Breking News
राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त पुण्यात क्रीडा जागृती प्रभातफेरीऔषध निर्मिती कंपनीत नोकरीच्या आमिषाने ४ लाखांची फसवणूकविश्रांतवाडीत कौटुंबिक वादातून मुलाकडून आईचा खूनपुणे जिल्ह्यातही ‘प्लाझ्मा’, ‘लेझर’ झोतांवर बंदीराज्यातील 404 नागरिक सुरक्षित व 338 संपर्कात; प्रवास सुविधा व मदतीचे नियोजन सतर्कतेने करण्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देशहातमाग, स्थानिक कारागिरांसाठी केंद्र सरकारचा पुढाकारबिबवेवाडी परिसरात वैमनस्यातून तरुणावर शस्त्राने वारविवाहविषयक संकेतस्थळावरील ओळख महागातबेकायदा सावकारीतून कोट्यवधींची वसुली; तिघांविरुद्ध गुन्हाकस्टमने पकडल्याचे सांगून तरुणीची २२ लाखांची फसवणूक

चोरी करणारा घरगडी अटकेत; ३० लाखांचे दागिने जप्त

चोरी करणारा घरगडी अटकेत; ३० लाखांचे दागिने जप्त

डेक्कन पोलिसांनी ठोकल्या बेड्या

marathinews24.com

पुणे – वयोवृद्ध घर मालकीण असल्याची संधी साधून घरातील २० तोळे दागिने चोरून नेणाऱ्या घरगड्याला डेक्कन पोलिसांनी अटक केली आहे. आरोपीकडून २० तोळे सोन्या- चांदीचे दागिने, असा ३० लाख रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे.शहाजी लक्ष्मण ढोबळे (वय ५१, रा. जनवाडी, पुणे) असे अटक केलेल्या चोरट्याचे नाव आहे. डेक्कन पोलिसांनी घरफोडीच्या गुन्ह्याचा अवघ्या काही दिवसांत छडा लावत घरातील कामगारालाच अटक केली आहे.

अंगावर खाजेची पावडर टाकली, पुण्यात वारकर्‍यांना लुटले – सविस्तर बातमी 

वयोवृद्ध महिलेच्या खोलीतील कपाटातून २० तोळे सोन्याचे आणि चांदीचे दागिने चोरल्याची तक्रार डेक्कन पोलिसांकडे दाखल झाली होती. तपासादरम्यान पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेजसह तांत्रिक माहितीच्या आधारे संशयित शहाजी ढोबळे याला ताब्यात घेतले. चौकशीत त्याने चोरीची कबुली दिल्यानंतर १० जुलैला त्याला अटक केली. ही कारवाई पोलीस उपायुक्त कृषीकेश रावले, सहायक पोलीस आयुक्त अनुजा देशमाने, वरिष्ठ पोलीस निरीक्षक रुणाल मुल्ला, पोलीस निरीक्षक सपना देवतळे, उपनिरीक्षक अजय भोसले दत्तात्रय शिंदे, प्रशांत पवार, राजेंद्र मारणे, सचिन गायकवाड, सागर घाडगे, वसीम सिद्दीकी, महेश काळे, संजय दंडगुळे, स्वप्नील गायकवाड, धनश्री सुपेकर यांच्या पथकाने केली.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×