गणेश खामगळ यांनी अध्यक्षपदाची जबाबदारी स्वीकारली
marathinews24.com
पुणे – लायन्स क्लब ऑफ पूना शिवाजीनगरच्या पदग्रहण समारंभात मिटकॉनचे संचालक व कौशल्य विकास तज्ञ डॉ. गणेश खामगळ यांची अध्यक्षपदी निवड करण्यात आली. एमडी ३२३४ चे आयडी एनडॉरसी,४डी पीएमजेएफ लायन सीए जितेंद्र मेहता यांच्या शुभहस्ते हा समारंभ अत्यंत भव्य व उत्साहात पार पडला.
कार्यक्रमात लायन डॉ. गणेश खामगळ यांनी अध्यक्षपदाची जबाबदारी स्वीकारली. सचिवपदी लायन सीए स्वप्नील बचुटे आणि कोषाध्यक्षपदी लायन स्नेहल मांडवकर यांची निवड झाली. या प्रसंगी मुख्य अतिथी म्हणून एमजेएफ, माजी प्रांतपाल व आंतरराष्ट्रीय प्रशिक्षक लायन डॉ. ज्योती तोष्णीवाल,क्लबचे संस्थापक व माजी प्रांतपाल,एमजेएफ लायन डॉ. अनिल तोष्णीवाल,माजी परिषद कोषाध्यक्ष ला.शरदचंद्र पाटणकर,जिल्हा कॅबिनेट व झोनचे अधिकारी पदाधिकारी,निमंत्रित पाहुणे,क्लबचे पदाधिकारी व सदस्य इत्यादी मान्यवर उपस्थित होते.
नवनिर्वाचित अध्यक्ष डॉ. खामगळ यांनी आपल्या भाषणात सांगितले की, लायन्स क्लबच्या माध्यमातून युवकांना कौशल्याधिष्ठित रोजगार निर्मिती,उद्योजकता प्रशिक्षण,पर्यावरण संवर्धन,सायबर सुरक्षेची जनजागृती व शाश्वत विकासाच्या दिशेने भक्कम पावले टाकण्यात येतील.
या समारंभात क्लबच्या सेवाभावी उपक्रमांचे उद्घाटन करण्यात आले.ला.एस बी मंत्री व सायबर तज्ञ डॉ शिरीष देशपांडे यांचे पुढाकारातून सायबर सुरक्षा जनजागृती अभियान,दृष्टीहीन विद्यार्थ्याचा विशेष प्राविण्याबद्दल गौरव,कोथरूड अंधशाळा,मातोश्री वृद्धाश्रम, सोफोश आणि मतिमंद मुलांच्या शाळेस देणग्या वितरित करण्यात आल्या. आंतरराष्ट्रीय शेव्हरॉन पुरस्कार प्राप्त लायन भरतभाई शहा व लायन निलीमा भोसले यांचा सन्मान करण्यात आला.
गतवर्षीच्या कार्याचा आढावा माजी अध्यक्ष लायन निलेश कुलकर्णी यांनी सादर केला. ध्वज अभिवादन लायन रेखा हेन्द्रे,क्रायक्रमाचे स्वागत लायन गिरीश दंडवते,आभार प्रदर्शन लायन सीए लहुराज गंडे,सूत्रसंचालन लायन डॉ. चंद्रशेखर कुलकर्णी व लायन मानसी दंडवते यांनी केले
या भव्य समारंभाचे संयोजन लायन विजय जाजू यांच्या अध्यक्षतेखाली अत्यंत उत्तम नियोजन आणि उत्कृष्ट संघभावनेतून संपन्न झाले. लायन्स क्लब ऑफ पूना शिवाजीनगरच्या नव्या कार्यकारिणीला समाजसेवेच्या नव्या पर्वाची सुरुवात करताना सर्व स्तरांतून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.