Breking News
‘बाल्यावस्थेतील प्रारंभिक विकास’ विषयावरील कार्यशाळेचे मुख्य सचिव राजेशकुमार अग्रवाल यांच्या हस्ते उद्घाटनराष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त पुण्यात क्रीडा जागृती प्रभातफेरीऔषध निर्मिती कंपनीत नोकरीच्या आमिषाने ४ लाखांची फसवणूकविश्रांतवाडीत कौटुंबिक वादातून मुलाकडून आईचा खूनपुणे जिल्ह्यातही ‘प्लाझ्मा’, ‘लेझर’ झोतांवर बंदीराज्यातील 404 नागरिक सुरक्षित व 338 संपर्कात; प्रवास सुविधा व मदतीचे नियोजन सतर्कतेने करण्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देशहातमाग, स्थानिक कारागिरांसाठी केंद्र सरकारचा पुढाकारबिबवेवाडी परिसरात वैमनस्यातून तरुणावर शस्त्राने वारविवाहविषयक संकेतस्थळावरील ओळख महागातबेकायदा सावकारीतून कोट्यवधींची वसुली; तिघांविरुद्ध गुन्हा

बारामती आगारात चालक दिन व राष्ट्रीय प्रवासी दिन संपन्न

बारामती आगारात चालक दिन व राष्ट्रीय प्रवासी दिन संपन्न

सुरक्षित प्रवासाचा संदेश देत चालक-प्रवाशांचा सन्मान

marathinews24.com

बारामती – बारामती आगार, प्रादेशिक परिवहन विभाग बारामती व अखिल भारतीय ग्राहक पंचायत यांच्या संयुक्त विद्यमाने रथसप्तमी प्रवासी दिन व चालक दिन बारामती एस.टी. आगार आयोजित करण्यात आला. यावेळी विभागीय यंत्र अभियंता (चा.) पांडुरंग वाघमोडे, आगार व्यवस्थापक रविराज घोगरे, अखिल भारतीय ग्राहक पंचायत बारामती तालुका अध्यक्ष संजीव बोराटे, उपाध्यक्ष प्रशांत जगताप, बारामती बस स्थानक प्रमुख घनश्याम शिंदे, सहाय्यक मोटार वाहन निरीक्षक सुरज पाटील उपस्थित होते.

राष्ट्रगीतांच्या सन्मानात उदासीनता नको- लेफ्टनंट जनरल एस. एस. हसबनीस – सविस्तर बातमी 

कार्यक्रमाच्या निमित्ताने विना अपघात सुरक्षित वाहतूक सेवा देणाऱ्या चालकांचा प्रशस्तिपत्रक व गुलाबपुष्प देऊन सत्कार करण्यात आला. तसेच प्रवासी दिनानिमित्त चालक, वाहक व प्रवाशांना गुलाबपुष्प व पाणी देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला. तसेच दिलीप सरोदे (सफाईगार) यांचा शाल, श्रीफळ व गुलाबपुष्प देऊन विशेष सत्कार करण्यात आला. यावेळी तुळजाराम चतुरचंद महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी “जागरूक ग्राहक बनूया, वाहतुकीचे नियम पाळूया” या संदेशावर आधारित पथनाट्य सादर करून उपस्थितांचे लक्ष वेधले. पाटील यांनी प्रवासादरम्यान वाहतूक नियमांचे पालन, हेल्मेट व सीटबेल्टचा वापर, अतिवेग व बेदरकार वाहनचालना टाळणे याबाबत माहिती दिली. तसेच ‘राहवीर योजना’ याबाबतही मार्गदर्शन केले.

अखिल भारतीय ग्राहक पंचायतचे संजीव बोराटे व महेश पवार यांनी प्रवाशांचे हक्क, सार्वजनिक प्रवासी वाहतुकीचे स्वरूप व ग्राहक संरक्षण कायदा याविषयी माहिती दिली. बारामती विभागीय यंत्र अभियंता (चा.) पांडुरंग वाघमोडे व बारामती आगार व्यवस्थापक रविराज घोगरे यांनी स्थानकातील सुरक्षा, सुविधा व बस वाहतुकीबाबत माहिती दिली.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×