एसटी शिरताना जेष्ठ महिलांचे मंगळसूत्र चोरीला

बसप्रवासात चोऱ्या करणाऱ्याचा उच्छाद

गर्दीचा फायदा घेउन चोरी

marathinews24.com

पुणे – एसटीमध्ये प्रवेश करीत असताना गर्दीचा फायदा घेउन चोरट्यांनी जेष्ठ महिलांच्या गळ्यातील सोन्याच्या दागिने चोरून नेल्याच्या घटना स्वारगेट एसटी स्थानकासह हडपसर परिसरात घडल्या आहेत.याप्रकरणी स्वारगेट आणि हडपसर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

कोंढव्यात दोघांवर कोयत्याने वार – सविस्तर बातमी

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार ६५ वर्षीय महिला हिंगणे खुर्द परिसरात राहायला आहे. २५ नोव्हेंबरला सकाळी सव्वा अकराच्या सुमारास स्वारगेट एसटी स्थानकातील बसमध्ये प्रवेश करीत होती. त्यावेळी गर्दीचा फायदा घेउन चोरट्यांनी महिलेच्या गळ्यातील ५० हजारांचे सोन्याचे मंगळसूत्र चोरून नेले. याप्रकरणी पोलीस अमलदार केकाणे तपास करीत आहेत.

गावी जाण्यासाठी एसटीमध्ये प्रवेश करीत असताना गर्दीचा फायदा घेउन चोरट्यांनी जेष्ठ महिलेच्या गळ्यातील ५० हजारांचे मंगळसूत्र चोरून नेले. ही घटना २४ नोव्हेंबरला दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास हडपसर परिसरात घडली आहे. याप्रकरणी भेकराईनगर, फुरसुंगी राहणार्‍या महिलेने हडपसर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. त्यानुसार अज्ञात चोरट्यांविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस अमलदार खैरे तपास करीत आहेत.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×