवाई करण्यात येणार असल्याची भीती दाखवून ज्येष्ठ नागरिकांची फसवणूक करण्याचे प्रकार वाढले आहेत.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×