Breking News
श्री छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिरात १ हजार १९० लाभार्थ्यांना लाभजैव विविधतेत कीटकांचे अस्तित्व महत्वाचे-ईशान पहाडेमहंमद रफी हे महान गायक अन उत्तम व्यक्तीही-मोहन जोशीशिक्षणतपस्वी पदमभूषण डॉ. शां. ब. मुजुमदार यांच्या वाढदिवसानिमित्त विशेष सन्मान सोहळाकन्हेरी येथे मधुमक्षिकापालन प्रशिक्षण संपन्नगावठी पिस्तूल बाळगणारा जेरबंद; युनिट एकची कारवाईपोर्शे अपघात प्रकरणात बिल्डर विशाल अगरवालचा जामीन अर्ज फेटाळलामाजी सैनिकांना झालेल्या त्रासाबद्दल कठोर कारवाईचे आदेशतब्बल ८० लाखांच्या घोटाळा, आरोपींविरूद्ध दोषारोपपत्र दाखल“मानवी तस्करीविरोधातील लढ्यासाठी समाजाची एकजूट ही काळाची गरज” : उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे

राजा दिनकर केळकर संग्रहालयाच्या विस्ताराला गती, बावधनमध्ये उभारली जाणार म्युझियम सिटी

राजा दिनकर केळकर संग्रहालयाच्या विस्ताराला गती, बावधनमध्ये उभारली जाणार म्युझियम सिटी

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली राजा दिनकर केळकर संग्रहालय विस्तारावर उच्चस्तरीय बैठक

marathinews24.com

पुणे – राजा दिनकर केळकर संग्रहालयाच्या विस्तारित कामाला गती देण्यासाठी आज उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात बैठक पार पडली. बावधन बुद्रुक येथील ६ एकर जागेत आंतरराष्ट्रीय दर्जाचे भव्य संग्रहालय उभारण्यासाठी नामांकित आर्किटेक्चर नेमणुकीसाठी प्रशासकीय समितीची स्थापना, सविस्तर आराखड्यानंतर निधीची तरतूद करणे, तसेच नव्याने उभारल्या जाणाऱ्या ‘म्युझियम सिटी’ला राजा दिनकर केळकर यांचेच नाव कायम ठेवण्याचा निर्णय बैठकीत घेण्यात आल्याची माहिती कसबा मतदारसंघाचे आमदार हेमंत रासने यांनी दिली आहे.

धर्मनिरपेक्षपतेवर आक्षेप घ्यावा हे न्यूनगंडाचे लक्षण; कॉंग्रेसचा भाजपला तिखट सवाल – सविस्तर बातमी 

वैभवशाली इतिहासाचे जतन आणि संवर्धन करणाऱ्या केळकर संग्रहालयात ९ व्या शतकापासूनच्या २५,००० हून अधिक वस्तूंचा संग्रहीत ठेवा आहे. सध्या जागेअभावी केवळ १०% वस्तू सध्या जनतेसाठी खुल्या आहेत. या पार्श्वभूमीवर संग्रहालयाच्या विस्तारासाठी राज्य सरकारकडून यापूर्वीच बावधन बुद्रूक येथे ६ एकर जागा उपलब्ध करून देण्यात आलेली आहे.

यावेळी उच्च व तंत्र शिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील, आमदार हेमंत रासने, सांस्कृतिक कार्य अपर मुख्य सचिव विकास खरगे, नियोजन विभागाचे अपर मुख्य सचिव राजगोपाल देवरा, वित्तीय सुधारणा सचिव  शैला ए, वित्त व नियोजन सचिव राजेश देशमुख, संग्रहालयाचे संचालक सुधन्वा रानडे, व्यवस्थापन मंडळाचे सदस्य सुरेंद्र रानडे, वास्तुरचनाकार राजेंद्र रानडे, प्रशासकीय अधिकारी भारती न्याती तसेच व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे पुणे विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार, जिल्हाधिकारी जितेंद्र डूडी आदी उपस्थित होते.

बैठकीनंतर बोलताना हेमंत रासने म्हणाले, “नवीन संग्रहालयाचे बांधकाम दर्जेदार, आकर्षक आणि शाश्वत पद्धतीने व्हावे, अशी स्पष्ट सूचना उपमुख्यमंत्र्यांनी केली आहे. कसबा मतदारसंघाचा आमदार म्हणून शिवकालीन, पेशवेकालीन आणि पुण्याच्या वैभवशाली वारशाच्या जतनासाठी माझा सतत प्रयत्न आहे. शनिवारवाड्यासह अनेक ऐतिहासिक वास्तूंना पुनरुज्जीवित करण्यासाठी पाठपुरावा सुरू आहे. भविष्यात या ‘म्युझियम सिटी’ची ओळख जागतिक पातळीवर पोहोचेल, असा विश्वास आहे”.

संग्रहालयाचे संचालक रानडे यांनी संग्रहालय निर्मितीची पार्श्वभूमी आणि त्याची वैशिष्ट्ये याबाबत सविस्तर सादरीकरण केले. यावेळी बोलताना त्यांनी स्पष्ट केले की, बावधन येथे प्रस्तावित असलेला ‘म्युझियम सिटी’ प्रकल्प हा केवळ एक संग्रहालय न राहता, आंतरराष्ट्रीय दर्जाचा आणि पुणे शहराचा लौकिक जागतिक पातळीवर वाढवणारा एक पथदर्शी उपक्रम ठरेल.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 403
  • Message : The request cannot be completed because you have exceeded your quota.
error: Content is protected !!
Scroll to Top