डॉ. किरण मोघे माहिती उपसंचालकपदी रुजू
marathinews24.com
पुणे – माहिती व जनसंपर्क महासंचालनालयातील अहिल्यानगर जिल्ह्याचे जिल्हा माहिती अधिकारी डॉ. किरण मोघे यांची माहिती उपसंचालकपदी पदोन्नती झाल्याने त्यांनी पुणे विभागीय माहिती उपसंचालक पदाचा कार्यभार स्विकारला. प्रभारी उपसंचालक श्रीमती वर्षा पाटोळे यांच्याकडून त्यांनी उपसंचालक पदाचा पदभार स्विकारला.डॉ. मोघे हे यापूर्वी मुख्यमंत्री सचिवालयात जनसंपर्क अधिकारी तथा माहिती अधिकारी म्हणून तर नांदेड, रत्नागिरी, नंदूरबार, अहिल्यानगर तसेच पुणे येथे जिल्हा माहिती अधिकारी पदावर कार्यरत होते. त्यांच्याकडे नाशिक विभागीय माहिती उपसंचालक पदाचा अतिरिक्त कार्यभारही देण्यात आला आहे.
सर्वांगीण निरोगी महाराष्ट्र घडवण्यासाठी शासन कटिबद्ध; उपमुख्यमंत्री अजित पवार – सविस्तर बातमी
प्रभारी उपसंचालक श्रीमती पाटोळे यांनी प्रभारी उपसंचालक म्हणून चांगले काम केल्याचे यावेळी उपसंचालक डॉ. मोघे यांनी नमूद केले. सामुहीक प्रयत्नातून सर्वांनी कार्यालयाचे कामकाज अधिक चांगले होईल असे प्रयत्न करावे, असे आवाहन त्यांनी केले. श्रीमती पाटोळे आणि कार्यालयातीलअधिकारी-कर्मचाऱ्यांनी डॉ.मोघे यांना शुभेच्छा दिल्या.यावेळी जिल्हा माहिती अधिकारी डॉ.रविंद्र ठाकूर, माहिती अधिकारी सचिन गाढवे,प्रदर्शन सहायक विलास कसबे, वरिष्ठ लिपिक सचिन बहुलेकर, वैशाली रांगणेकर, स्वाती साळुंके, सुहास सत्वधर, सुवर्णा पालकर, आराध्या लोंढे, रावजी बांबळे, वर्षा कोडलिंगे उपस्थित होते.