“भटक्या कुत्र्याच्या हल्ल्यात
पादचारी जखमी, मालकिणीवर गुन्हा दाखल”
marathinews24.com
पुणे – श्वानाने पादचारी तरुणाचा चावा घेतल्याची घटना बुधवार पेठेत घडली. तरुणाला झालेल्या दुखापतीस जबाबदार ठरल्याप्रकरणी विश्रामबाग पोलिसांनी एका महिलेविरुद्ध गु्न्हा दाखल केला. नीरज प्रकाश पाटील (वय २३, रा. सिद्धी सोसायटी, साने चोैक, आकुर्डी) याने विश्रामबाग पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्याने दिलेल्या फिर्यादीनुसार श्वानाची मालकिण मनीषा मालेगावकर (रा. करमरकर वाडा, रतन चित्रपटगृहाजवळ, बुधवार पेठ) हिच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
ससूनच्या बै. जी. वैद्यकीय महाविद्यालयात दोघांना लाच घेताना पकडले
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नीरज हा मंगळवारी (१ एप्रिल) सायंकाळी पावणेपाचच्या सुमारास बुधवार पेठेतील रतन चित्रपटगृहाजवळील गल्लीतून निघाला होता. त्यावेळी पाळीव श्वानाने नीरज याच्या अंगावर उडी मारून त्याच्या कंबरेचा चावा घेतला. त्यानंतर त्याने पोलिसांकडे तक्रार दिली. गंभीर दुखापत केल्याप्रकरणी श्वान मालकिण मालेगावकर यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला. पोलीस हवालदार साबळे तपास करत आहेत.
पाळीव, भटक्या श्वानाकडून पादचाऱ्यांच्या चावा घेण्याचे प्रकार वाढले
शहरातील विविध भागात पाळीव, भटक्या श्वानाकडून पादचाऱ्यांच्या चावा घेण्याचे प्रकार वाढले आहेत. पाळीव श्वानाने चावा घेतल्याने वादावादीच्या घटना घडतात. यापूर्वी अशा प्रकारचे गुन्हे पोलिसांकडून दाखल करण्यात आले आहेत.