Breking News
दारू पिताना झालेल्या वादातून मित्राची हत्यागुजरातहून पुण्यात विक्रीसाठी आणलेला २२ लाखांचा गुटखा जप्तएकल महिला धोरणासाठी कार्यशाळा संपन्नस्टँड अप इंडिया योजनेअंतर्गत नवउद्योजकांना मार्जिन मनी योजनेचा लाभ घेण्याचे आवाहनमहिला शेतकऱ्यांच्या सक्षमीकरणासाठी महाराजस्व शिबिरामध्ये प्रमाणपत्र वाटप करा-डॉ. नीलम गोऱ्हेसफाई कामगारांचे प्रलंबित प्रश्न तातडीने मार्गी लावापुण्यात समरसता लोककला संमेलनाचे २८ जूनला आयोजनइतिहासातून पर्यावरण संवर्धनाची प्रेरणा घेण्याची गरज-प्र. के. घाणेकरदगडूशेठ दत्तमंदिर ट्रस्टच्या नव्या विश्वस्तांच्या नियुक्तीला स्थगिती देण्याची मागणी फेटाळलीऑलिम्‍पिकपटू बंडा पाटील खाशाबा जाधव पुरस्काराने गौरवित

विकसित महाराष्ट्र-२०४७’ सर्वेक्षणामध्ये नागरिकांना सहभागी व्हावे-विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार

विकसित महाराष्ट्र-२०४७’ सर्वेक्षणामध्ये नागरिकांना सहभागी व्हावे-विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार

व्हिजन विकसित महाराष्ट्र-२०४७

marathinews24.com

पुणे – विकसित महाराष्ट्र-२०४७’ च्या व्हिजन डॉक्यूमेंट तयार करण्याकरिता नियोजन विभागाच्या विभागस्तरीय सर्वेक्षणाअंतर्गत क्षेत्रीय गटाच्या अनुषंगाने ‘जमीन’ विषयावर नागरिकांनी आपले अभिप्राय १७ जुलै २०२५ पर्यंत https://forms.gle/WDcqhvFzsnJCcX3n8 या गुगलशीटमध्ये भरुन पाठवावे, असे आवाहन विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांनी केले आहे.

सर्वेक्षणात ‘जमीन’ विषयाच्या अनुषंगाने एकूण ८ प्रश्न नमूद असून इंग्रजी व मराठी भाषेमध्ये असलेले सर्वेक्षण प्रारुप गुगलशीट तयार करण्यात आले आहेत. गुगल शीटच्या माध्यमातून अधिकाधिक नागरिकांनी या सर्वेक्षणामध्ये त्यांचे अभिप्राय नोंदवावे, ही लिंक आपल्या ओळखीच्या व्यक्तींना पाठवून त्यांनाही सर्वेक्षणात सहभागी होण्यासाठी प्रोत्साहित करावे, असेही आवाहन करण्यात आले आहे.

रस्त्यावरील जनावरे मालकांनी ताब्यात घ्यावी-मुख्याधिकाऱ्यांचे आवाहन

बारामती शहरात गाई, बैल व गाढव या भटक्या जनावरांमुळे सार्वजनिक मालमत्तेच्या नुकसानीसह पदपथ व रस्त्यावरून चालणाऱ्या नागरिकांच्या जीवितास धोका तसेच वाहतुकीसही अडथळा निर्माण होत आहे. यामुळे जनावरे मोकळी न सोडता मालकांनी ताब्यात घ्यावीत असे आवाहन करण्यात आले आहे.

शहरामध्ये पदपथ, रस्त्याच्या दुभाजकामध्ये मोठ्या प्रमाणात वृक्षलागवड करण्यात आली या भटक्या जनावरांमुळे सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान होत आहे. ही जनावरे शहरातील व बाह्य परिसरातील नागरिकांच्या मालकीची असल्याचे निदर्शनास आले आहे. येत्या काळात नगरपरिषदेच्यावतीने ही जनावरे कोंडवाड्यात स्थलांतरित करुन संबंधित जनावरांच्या मालकांवर गुन्हे दाखल करण्यात येतील, अशी माहिती नगरपरिषदेचे मुख्याधिकारी पंकज भुसे यांनी प्रसिद्धी पत्रकान्वये दिली आहे.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×