Breking News
भारतीय संस्कृती, कलेचा प्रसार जगभर व्हावा- दिग्पाल लांजेकरदिड दिवसाचे गणपती बाप्पांचे विसर्जन; वानवडीत घरामध्ये आगीची घटनागणेश मंडळाच्या माध्यमातून शासकीय योजनांच्या जनजागृतीसाठी लोकसंवाद अभियानराष्ट्रीय लोकअदालतीत पुणे जिल्ह्यात ३७,६८७ प्रकरणांचा सामोपचाराने निपटारापिंपरी-चिंचवडमध्ये १६ ते २९ सप्टेंबरदरम्यान मनाई आदेशभीमाशंकर मंदिर व परिसराच्या आराखड्याची प्रभावी अंमलबजावणी करा-जिल्हाधिकारी जितेंद्र डुडीपशुधन विमा योजनेसाठी अर्ज मागविण्यास सुरुवात तंत्रज्ञानाला श्रद्धेची जोड; नोबल कास्टमध्ये ॲल्युमिनियमपासून साकारला गणरायाअतिक्रमण विभागातील कर्मचाऱ्यांना धक्काबुक्कीपेन्शन कार्डच्या आमिषाने ज्येष्ठाची २४ लाखांची फसवणूक

कर्वेनगर परिसरात जेष्ठ महिलेचे मंगळसूत्र हिसकावले

रस्त्यावर तपासणी सुरू आहे, तुमचे दागिने काढून ठेवा...

चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल

marathinews24.com

पुणे – शहरातील कर्वेनगर परिसरात पादचारी ज्येष्ठ महिलेच्या गळ्यातील मंगळसूत्र दुचाकीस्वार चोरट्यांनी हिसकावून नेल्याची घटना घडली. याप्रकरणी दुचाकीस्वार चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत एका ज्येष्ठ महिलेने वारजे माळवाडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

चारच्या पुढे बेस-टॉप वाढविल्यास गुन्हा दाखल; साऊंड सिस्टिम जप्त – सविस्तर बातमी

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार ७० वर्षीय महिला कर्वेनगरमधील शिवगंगा काॅलनीत राहायला आहेत. त्या मंगळवारी (१ सप्टेंंबर) रात्री साडेआठच्या सुमारास शिवगंगा काॅलनीतून निघाल्या होत्या. त्यावेळी दुचाकीस्वार चोरट्यांनी त्यांच्या गळ्यातील मंगळसूत्र हिसकावून नेले. पसार झालेल्या चोरट्यांचा शेध घेण्यात येत असून, पोलीस उपनिरीक्षक संजय नरळे तपास करत आहेत.

महापालिकेच्या कचरा डेपोत ट्रकच्या धडकेत एकाचा मृत्यू

महापालिकेच्या कचरा डेपोच्या आवारात ट्रकच्या धडकेत एका सफाई कामगाराचा मृत्यू झाल्याची घटना हडपसरमधील काळेपडळ भागात घडली. याप्रकरणी ट्रक चालकाविरद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. सुनील हनुमंत गुरव (वय २७, रा. बसवकल्याण, कर्नाटक) असे मृत्युमुखी पडलेल्या कामगाराचे नाव आहे. या प्रकरणी ट्रक चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत दिनेश श्रीमंत राठोड (वय ३६, रा. कलबर्गी, कर्नाटक) याने काळेपडळ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हडपसरमधील काळेपडळ परिसरात महापालिकेचा कचरा डेपा आहे. आरोपी ट्रक चालक आणि सुनील गुरव हे महापालिकेत कंत्राटी पद्धतीवर कचरा वाहतुकीचे काम करतात. ३१ ऑगस्ट रोजी रात्री साडेअकराच्या सुमारास कचरा घेऊन आलेला ट्रक काळेपडळ येथील कचरा डेपोच्या आवारात आला. त्या वेळी कचरा डेपोत सुनील गुरव काम करत होता. अंधारात कचरा वाहतूक करणाऱ्या ट्रकने गुरव याला धडक दिली. अपघात झाल्यानंतर याबाबतची माहिती पोलिसांना न कळविता ट्रक चालक पसार झाला. या घटनेची माहिती मिळताच गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अण्णासाहेब बाबर यांनी घटनास्थळी भेट दिली.
अपघात करुन पसार झालेल्या ट्रक चालकाचे नाव निष्पन्न झाले असून, त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस उपनिरीक्षक संदीप राऊत तपास करत आहेत.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×