स्वराज्य रक्षक धर्मवीर श्री संभाजी महाराज यांच्या पुण्यतिथीनिमित्त उपमुख्यमंत्र्याचे अभिवादन

तुळापूर येथे समाधीस्थळी जाऊन अभिवादन; मुकज्योत पदयात्रेत सहभाग

marathinews24.com

पुणे – स्वराज्य रक्षक धर्मवीर श्री संभाजी महाराज यांच्या पुण्यतिथी-३३७ व्या बलिदान स्मरणदिनानिमित्त राज्याच्या उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याच्या पालकमंत्री सुनेत्रा अजित पवार यांनी श्री क्षेत्र तुळापूर येथील समाधीस्थळी जावून अभिवादन केले आणि समाधीचे दर्शन घेतले.

मांजरी बुद्रुकमध्ये कॅनाल ओव्हरफ्लो; घरांमध्ये शिरले पाणी, जनजीवन विस्कळीत – सविस्तर बातमी

यावेळी आमदार ज्ञानेश्वर कटके, बापुसाहेब पठारे, जिल्हा परिषद सदस्य किरण साकोरे, मोनिका हरगुडे, पंचायत समिती सदस्य, जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी चंद्रकांत वाघमारे, उप विभागीय अधिकारी यशवंत माने, अपर तहसीलदार तृप्ती कोलते, शिरुरचे तहसील बाळासाहेब म्हस्के, वढू.बु. चे सरपंच कृष्णा आरगडे, तुळापुरच्या प्रशासक संरपच ॲड. गुंफा इंगळे आदी उपस्थित होते.

यावेळी उपमुख्यमंत्री पवार यांनी छत्रपती संभाजी महाराज यांच्या पुण्यतिथीनिमित्त तुळापूर येथे आयोजित मुकज्योत पदयात्रेत गावकऱ्यांसोबत सहभागी झाल्या.तुळापूर येथील संगमस्थळी जावून संगमेश्वराचे दर्शन घेतले. तुळापूर स्मारकाच्या अनुषंगाने सुरु असलेल्या विविध विकासकामांबाबत माहिती घेवून ही कामे दर्जेदार, गुणवत्तापूर्ण आणि वेळेत पूर्ण करण्याच्या श्रीमती पवार यांनी सूचना दिल्या. .

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×