Breking News
पुण्यात पीएमपी बसच्या धडकेत दोन महिलांचा मृत्यूज्येष्ठ नागरिकाची ४ लाख ४३ हजार रुपयांची फसवणूककेंद्रीय अर्थमंत्र्यांच्या ‘डीपफेक व्हिडीओद्वारे फसवणुकगाेळीबार करुन २२ तोळ्यांच्या दागिन्यांची लुटनदीपात्रात नवजात अर्भक मृतावस्थेत सापडलेपरदेशात नोकरीच्या आमिषाने नागपूरमधील महिलेची पोर्तुगालमध्ये विक्रीब्लॅक स्पॉटचे निरीक्षण करून १० ऑक्टोबरपूर्वी आवश्यक उपाययोजनांद्वारे निर्मूलन कराकर्जमुक्ती योजनेच्या लाभ वितरणास प्रारंभ; प्रत्येक पात्र शेतकऱ्यांना लाभ मिळणार – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसअन्यायाविरोधात डॉक्टरांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलनदुर्गम भागातील विद्यार्थ्यांना मदतीचा हात

पर्यावरणमंत्री पंकजा मुंडे यांना ‘डी. लिट.’ पदवी प्रदान

पर्यावरणमंत्री पंकजा मुंडे यांना 'डी. लिट.' पदवी प्रदान

पुण्यातील अजिंक्य डी वाय पाटील विद्यापीठाच्या वतीने मानाची ‘डी. लिट.’ पदवी देऊन सन्मानित

marathinews24.com

पुणे – राज्याच्या पर्यावरण व पशुसंवर्धन मंत्री पंकजा मुंडे यांना पुण्यातील अजिंक्य डी वाय पाटील विद्यापीठाच्या वतीने मानाची ‘डी. लिट.’ (मानद डॉक्टरेट) पदवी देऊन सन्मानित केले आहे. लोहगाव येथील विद्यापीठाच्या दहाव्या दीक्षांत समारंभात शनिवारी हा सोहळा पार पडला. पंकजा मुंडे यांच्या सामाजिक क्षेत्रातील योगदानाची आणि गेल्या वर्षभरातील प्रशासकीय कार्याची दखल घेत विद्यापीठाने त्यांना या सर्वोच्च पदवीने गौरविले आहे.

बारामती आगारात चालक दिन व राष्ट्रीय प्रवासी दिन संपन्न – सविस्तर बातमी 

​कार्यक्रमाला विद्यापीठाचे कुलपती डॉ. अजिंक्य पाटील, रिपब्लिक ऑफ गायनाचे हाय कमिशनर धरमकुमार सिरजी, भारत सरकारचे सल्लागार डॉ. निशिकांत ओझा, पूजा पाटील आणि आमदार बापूसाहेब पठारे यांची प्रमुख उपस्थिती होती. मंत्रिमंडळातील प्रभावी कामगिरी आणि जनहिताच्या निर्णयामुळे पंकजा मुंडे यांचे नाव सातत्याने चर्चेत असते. या दीक्षांत समारंभाला विविध क्षेत्रातील मान्यवर, प्राध्यापक, पदवीप्राप्त विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. हा बहुमान मिळाल्यानंतर सर्व स्तरांतून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×