Breking News
Pimpri Chinchwad LokSamvad : पिंपरी-चिंचवड महोत्सवातील लोकसंवाद उपक्रमMedicine Safety Law : औषध सुरक्षा कायदा, रुग्णालयीन बिलांचे ऑडिट कराNavale Bridge Accident : नवले पुलाजवळ पुन्हा अपघात; कंटनेरच्या धडकेत तरुणाचा मृत्यूShubhangi Garad Suicide Case : शुभांगी गरड आत्महत्याप्रकरणाची सखोल चौकशी करा : डॉ. नीलम गोऱ्हेMorya Gosavi Palkhi : ‘दगडूशेठ’ गणपती उत्सवमंडपात श्री मोरया गोसावी पालखी सोहळ्याचे स्वागतSeva Sankalp Abhiyan Pune : ‘सेवा संकल्प अभियान’ लोकाभिमुख पद्धतीने राबवून पात्र नागरिकांना योजनांचा थेट लाभ द्या-जिल्हाधिकारी जितेंद्र डुडीE-Pik Pahani : शेतकऱ्यांनी ई-पिक पाहणी पूर्ण करावी : तहसीलदार स्वप्निल रावडेPune Crime News : पुणे रेल्वे स्थानकाच्या आवारात प्रवाशाला लुटलेTractor Accident : ट्रॅक्टरच्या चाकाखाली सापडून मुलीचा मृत्यूGaneshotsav 2026 : ‘बाप्पा डॉट ऑर्ग’वर गणेशोत्सवातील पाच वैशिष्ट्यपूर्ण कथांची निवड, त्यात पुण्यातला एक

जिल्हा दक्षता व नियंत्रण समितीची बैठक संपन्न

जिल्हा दक्षता व नियंत्रण समितीची बैठक संपन्न

पीडितांची अर्थसहाय्याची प्रकरणे कागदपत्रांअभावी रखडू नयेत; पोलीस विभागाला सूचना

marathinews24.com

पुणे – जिल्हा दक्षता व नियंत्रण समितीची जिल्हास्तरीय बैठक जिल्हाधिकारी कार्यालयात घेण्यात आली. कागदपत्रांअभावी पीडितांना अर्थसहाय्य देण्याची प्रकरणे प्रलंबित राहू नयेत यासाठी पोलीस विभागाकडे असलेले जातीचे दाखले, वैद्यकीय प्रमाणपत्र समाजकल्याण विभागाला उपलब्ध करुन द्यावेत, अशा सूचना समितीचे सदस्य सचिव तथा सहायक आयुक्त विशाल लोंढे यांनी दिल्या. यावेळी समितीचे शासकीय व अशासकीय सदस्य उपस्थित होते.

अन्न व औषध प्रशासनाची पुणे विभागात धडक कारवाई; १३.७१ लाखांचा मुद्देमाल जप्त – सविस्तर बातमी 

या समितीद्वारे अनुसूचित जाती व जमाती (अत्याचार प्रतिबंध) अधिनियम १९८९ बाबत जाणीव- जागृती करण्यासाठी जातीय सलोखा वृद्धींगत होण्यासाठी तालुकास्तरावर कार्यशाळा घ्याव्यात, पोलीस विभागाने वस्तुस्थिती तपासून आवश्यक त्या ठिकाणी गुन्हे दाखल करावेत, उच्च न्यायालयातील प्रकरणांचा पाठपुरावा करण्यासाठी प्रतिनिधी नियुक्त करावा व पुढील बैठकीत उच्च न्यायालयातील प्रकरणांची संख्या सादर करावी. गुन्ह्यांची संख्या जास्त असलेल्या तालुक्यात संयुक्तिक बैठका घेऊन ६० दिवसांच्या आत गुन्ह्यांचा तपास पूर्ण करण्याची कार्यवाही करावी, असे लोंढे यांनी सांगितले.

बैठकीत तालुकानिहाय प्रलंबित प्रकरणांचा आढावा घेण्यात आला. तसेच उपस्थित तक्रारदारांना त्यांचे म्हणणे मांडण्याची संधी देण्यात आली.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×