Breking News
‘बाल्यावस्थेतील प्रारंभिक विकास’ विषयावरील कार्यशाळेचे मुख्य सचिव राजेशकुमार अग्रवाल यांच्या हस्ते उद्घाटनराष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त पुण्यात क्रीडा जागृती प्रभातफेरीऔषध निर्मिती कंपनीत नोकरीच्या आमिषाने ४ लाखांची फसवणूकविश्रांतवाडीत कौटुंबिक वादातून मुलाकडून आईचा खूनपुणे जिल्ह्यातही ‘प्लाझ्मा’, ‘लेझर’ झोतांवर बंदीराज्यातील 404 नागरिक सुरक्षित व 338 संपर्कात; प्रवास सुविधा व मदतीचे नियोजन सतर्कतेने करण्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देशहातमाग, स्थानिक कारागिरांसाठी केंद्र सरकारचा पुढाकारबिबवेवाडी परिसरात वैमनस्यातून तरुणावर शस्त्राने वारविवाहविषयक संकेतस्थळावरील ओळख महागातबेकायदा सावकारीतून कोट्यवधींची वसुली; तिघांविरुद्ध गुन्हा

दारूच्या नशेत नागरिकांसह व्यापार्‍यांना शिवीगाळ भोवली

पुणे पोलीस दलातील २५ अधिकारी-अंमलदारांना केंद्रीय गृहमंत्र्यांचे सेवा पदक

पुण्यातील गुन्हे शाखेचे ४ अंमलदार निलंबित

marathginews24.com

पुणे – दारुच्या नशेत नागरिकांसह व्यापार्‍यांशी गैरवर्तन करीत शिवीगाळ करणार्‍या गुन्हे शाखेतील ४ कॉप्स बीट मार्शलांना तडकाफडकी निलंबित करण्यात आले आहे़. पोलीस अंमलदार योगेश सुरेश माळी, मुकेश श्रीधर वाळले, शंकर दत्ता धोत्रे, कैलास शेषराव फुपाटे अशी निलंबित केलेल्या पोलीस अंमलदारांची नावे आहेत.

युसीआय मानकांनुसार पुणे ग्रँड चॅलेज टूर सायकलिंग स्पर्धेची सुरक्षात्मक उपाययोजना करा-जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी – सविस्तर बातमी 

विश्रांतवाडी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील आळंदी रोड पोलीस चौकीत ११ नोव्हेंबरला रात्री नऊच्या सुमारास हद्दीतील काही नागरिक, व्यापारी कामानिमित्त चौकीस गेले होते. त्यावेळी अंमलदार योगेश माळी, मुकेश वाळले, शंकर धोत्रे, कैलास फुपाटे हे दारु पिऊन त्याठिकाणी गेले. आम्ही पोलीस आहे, आमचे कोणी काहीही करु शकत नाही, आमचेकडे पैसे मागितले तर तुम्हाला हद्दीत धंदा करुन देणार नाही, असे बोलून नागरिकांना त्यांनी शिवीगाळ केली.

याप्रकरणी तक्रार प्राप्त झाल्यानंतर १२ नोव्हेबरला त्यांना हजेरीवर विचारणा करण्यात आली. त्यांनी समाधानकारक उत्तर दिले नसल्याने पोलीस उपनिरीक्षक अनिल पाडेकर यांनी विश्रांतवाडी पोलीस ठाण्यात दैंनदिनीत नोंद घेतली. याप्रकरणी वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांनी वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांना अहवाल सादर केला.

अहवालानुसार पोलिसांनी कर्तव्यावर असताना बेजबाबदार, बेफिकीर व जनमानसांत पोलिसांची प्रतिमा मलिन व नैतिक अध:पतनाचे गैरवर्तन केल्याचे दिसून आले. त्यापार्श्वभूमीवर संबंधित चारही पोलीस अमलदारांना निलंबित करण्यात आल्याचे आदेश पोलीस उपायुक्त निखिल पिंगळे यांनी दिले.

शिवीगाळ भोवली अन नोकरी गमावली

गुन्हे शाखेतील कॉप्स २४ बीट मार्शल म्हणून नेमणुकीला असलेल्यांनी “आम्ही पोलीस आहे, आमचे कोणी काहीही करु शकत नाही, आमचेकडे पैसे मागितले तर तुम्हाला हद्दीत धंदा करु देणार नाही,” असे म्हणत नागरिकांना शिवीगाळ केली होती.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×