Breking News
पुण्यात पूर्ववैमनस्यातून तरूणाचा केला खूनटेम्पोच्या धडकेत पादचारी ठार, चालक अटकेतप्रधानमंत्री आदर्श ग्राम योजनेंतर्गत राज्यातील आदर्श गावांची मंगळवारपासून पडताळणी मोहीमपुण्यातील नवी पेठेत महिलेचे मंगळसूत्र हिसकावले‘दगडूशेठ’ गणपती मंदिरात शेषनागाच्या प्रतिकृतीची पुष्पसजावटमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त सखी-सुखदाचा आनंदोत्सव उत्साहात साजरावेश्या व्यवसायाचा पर्दाफाश, दोघांविरूद्ध कारवाईपुण्यातही भोंदूबाबा खरातची पुनरावृत्ती, महिलेवर अत्याचारविशेष सखोल पुनरिक्षण कार्यक्रम प्रक्रिया शनिवारपासून सुरुसमाज कल्याण आयुक्त दीपा मुधोळ मुंडे यांच्या उपस्थितीत जिल्ह्यात नशामुक्त भारत अभियानाचा शुभारंभ

डॉक्टर महिलेशी ओळख वाढवून केली बदनामी

डॉक्टर महिलेशी ओळख वाढवून केली बदनामी

हडपसर पोलिसांकडून दाम्पत्याविरुद्ध गुन्हा

marathinews24.com

पुणे – पतीच्या निधनानंतर एकट्या राहणार्‍या डॉक्टर महिलेशी ओळख वाढवून तिची बदनामी करण्याची धमकी दिल्याप्रकरणी दाम्पत्याविरुद्ध हडपसर पोलिसांनी गुन्हा दाखल केला. आरोपीने डॉक्टर महिलेची छायाचित्रे सोशल मीडियावर प्रसारित करण्याची धमकी दिली होती. याप्रकरणी दाम्पत्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. याबाबत डॉक्टर महिलेने हडपसर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

फ्लॅटचे कुलूप तोडून साडेपाच लाखांचा ऐवज लांबविला – सविस्तर बातमी 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, डॉक्टर महिलेच्या पतीचे निधन झाले असून, त्या एकट्या राहत होत्या. आरोपीने त्यांना जाळ्यात ओढून त्यांच्या एकटेपणाचा फायदा घेतला. त्यांना हॉटेलमध्ये नकळत मोबाइलवर छायाचित्रे काढली. तक्रारदार डॉक्टर महिला ज्या रूग्णालयात काम करत होत्या. तेथे आरोपीने जाउन त्याने तक्रारदार डॉक्टर महिलेला धमकाविले होते. आरोपीच्या पत्नीने नकळत काढलेली छायाचित्रे व्हायरल करण्याची धमकी दिली. डॉक्टर महिलेच्या मुलीला मारण्याची धमकी दिली. आरोपींनी महिलेच्या भावाला छायाचित्रे पाठवून बदनामी केली. सहायक पोलीस निरीक्षक जौंजाळ तपास करत आहेत.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×