Breking News
Pimpri Chinchwad LokSamvad : पिंपरी-चिंचवड महोत्सवातील लोकसंवाद उपक्रमMedicine Safety Law : औषध सुरक्षा कायदा, रुग्णालयीन बिलांचे ऑडिट कराNavale Bridge Accident : नवले पुलाजवळ पुन्हा अपघात; कंटनेरच्या धडकेत तरुणाचा मृत्यूShubhangi Garad Suicide Case : शुभांगी गरड आत्महत्याप्रकरणाची सखोल चौकशी करा : डॉ. नीलम गोऱ्हेMorya Gosavi Palkhi : ‘दगडूशेठ’ गणपती उत्सवमंडपात श्री मोरया गोसावी पालखी सोहळ्याचे स्वागतSeva Sankalp Abhiyan Pune : ‘सेवा संकल्प अभियान’ लोकाभिमुख पद्धतीने राबवून पात्र नागरिकांना योजनांचा थेट लाभ द्या-जिल्हाधिकारी जितेंद्र डुडीE-Pik Pahani : शेतकऱ्यांनी ई-पिक पाहणी पूर्ण करावी : तहसीलदार स्वप्निल रावडेPune Crime News : पुणे रेल्वे स्थानकाच्या आवारात प्रवाशाला लुटलेTractor Accident : ट्रॅक्टरच्या चाकाखाली सापडून मुलीचा मृत्यूGaneshotsav 2026 : ‘बाप्पा डॉट ऑर्ग’वर गणेशोत्सवातील पाच वैशिष्ट्यपूर्ण कथांची निवड, त्यात पुण्यातला एक

‘दगडूशेठ’ गणपती ट्रस्टच्या गणेशोत्सवातील सजावटीचे वासापूजन उत्साहात

'दगडूशेठ' गणपती ट्रस्टच्या गणेशोत्सवातील सजावटीचे वासापूजन उत्साहात

वृंदावनमधील प्रेम मंदिरात होणार विराजमान ; श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट, सुवर्णयुग तरुण मंडळ

marathinews24.com

पुणे – श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट, सुवर्णयुग तरुण मंडळाच्या वतीने १३४ व्या वर्षाच्या गणेशोत्सवानिमित्त वृंदावनमधील प्रेम मंदिराची प्रतिकृती साकारण्यात येत आहे. त्या सजावटीचा श्रीगणेशा वासापूजनाने झाला.

पालखी प्रस्थान सोहळ्यानंतर आळंदी नगर परिषदेच्यावतीने युद्धपातळीवर स्वच्छता मोहीम- मुख्याधिकारी माधव खांडेकर – सविस्तर बातमी

उत्सवाची पारंपरिक जागा असलेल्या जय गणेश प्रांगण येथे आयोजित कार्यक्रमाला ट्रस्टचे अध्यक्ष सुनील रासने, उपाध्यक्ष माणिक चव्हाण, कोषाध्यक्ष महेश सूर्यवंशी, सरचिटणीस व आमदार हेमंत रासने, सहचिटणीस अमोल केदारी, उत्सव प्रमुख अक्षय गोडसे, सुवर्णयुग तरुण मंडळाचे अध्यक्ष प्रकाश चव्हाण, यतिश रासने, सौरभ रायकर, मंगेश सूर्यवंशी, सचिन आखाडे, अमोल चव्हाण, तुषार रायकर, यंदाचे कलादिग्दर्शक नितेश कुमार, काळे मांडववाले यांसह मंडळाचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

ट्रस्टचे अध्यक्ष सुनील रासने म्हणाले, नानाविध वैशिष्ट्यांनी परिपूर्ण असलेल्या मंदिराची प्रतिकृती सुमारे १०० फूट इतकी असेल. जिथे भक्ती प्रेम बनते आणि प्रेम देवत्व बनते या संकल्पनेवर आधारित ही भव्य प्रतिकृती साकारण्यात येणार आहे. प्रतिकृतीचा आकार १२० फूट लांब, ९० फूट रुंद आणि १०० फूट उंच असणार आहे. यामध्ये अनेक भव्य खांब असून विविध मूर्ती देखील असणार आहेत. गाभारा व मुख्य सभामंडपातील खांबांची रचना सुटसुटीत असून भाविकांना लांबून सहजतेने श्रींचे दर्शन घेता येईल.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×