Breking News
पुण्यातील किडनी रॅकेटमध्ये ससूनमधील डाॅ. अजय तावरे सहआरोपीपुणे पोलिस दलात दाखल होणार मोबाईल सर्वेलन्स व्हेईकलपुण्यातील बालेवाडीतील श्री शिवछत्रपती क्रीडा संकुलाचे गुगल मॅपवर बदलले नावट्रिलियन डॉलर अर्थव्यवस्थेसाठी कायदा व सुव्यवस्था राखणे प्रथम कर्तव्य-मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसगावगुंडांचा मुलाहिजा ठेउ नका- पोलीस आयुक्त अमितेश कुमारलिव्ह इनमध्ये राहणार्‍या प्रियेसीचा गळा घोटलाआम्ही स्वतः हुन सुमोटो तक्रार दाखल केली, महिला आयोगावर टीका करणे अयोग्य- रूपाली चाकणकरसुनेच्या आत्महत्या प्रकरणात हगवणे पिता-पुत्राला पोलीस कोठडीमान्सून काळात आपत्तीवर सर्व विभागांनी समन्वयाने मात करावी; विधानसभा उपाध्यक्ष अण्णा बनसोडेट्रक चालकाला धमकावून १० हजारांची केली वाटमारी

पुण्यात वेगवेगळ्या अपघातात पादचारी ज्येष्ठांचा मृत्यू

पुणे-सोलापूर रस्ता, तसेच येरवडा भागात दोन वेगवेगळ्या घटना

marathinews24.com 

पुणे – शहरात वेगवेगळ्या अपघातात भरधाव वाहनाच्या धडकेत पादचारी ज्येष्ठ नागरिकांचे मृत्यू झाल्याच्या घटना घडल्या. पुणे-सोलापूर रस्ता, तसेच येरवडा भागात अपघाताच्या घटना घडल्या. याप्रकरणी वाहनचालकांविरुद्ध हडपसर आणि येरवडा पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

मैत्रिणीचा गळा दाबून केला खून; आरोपी यवत पोलीस ठाण्यात हजर – सविस्तर बातमी 

नगर रस्त्यावरील येरवडा भागातील शास्त्रीनगर चौकात भरधाव वाहनाच्या धडकेत पादचारी ज्येष्ठ नागरिकाचा मृत्यू झाल्याची घटना घडली. अमोघी भिमप्पा बिसनाळे (वय ७२, रा. वडारवस्ती, येरवडा) असे मृत्युमुखी पडलेल्या पादचार्‍याचे नाव आहे. याबाबत त्यांचा मुलगा परशुराम (वय ३९) यांनी येरवडा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेया माहितीनुसार, अमोघी बिसनाळे हे मंगळवारी (२० मे) सकाळी नऊच्या सुमारास येरवड्यातील शास्त्रीनगर चौकातून निघाले होते.

नगर रस्त्यावरील श्री हॉस्पिटलसमोरुन ते रस्ता ओलांडत होते. त्यावेळी भरधाव वाहनाने त्यांना धडक दिली. अपघातानंतर घटनास्थळावरुन वाहनचालक पसार झाला. अपघातात गंभीर जखमी झालेल्या बिसनाळे यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. पसार झालेल्या वाहन चलाकाचा शोध घेणात येत असून, सहायक पोलीस निरीक्षक दिनेश पाटील तपास करत आहेत.

पुणे-सोलापूर रस्त्यावर रवीदर्शन चौकात भरधाव टेम्पोच्या धडकेत पादचारी ज्येष्ठ महिलेचा मृत्यू झाल्याची घटना घडली. विमलाबाई मथुराप्रसाद अगरवाल (वय ८२, रा. लोणावळा) असे मृत्युमुखी पडलेल्या ज्येष्ठ महिलेचे नाव आहे.याप्रकरणी टेम्पोचालक विनोद भगवान गायकवाड (वय ४५, रा. लोणी काळभोर) याला अटक करण्यात आली. मनोज अगरवाल (वय ३८, रा. लोणावळा) यांनी हडपसर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अगरवाल मूळचे लोणावळ्यातील आहेत.

ते कामानिमित्त हडपसर भागात नातेवाईकांकडे आले होते. सोलापूर रस्त्यावरील रवीदर्शन चौकात गुरुवारी (२२ मे) विमलाबाई रस्ता ओलांडत होत्या. त्या वेळी भरधाव टेम्पोने रस्ता ओलंडाणार्‍या विमलाबाई यांना धडक दिली. गंभीर जखमी झालेल्या विमलाबाई यांचा मृत्यू झाला. टेम्पोचालकाला पकडून नागरिकांनी पोलिसांच्या ताब्यात दिले. सहायक पोलीस निरीक्षक हसीना शिकलगार तपास करत आहेत.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 403
  • Message : The request cannot be completed because you have exceeded your quota.
error: Content is protected !!
Scroll to Top