Breking News
आयुष्मान भारत कार्ड योजनेचा जास्तीत जास्त नागरिकांनी लाभ घ्यावा – डॉ. कोमल पडवळAapla Dawakhana : आपला दवाखान्यातील उपलब्ध आरोग्य सुविधांचा नागरिकांनी लाभ घ्यावा –डॉ. कोमल पडवळमहिला शेतकरी प्रमाणपत्रासाठी नोंदणीबाबत महिलांना मार्गदर्शनSeva Sankalp Abhiyan : सेवा संकल्प अभियानातून पुणे जिल्ह्यात राबवणार विविध लोकाभिमुख उपक्रमएस. एस. नगरकर ज्वेलर्सच्या भव्य दालनाचे बाणेरमध्ये उद्घाटनLokSamvad 2026 : लोकसंवाद-२०२६’ अंतर्गत सुरक्षित रस्ता वाहतूक यावर विशेष कार्यक्रमMedicine Fraud : ओैषध वितरकाची ६३ लाखांची फसवणूकPune Cyber Crime : वाहतूक दंडाच्या लिंकद्वारे पावणेदोन लाखांची फसवणूकPune Ganeshotsav : उपमहापौर परशुराम वाडेकर यांच्या प्रमुख गणेश मंडळांना भेटीMarket Yard Ganeshotsav : भाजीपाला, फळे अन् कंदमुळांतून साकारली गणरायाची अनोखी आरास

विधान भवनात एनसीसी कॅडेट्सना उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांचे प्रेरणादायी मार्गदर्शन

महाराष्ट्र बटालियन आर्टिलरी एनसीसी, नागपूरच्या कॅडेट्सना विधान भवन येथे उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांचे विशेष मार्गदर्शन

marathinews24.com

नागपूर – महाराष्ट्र बटालियन आर्टिलरी एनसीसी, नागपूरच्या कॅडेट्सना विधान भवन येथे महाराष्ट्र विधानपरिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी विशेष मार्गदर्शन केले. यानिमित्ताने आयोजित प्रेरणादायी संवाद कार्यक्रमात डॉ. गोऱ्हे यांनी कॅडेट्सना आपल्या जीवनातील अनुभवांच्या माध्यमातून मार्गदर्शन केले.

लेखिका सुनीता लाड – भामरे यांच्यासाठी पुणे पुस्तक महोत्सव – २०२५ ठरला ‘घरवापसी’चा क्षण! – सविस्तर बातमी

मार्गदर्शन करताना डॉ. नीलम गोऱ्हे यांनी आपल्या महाविद्यालयीन जीवनातील आठवणी सांगितल्या. त्या काळात आपण राष्ट्रीय सेवा योजना (NSS) मध्ये सक्रिय सहभाग घेतला होता, असे सांगत ग्रामीण भागात केलेल्या सामाजिक कार्याचा उल्लेख त्यांनी केला. महिलांचे कल्याण, वैद्यकीय तपासणी शिबिरे तसेच विविध जनजागृती उपक्रमांमधील सहभागामुळे समाजाकडे पाहण्याची दृष्टी अधिक व्यापक झाली, असे त्यांनी नमूद केले. तरुण वयात सामाजिक जबाबदारीची जाणीव आणि सेवाभाव अंगीकारणे हे व्यक्तिमत्त्व घडवण्यासाठी अत्यंत महत्त्वाचे ठरते, असेही त्यांनी अधोरेखित केले.

विद्यार्थी जीवनातील अनेक रंजक, प्रेरणादायी आणि शैक्षणिकदृष्ट्या समृद्ध अनुभव त्यांनी कॅडेट्सना सांगितले. या संवादातून कॅडेट्सशी स्नेहपूर्ण व मुक्त विचारांची देवाणघेवाण झाली. अपयशातून शिकणे, सातत्य राखणे आणि आत्मविश्वासाने पुढे वाटचाल करणे या मूल्यांवर भर देत त्यांनी एनसीसीमधून मिळणारी शिस्त, देशभक्ती, नेतृत्वगुण आणि सामाजिक सेवाभाव आयुष्यभर उपयोगी पडतो, असे सांगितले.

या कार्यक्रमाला लेफ्टनंट कर्नल अमेय कानडे (कमांडिंग ऑफिसर), विनोद राऊत (ब्युरो चीफ, सकाळ वृत्तपत्र) तसेच एनसीसी पीआय स्टाफ उपस्थित होता. विधानपरिषद उपसभापती कार्यालयाच्या वतीने या कार्यक्रमाचे संयोजन करण्यात आले होते.

हा संवाद कार्यक्रम कॅडेट्ससाठी अत्यंत प्रेरणादायी व प्रबोधनात्मक ठरला. समाजासाठी अर्थपूर्ण योगदान देण्याची, राष्ट्राचे जबाबदार नागरिक बनण्याची आणि भावी नेतृत्व घडवण्याची प्रेरणा या संवादातून कॅडेट्सना मिळाली.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×