स्वारगेट एसटी स्थानकाच्या आवारातील घटना
Marathinews24.com
पुणे – ज्येष्ठ महिलेच्या गळ्यातील ५० हजारांचे सोन्याचे दागिने चोरट्यांनी चोरुन नेल्याची घटना स्वारगेट एसटी स्थानकाच्या आवारात घडली. याबाबत
ज्येष्ठ महिलेने स्वारगेट पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. तक्रारदार ज्येष्ठ महिला मावळ तालुक्यातील कान्हे फाटा परिसरात राहायला आहेत. त्या १३ एप्रिल रोजी सकाळी साडेसातच्या सुमारास स्वारगेट एसटी स्थानकाच्या आवारात आल्या.
घर खाली करण्यासाठी दबावांना टोळके विरुद्ध गुन्हा दाखल – सविस्तर बातमी
सोलापूरकडे जाणाऱ्या बसमध्ये प्रवेश करत होत्या. बसमध्ये गर्दी होती. त्यावेळी चोरट्याने त्यांच्या गळ्यातील ५० हजारांचे मंगळसूत्र चोरून नेले. पोलीस उपनिरीक्षक जाधव तपास करत आहेत. प्रवासी तरुणाला चाकूचा धाक दाखवून चोरट्यांनी त्याच्याकडील दीड लाख रुपयांचा मोबाइल चोरून नेल्याची घटना नुकतीच मुंबई-पुणे रस्त्यावरील वाकडेवाडी एसटी स्थानक परिसरात घडली होती. एसटी स्थानकाच्या आवारातील चोरी, लूटमारीच्या घटना रोखण्यासाठी गस्त घालण्याच्या सूचना पोलिसंना देण्यात आल्या आहेत. गस्त वाढविल्यानंतर एसटी स्थानकाच्या आवारात प्रवाशांकडील ऐवज, लॅपटाॅप चोरून नेण्याचे सत्र कायम आहे.