Breking News
‘बाल्यावस्थेतील प्रारंभिक विकास’ विषयावरील कार्यशाळेचे मुख्य सचिव राजेशकुमार अग्रवाल यांच्या हस्ते उद्घाटनराष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त पुण्यात क्रीडा जागृती प्रभातफेरीऔषध निर्मिती कंपनीत नोकरीच्या आमिषाने ४ लाखांची फसवणूकविश्रांतवाडीत कौटुंबिक वादातून मुलाकडून आईचा खूनपुणे जिल्ह्यातही ‘प्लाझ्मा’, ‘लेझर’ झोतांवर बंदीराज्यातील 404 नागरिक सुरक्षित व 338 संपर्कात; प्रवास सुविधा व मदतीचे नियोजन सतर्कतेने करण्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देशहातमाग, स्थानिक कारागिरांसाठी केंद्र सरकारचा पुढाकारबिबवेवाडी परिसरात वैमनस्यातून तरुणावर शस्त्राने वारविवाहविषयक संकेतस्थळावरील ओळख महागातबेकायदा सावकारीतून कोट्यवधींची वसुली; तिघांविरुद्ध गुन्हा

उपमहापौर परशुराम वाडेकर यांची रुग्णालयांना भेट

उपमहापौर परशुराम वाडेकर यांची रुग्णालयांना भेट

बोपोडी व औंध रोड भागात दिली भेट

marathinews24.com

पुणे – महानगरपालिकेचे उपमहापौर परशुराम वाडेकर यांनी बोपोडी व औंध रोड परिसरातील महापालिकेच्या रुग्णालये व दवाखान्यांची प्रत्यक्ष भेट देत पाहणी केली. या दौर्‍यात आरोग्य सुविधा अधिक सक्षम करण्यावर त्यांनी भर दिला. बोपोडी येथील संजय गांधी रुग्णालय येथे पाहणी करताना रुग्णालय तातडीने युद्धपातळीवर कार्यान्वित करण्याचे आदेश देण्यात आले.

आगामी उत्सव कालावधीत १५ दिवस ध्वनीक्षेपक व ध्वनीवर्धक यंत्रणेचा वापर करण्यास मर्यादा शिथील – सविस्तर बातमी 

अद्ययावत यंत्रसामग्री, आवश्यक सोयी-सुविधा आणि मनुष्यबळ तत्काळ उपलब्ध करून देण्याच्या स्पष्ट सूचना संबंधित विभागाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांना देण्यात आल्या. यानंतर कै. द्रोपतीबाई मुरलीधर खेडेकर रुग्णालय येथेही पाहणी करण्यात आली. येथे आवश्यक सुधारणा व उपाययोजना तातडीने राबवण्याचे निर्देश देण्यात आले. औंध रोडवरील बाबुराव गेनबा शेवाळे दवाखाना येथे केवळ ओपीडीपुरती मर्यादा न ठेवता, खेडेकर रुग्णालयाच्या धर्तीवर प्रस्तुतीगृह, फिजिओथेरपी सेंटर, रुग्णवाहिका तसेच एक्स-रे सुविधा सुरू करण्याच्या सूचना उपमहापौरांनी दिल्या.

पाहणीवेळी आरोग्य अधिकारी डॉ. मीना बोराडे, परिमंडल क्रमांक २ चे वैद्यकीय अधिकारी डॉ. दीपक पखाले, औंध क्षेत्रीय कार्यालयाच्या वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रेमलता घाटे, वैद्यकीय अधिकारी डॉ. गणेश बगाडे तसेच शेवाळे दवाखान्याच्या डॉ. मैथिली कुलकर्णी उपस्थित होत्या. याशिवाय संबंधित कर्मचारी व स्थानिक नागरिकही मोठ्या संख्येने उपस्थित होते. उपमहापौर वाडेकर यांनी “नागरिकांना दर्जेदार व तत्पर आरोग्यसेवा मिळणे ही महापालिकेची प्राथमिकता आहे,” असे नमूद करत सुधारणा कामांचा नियमित आढावा घेतला जाईल, असे स्पष्ट केले.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×