Breking News
दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्ट’ला ‘अ’ वर्ग पर्यटन क्षेत्राचा दर्जापैशाच्या वादातून वडिलांनीच मुलावर अ‍ॅसिड फेकलेपुढील वर्षापासून ‘पुणे कृषी नवसंकल्पना स्पर्धा’ राज्यव्यापी; प्रथम पुरस्कार दिवंगत अजित पवार यांच्या नावाने देणार – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसयेवलेवाडी परिसरात चिमुरडीवर अत्याचारपुणे महानगरपालिकेच्या विविध प्रकल्पांचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते लोकार्पणबिबवेवाडीत मसाज पार्लरच्या नावाखाली देहविक्रयगांजा विक्री करणारे रिक्षाचालक गजाआडआपुलकी कर्करोग रूग्णालयाचा प्रकल्प मैलाचा दगड ठरेल-मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसकोयत्याचा धाक दाखवून दाम्पत्याला शिवीगाळ, आरोपीला अटकखडकवासल्यात ‘हिट अँड रन’ मोटारीच्या धडकेत बालकाचा मृत्यू

राज्य शासनाच्या 150 दिवसांच्या कार्यक्रमाची जिल्ह्यात प्रभावी अंमलबजावणी

गॅस सिलेंडरचे वितरण फक्त OTP द्वारेच होणार ; ९६ तासांत होणार घरपोच

अनुकंपा उमेदवारांची नियुक्तीसाठी शिफारस

marathinews24.com

पुणे – राज्य शासनाने जाहीर केलेल्या 150 दिवसांच्या कार्यक्रमांतर्गत जिल्ह्यातील विविध शासकीय योजना व उपक्रमांचा प्रभावी अंमल सुरू असून या कार्यक्रमात अनुकंपा तत्त्वावरील नियुक्ती हा एक महत्वाचा उपक्रम ठरला आहे. जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांच्या मार्गदर्शनाखाली या उपक्रमाला गती देण्यात आली असून यामुळे जिल्ह्यातील विविध शासकीय कार्यालयांना आवश्यक मनुष्यबळ उपलब्ध होण्याबरोबरच दिवंगत कर्मचाऱ्यांच्या कुटुंबियांना रोजगाराची संधी मिळणार आहे.

भारतीय संस्कृतीत स्त्रीला प्रथम स्थान- मंत्री चंद्रकांत पाटील – सविस्तर बातमी

पुणे जिल्हाधिकारी कार्यालय येथे 3 सप्टेंबर रोजी पार पडलेल्या विशेष मेळाव्यात उमेदवारांना शासन निर्णय, नियमावली व नियुक्ती प्रक्रिया याबाबत सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले होते. उमेदवारांचा पसंतीक्रम निश्चित करून नियुक्तीसाठी संबंधित विभागांकडे शिफारसी पाठविण्यात आल्या आहेत. त्यानुसार विभागीय स्तरावर कागदपत्रांची पडताळणी पूर्ण करून पात्र उमेदवारांना नियुक्तीपत्रे देण्याची कार्यवाही सुरू आहे. गट-क पदाकरिता प्रतिक्षा यादीतील 162 उमेदवारांपैकी 97 उमेदवारांना नियुक्तीकरिता शिफारस करण्यात आली असून गट-ड पदाकरिता प्रतिक्षा यादीतील 241 उमेदवारांपैकी 147 उमेदवारांना नियुक्ती देण्याची प्रक्रिया सुरू आहे. याशिवाय जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत अन्य नियुक्ती प्राधिकाऱ्यांकडे आणखी 46 उमेदवारांची शिफारस पाठविण्यात आली आहे.

जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी या प्रक्रियेत पारदर्शकता, गती आणि सर्वसमावेशकतेवर विशेष भर दिला आहे. ते म्हणाले की, “शासनाच्या 150 दिवसांच्या कार्यक्रमाअंतर्गत अनुकंपा नियुक्ती प्रक्रियेत गती आणून पात्र उमेदवारांना रोजगार उपलब्ध करून देणे हा आमचा मुख्य उद्देश आहे. या माध्यमातून दिवंगत कर्मचाऱ्यांच्या कुटुंबियांना आर्थिक आधार मिळेल आणि त्यांचे पुनर्वसन सुलभ होईल. त्याचबरोबर शासकीय कार्यालयांना आवश्यक मनुष्यबळही उपलब्ध होऊन कामकाजात गती येईल. जिल्ह्यात ही प्रक्रिया पारदर्शक व सुलभ पद्धतीने राबविण्यात येत असून सर्व संबंधित विभागांनी समन्वयाने ही कार्यवाही वेळेत पूर्ण करावी.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 403
  • Message : The request cannot be completed because you have exceeded your quota.
error: Content is protected !!
Scroll to Top
×