चोरट्याविरुद्ध फरासखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
marathinews24.com
पुणे– Crime News : श्री साईबाबा पालखी सोहळ्यात ज्येष्ठ महिलेची ९१ हजार रुपयांची सोनसाखळी चोरट्यांनी लांबविल्याची घटना फडके हौद परिसरात घडली. याप्रकरणी ज्येष्ठ महिलेने फरासखाना पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तक्रारदार महिला नारायण पेठेत राहायला असून, गुरुपौर्णिमेनिमित्त श्री साईबाबा पालखी सोहळ्याचे दर्शन घेण्यासा’ी रविवारी (२९ जून) सकाळी साडेअकराच्या पालखी सोहळ्यात सहभागी झाली.
मावळचे माजी आमदार कृष्णराव भेगडे यांचे निधन – सविस्तर बातमी
पालखी सोहळ्यात दर्शन घेत असतासा’ी गर्दीचा फायदा घेउन चोरट्यांनी ज्येष्ठ महिलेच्या गळ्यातील ९१ हजारांची सोनसाखळी चोरून नेली. सोनसाखळी चोरीला गेल्याचा प्रकार उघडकीस आल्यानंतर महिलेने पोलिसांकडे तक्रार दिली. पोलीस उपनिरीक्षक गोरे तपास करत आहेत. दरम्यान, मागील काही दिवसांपुर्वी पुणे मुक्कामी असलेल्या पालखी सोहळ्यात गर्दीचा फायदा घेउन दागिने हिसकावणार्या टोळीला पुणे गुन्हे शाखेने अटक केली होती. त्यांच्याकडून दागिने, मोबाइल असा ऐवज जप्त केला होता. घटनेनंतर पोलिसांनी महिलांना आवाहन केले असून, गर्दीत जाताना दागिने न घालण्याच्या सूचना दिल्या आहेत.
पीएमपीएल प्रवासी महिलेचे दागिने चोरीला
Crime News : पीएमपी प्रवासी महिलेच्या पिशवीतून २ लाख १२ हजार रुपयांचे सोन्याचे दागिने चोरल्याची घटना उघडकीस आली. याबाबत महिलेने विमनातळ पोलीस ‘ाण्यात फिर्याद दिली आहे. तक्रारदार महिला लोहगाव भागात राहायला आहेत. कात्रज ते लोहगाव या मार्गावरील बसमधून प्रवास करत असताना, चोरट्यांनी गर्दीचा फायदा घेउन महिलेच्या पिशवीतून २ लाख १२ हजार ३०० रुपयांचे सोन्याचे दागिने चोरून नेले. बसमधून उतरताना महिलेला पिशवीत दागिने नसल्याचे दिसून आले. त्यानंतर त्यांनी विमानतळ पोलीस ‘ाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली आहे. याप्रकरणी पोलीस उपनिरीक्षक घागरे तपास करत आहेत.
लोणी काळभोरमध्ये लावला इराणचा ध्वज, खामेनींचा फलक
Crime News : इराण-इस्त्राइलमधील तणाव कायम असताना पुणे-सोलापूर महामार्गावरील लोणी काळभोर परिसरात इराणचा ध्वज आणि अयातुल्लाह खामेनी यांचे छायाचित्र असलेला फलक लावल्याने खळबळ उडाली आहे. पोलिसांच्या निदर्शनास हा प्रकार आल्यानंतर ध्वज आणि खामेनी यांचा फलक काढून टाकण्यात आला. पुणे-सोलापूर महामार्गावर लोणी काळभोर परिसरात इराणचा ध्वज आणि खामेनी यांचे छायाचित्र असलेले फलक लावण्यात आले होते. त्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता.
पोलिसांनी संबंधित फलक आणि ध्वज काढून टाकला. ध्वज आणि फलक लावणार्यांचा पोलिसांकडून शोध घेण्यात येत आहे. हे फलक लोणी काळभोर ग्रामपंचायतीची परवानगी न घेता लावण्यात आले होते. त्यानंतर ग्रामपंचायतीकडून संबंधितांना नोटीस बजाविण्यात आली आहे. पोलिसांकडून याप्रकरणाची चौकशी करण्यात आली. तेव्हा मुस्लीम बांधवांच्या मोहरम सणाच्या पार्श्वभूमीवर हे फलक ए वस्तीजवळ लावण्यात आले होते. याप्रकरणाचा तपास सुरू असल्याची माहिती परिमंडळ पाचचे पोलीस उपायुक्त डॉ. राजकुमार शिंदे यांनी दिली.