डॉ. खेवलकरच्या मोबाईलमध्ये नको ते २५२ व्हिडीओ

डाॅ. खेवलकरांच्या निकटवर्तीयांनी पुरावे नष्ट केले

१ हजार ४९७ फोटो, मोलकरणीचेही अश्लील फोटो – राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा, रूपाली चाकणकर

marathinews24.com

पुणे – डॉ. खेवलकरच्या मोबाईलमध्ये नको ते २५२ व्हिडीओ – मद्यपान पार्टी प्रकरणात अटकेत असलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरद पवार गट) नेते एकनाथ खडसे यांचे जावई डॉ प्रांजल खेवलवकर यांच्यावर महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी खळबळजनक आरोप केले आहेत. पार्टीत असलेल्या दोन महिलानाही अटक केले होते. पोलिसांनी केलेल्या तपासात आरोपी डॉ. प्रांजल खेवलकर यांच्या मोबाईलमध्ये शेकडो मुलींसोबत अश्लील व्हिडिओ आणि फोटो असल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे मोबाईलच्या हिडन फोल्डरमध्ये २५२ व्हिडीओ सापडले असून, १ हजार ४९७ फोटो, असे १ हजार ७७९ फोटो-व्हिडीओ आहेत. यामध्ये पार्टीचे, मुलींचे अश्लील, नग्न फोटो व्हिडीओत आहेत, अशी माहिती चाकणकर यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे.

महापालिका आयुक्तांना विविध आंबेडकरी संघटनांचा पाठिंबा – सविस्तर बातमी 

मुलींना नशा करण्यास भाग पाडून, विवस्त्र करण्यात आले. त्यांच्यावर लैंगिक अत्याचार करुन व्हिडीओ काढले आहेत. व्हिडीओचा वापर मुलींना ब्लॅकमेलिंग करण्यासाठी केला आहे. तसेच घरातील साफसफाई करणाऱ्या मोलकरणीचेही वाईट अवस्थेतील फोटो चित्रित केले आहेत. दरम्यान, मुलींना पटवण्यासाठी खेवलकरने आरुष नावाचा माणूस ठेवला होता. याप्रकरणी मोठ्या प्रमाणात अनैतिक मानवी व्यापार व वाहतुकीच्या अनुषंगाने रॅकेट असल्याची शक्यता नाकारता येत नाही. म्हणून डॉ प्रांजल खेवलकर आणि त्याचे सहकारी, तसेच पार्टीत ज्या मुली उपस्थित होत्या, त्या दोन वर्षांपासून संपर्कात होत्या. त्यामुळे पार्टीत गांजा, अंमली पदार्थ घेऊन येण्याची त्यांना पूर्वकल्पना होती. त्याअनुषंगाने झालेले चॅटिंग आहे, असेही चाकणकर यांनी सांगितले आहे.

ठिकठिकाणी केले मुलींसोबत लैंगिक अत्याचार

डॉ. प्रांजल खेलवकर याने खराडीतील, गोवा, लोणावळा, साकीनाका आणि जळगावमधील हॉटेलमध्ये मुलींना बोलावून पार्टी केल्या आहेत. मोबाईल फोल्डरमध्ये महिलांचे आक्षेपार्ह फोटो, व्हिडीओ आहेत. संबंधित मुलींसोबत लैंगिक अत्याचार झाल्याचे दिसून येते. काही मध्यस्थांमार्फत खेवलकरने संपर्क करुन मुली पार्टीसाठी बोलवल्या असल्याचे चॅटमधून स्पष्ट झाले आहे.

चित्रपटात काम मिळवून देण्याची बतावणी अन सेक्स

खेवलकरच्या चॅटमध्ये महिलांसोबत आपत्तीजनक चॅटिंग आहे. मुलींसोबत सिनेमामध्ये शूटिंग करण्याच्या निमित्ताने संपर्क साधला होता. मुलींना चित्रपटात काम देतो असं आश्वासन देवून बोलावले जात होते. त्यांचा वापर करुन घेतल्यानंतर त्यांच्या खर्चाचे सुद्धा पैसे दिले नाहीत. यामुळे मुलींनी वारंवार पैशांची मागणी केल्याचे पोलीस तपासात स्पष्ट झाले आहे.

४२ लाखांचा ऐवज केला होता जप्त

डॉ प्रांजल खेवलकर, निखिल पोपटानी, समीर फकीर, मोहम्मद सय्यद, सचिन भोंबे, श्रीपाद मोहम्मद यादव यांच्यासोबत असलेल्या दोन महिला यांना पोलिसांनी ताब्यात घेतले होते. त्यांच्याकडे असलेले कोकेन,गांजा, १० मोबाईल, मोटारी, हुक्का पॉट, दारुच्या बाटल्या असा ४२ लाख ३५ हजारांचा ऐवज जप्त केला होता.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 403
  • Message : The request cannot be completed because you have exceeded your quota.
error: Content is protected !!
Scroll to Top
×