Breking News
Pimpri Chinchwad LokSamvad : पिंपरी-चिंचवड महोत्सवातील लोकसंवाद उपक्रमMedicine Safety Law : औषध सुरक्षा कायदा, रुग्णालयीन बिलांचे ऑडिट कराNavale Bridge Accident : नवले पुलाजवळ पुन्हा अपघात; कंटनेरच्या धडकेत तरुणाचा मृत्यूShubhangi Garad Suicide Case : शुभांगी गरड आत्महत्याप्रकरणाची सखोल चौकशी करा : डॉ. नीलम गोऱ्हेMorya Gosavi Palkhi : ‘दगडूशेठ’ गणपती उत्सवमंडपात श्री मोरया गोसावी पालखी सोहळ्याचे स्वागतSeva Sankalp Abhiyan Pune : ‘सेवा संकल्प अभियान’ लोकाभिमुख पद्धतीने राबवून पात्र नागरिकांना योजनांचा थेट लाभ द्या-जिल्हाधिकारी जितेंद्र डुडीE-Pik Pahani : शेतकऱ्यांनी ई-पिक पाहणी पूर्ण करावी : तहसीलदार स्वप्निल रावडेPune Crime News : पुणे रेल्वे स्थानकाच्या आवारात प्रवाशाला लुटलेTractor Accident : ट्रॅक्टरच्या चाकाखाली सापडून मुलीचा मृत्यूGaneshotsav 2026 : ‘बाप्पा डॉट ऑर्ग’वर गणेशोत्सवातील पाच वैशिष्ट्यपूर्ण कथांची निवड, त्यात पुण्यातला एक

अल्पवयीन पीडित मुलीला उपचारासाठी ८ तास ताटकळत ठेवणे डॉक्टरांना भोवले

केज उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक, दोन डॉक्टरसह ६ जण निलंबित

marathinews24.com

बीड (अनंत जाधव) – प्रशासनाकडून लाखो रुपये खर्च करुन गोरगरीबांच्या उपचारांसाठी रुग्णालय उभारले जातात, मात्र प्रशासनाच्या सेवेतील मुजोरपणा आणि काही कामचुकार अधिकारी आणि कर्मचाऱ्यांकडून दुर्लक्ष करत उपचारांसाठी आलेल्या रुग्णांची सेवा न करता हेळसांड केली जाते. असाच धक्कादायक प्रकार केज तालुक्यातील १३ वर्षीय पीडित मुलीला वैद्यकीय तपासणीसाठी तब्बल ८ तास ताटकळत ठेवल्याची बाब केज उपजिल्हा रुग्णालयात घडली आहे.

“एक होतं माळीण” चित्रपटाचा थरकाप उडवणारा टीजर – सविस्तर बातमी

या संवेदनशील प्रकरणात जिल्हा प्रशासनाच्या निदर्शनास आल्यामुळे आरोग्य व पोलिस प्रशासनाचा असंवेदनशील कारभार चव्हाट्यावर आला असून, प्रकरणाची राज्यस्तरावरून गंभीर दखल घेतली गेली आहे. याप्रकरणी केजचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. दत्ता केंद्रे आणि दोन महिला डॉक्टरांसह एकूण ६ जणांना निलंबनाची कारवाई करण्यात आले आहे.

‘डॉक्टर्स डे’ च्या दिवशी झालेल्या या कारवाईमुळे आरोग्य विभागात वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. धक्कादायक प्रकाराची जिल्हा प्रशासनला माहिती मिळताच दि. २८ मे रोजी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सतीशकुमार सोळंके यांनी थेट केज येथील शासकीय उपजिल्हा रुग्णालयात धाव घेऊन जबाब नोंदवले. २९ मे रोजी महिला डॉक्टरला तत्काळ कार्यमुक्त केले होते. लातूर उपसंचालक कार्यालयाकडून दि.३० मे रोजी एक वेगळी चौकशी समिती नियुक्त केली. त्यानंतर दि.३ जूनला उपसंचालकांकडून कागदपत्रांची पडताळणी झाली. दि.५ जूनला अहवाल सादर केला. त्यानंतर आयुक्तांना शिस्तभंगाच्या कारवाईची शिफारस केली होती. त्याप्रमाणे दि.१ जुलै बुधवार बीडमध्ये ६ जणांच्या निलंबनाचे आदेश काढण्यात आले असून त्यांना तातडीने कार्यमुक्तही आरोग्य प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

डॉक्टरांना कामचुकारपणा भोवला

केज येथील शासकीय रुग्णालयातील नोकरीत कामचुकारपणा आणि निष्काळजीपणा केल्याप्रकरणी सहा जणांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. यामध्ये डॉ. दत्तात्रय रामदास केंद्रे (वैद्यकीय अधीक्षक), डॉ. प्रणिता गंगाधर पाटील (भूलतज्ज्ञ), डॉ. स्वाती संजय साखरे (स्त्रीरोगतज्ज्ञ), शिवकांता रामभाऊ गवळी (अधिसेविका, अपघात विभाग), अनिता बाबासाहेब मोराळे (अधिपरिचारिका, अपघात विभाग) आणि वैशाली पंडित पारखे (अधिपरिचारिका, अपघात विभाग) यांचा समावेश आहे. या तिन्ही डॉक्टरांना निलंबन काळात जिल्हा रुग्णालय, नांदेड हे मुख्यालय देण्यात आले आहे. तसेच अनिता मोराळे आणि वैशाली पारखे या दोन्ही अधिपरिचारिका कंत्राटी असल्याने त्यांची सेवेतून कार्यमुक्त करण्यात आली आहे. त्यामुळे उपजिल्हा रुग्णालयातील आरोग्य अधिकारी आणि कर्मचारी यांना कामचुकारपणा चांगलाच भोवला आहे.

कामचुकार डॉक्टरांवर कारवाई झाली आता पोलिसांवर कारवाई कधी?

प्रकरणात केवळ आरोग्य विभागच नाही , तर केज पोलिसही तितकेच दोषी असल्याचा आरोप पीडितेच्या पालकांनी केला आहे. तक्रार देण्यासाठी रात्रभर पीडितेला पोलिस ठाण्याच्या पायऱ्यांवर बसवून ठेवण्यात आले, तसेच तिला कोणतेही समुपदेशन किंवा आधार दिला गेला नाही. या असंवेदनशील पोलिसांवरही कठोर कारवाई करण्याची मागणी सामाजिक कार्यकर्ते अशोक तांगडे, मनीषा तोकले आणि तत्त्वशील कांबळे यांनी केली होती. परंतु, पोलिसांनी अद्याप कोणावरही कारवाई केलेली नाही. ‘आरोग्य विभागाप्रमाणे जर गृह विभागाने आणि पोलिसांनी तत्परता दाखवली असती, तर आम्हाला खरा न्याय मिळाला असता,’ अशी प्रतिक्रिया पीडितेच्या नातेवाइकांनी व्यक्त केली आहे .तरी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस संबंधित कामचुकारपणा करणाऱ्या पोलीस अधिकारी आणि कर्मचारी यांच्यावर कारवाई करण्याची मागणी नातेवाईकासह सर्वत्र केली जात आहे.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×