Breking News
दुकानातून टायर चोरणारा गजाआडराज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांच्या हस्ते सिम्बायोसिसचे संस्थापक पद्मभूषण डॉ. शां. ब. मुजुमदार यांचा ९० व्या वाढदिवसानिमित्त सन्मानउप प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या कारवाईत साडेआठ लाख रुपयांहून अधिक दंड वसूलभारती विद्यापीठ ‘आयएमईडीमध्ये बीबीए, बीसीए विद्यार्थ्यांसाठी इंडक्शन प्रोग्रामपुण्यातील तो कुंटणखाना ३ वर्षांसाठी सीलबंदमोबाईल न विचारता वापरला, वादातून तरुणाचा खूनअण्णा भाऊ साठे यांचे साहित्य विश्वात्मक मानदंड निर्माण करणारे-डॉ. श्रीपाल सबनीससोमनाथ सूर्यवंशी खटल्यात सर्वोच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निकाल…पुण्यातून अपहरण केलेल्या २ वर्षाच्या चिमुकलीची सुटकालोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंतीनिमित्त वाहतुकीत बदल

लाडक्या बहिणींना स्वावलंबी बनविण्यासाठी उपमुख्यमंत्री शिंदे यांनी प्राधान्य दिले…

लाडक्या बहिणींना स्वावलंबी बनविण्यासाठी उपमुख्यमंत्री शिंदे यांनी प्राधान्य दिले...

लाडक्या बहिणींचे आधारस्तंभ एकनाथजी शिंदे साहेब – ऍड. डॉ. पी. बी. कुंभार

marathinews24.com

पुणे – महाराष्ट्रातील प्रत्येक लाडक्या बहिणींचे आधारस्तंभ एकनाथजी शिंदे साहेब आहेत. महिलांना स्वावलंबी बनविण्यासाठी त्यांनी राबवलेल्या योजना, धोरणे आणि कार्यशैलीमुळे हजारो महिला सक्षमीकरणाच्या प्रवासात सामील झाल्या आहेत, असे प्रतिपादन शिवसेना ओबीसी विभागाचे ऍड. डॉ. पी. बी. कुंभार यांनी केले. त्यांच्या मार्गदर्शनाखाली शिवसेना ओबीसी महिला विभाग, पुणे शहराच्या नव्या पदाधिकाऱ्यांची नियुक्ती नुकतीच जाहीर करण्यात आली.यामुळे पुणे शहरात ओबीसी समाजातील महिलांच्या हक्कांसाठी प्रभावी कार्य करेल, असा विश्वास व्यक्त केला.

विकसित महाराष्ट्र-२०४७’ सर्वेक्षणामध्ये नागरिकांना सहभागी व्हावे-विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार – सविस्तर बातमी 

उर्मिला जागमोहन बनकर यांची शहर अध्यक्षा म्हणून निवड झाली असून त्या सामाजिक व महिला सक्षमीकरण क्षेत्रात उल्लेखनीय योगदान देत आहेत. तर पद्मजा लडकत यांची कार्याध्यक्षा म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. माधुरी जगताप यांची शहर सचिव, तर प्रीती नायकवाडी उपाध्यक्षा म्हणून नियुक्ती केली आहे.यासर्व नव्या पदाधिकाऱ्यांनी आपल्या निवडीनंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वावर दृढ विश्वास व्यक्त केला आहे. ओबीसी महिलांसाठी आरोग्य, शिक्षण, स्वयंरोजगार, प्रशिक्षण, हक्क व सक्षमीकरण या क्षेत्रात निर्णायक पावले उचलली जातील, असा निर्धार त्यांनी व्यक्त केला.

कार्यक्रमाचे नियोजन उर्मिला जागमोहन बनकर यांनी, तर आभार प्रदर्शन माधुरी जगताप यांनी केले. यावेळी ऍड. डॉ. पी. बी. कुंभार यांनी ओबीसी महिलांच्या विकासासाठी संघटनेच्या वतीने स्वतंत्र कौशल्यविकास शिबिरे, महिला मदत केंद्र, वधुवर मेळावे आणि विविध उपक्रम राबविण्यात येतील असे सांगितले. कार्यक्रमाला भगवान श्रीमंदिलकर, राजेश जगताप,जागमोहन बनकर,हरिभाऊ सावंत, सुरज रामरूळे, भारती वेल्हेकर, उज्वला सावंत, अर्पिता राऊत, नेहा घोलप, भावना पाटील, शिल्पा घोलप, आदिसिंह यांच्यासह मोठ्या प्रमाणात महिला शिवसैनिक उपस्थित होत्या.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 403
  • Message : The request cannot be completed because you have exceeded your quota.
error: Content is protected !!
Scroll to Top