Breking News
विमानात बाँम्ब ठेवल्याची धमकीडोक्यात वीट पडल्याने बांधकाम मजुराचा मृत्यू१ लाखांची लाच प्रकरणी ग्राम महसूल अधिकाऱ्याविरुद्ध गुन्हाहडपसरमधील गावठी दारु धंद्याकडे पोलिसांचे दुर्लक्षआयुर्वेदामध्ये व्याधींचे मूळ शोधण्याची क्षमता- प्रा. डाॅ. मेधा कुलकर्णीबारामती बसस्थानक राज्यात प्रथम; ‘स्वच्छ सुंदर बसस्थानक’ अभियानात १ कोटींचे पारितोषिकजनगणना वेळेत पूर्ण होण्याकरिता प्रगणकास सहकार्य करावे‘विषारी दारु पिल्यामुळे १६ जणांचा मृत्यूमहाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या डिझेल बचतीच्या अनुषंगाने उपाययोजनाकौटुंबिक वादातून महिला पोलीस अधिकाऱ्याचा खुनाचा प्रयत्न

गुंड टिपू पठाण टोळीवर खंडणीचा गुन्हा

गुंड टिपू पठाण टोळीवर खंडणीचा गुन्हा

पिस्तूलाच्या धाकाने हॉटेल चालकाकाडून खंडणी उकळली

marathinews24.com

पुणे – पिस्तूलाच्या धाकाने हॉटेल चालकाकाडून खंडणी उकळल्याप्रकरणी गुंड टिपू पठाण टोळीवर काळेपडळ पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. एक वर्षापासून तो संबंधित हॉटेल चालकाकडून दरमहा ५ हजार रुपयांची खंडणी उकळत होता. याप्रकरणी मोहम्मदवाडीतील ५४ वर्षीय हॉटेल व्यवसायिकाने पोलिसात फिर्याद दिली आहे.

पुणे पोलिसांनी उधळला खुनाचा डाव – सविस्तर बातमी 

रिजवान ऊर्फ टिपू सत्तार पठाण (रा. ख्वाजा मंझिल, सय्यदनगर, हडपसर), तन्वीर शकील शेख (रा. सय्यदनगर, हडपसर), इरफान नासीर शेख (रा. हडपसर), अजित ऊर्फ अंट्या महमंद हुसेन शेख (रा. सय्यदनगर, हडपसर), सद्दाम सलीम पठाण (रा. सय्यदनगर, हडपसर) व इतर ३ ते ४ साथीदार यांच्यावर खंडणीचा गुन्हा दाखल केला आहे. हा प्रकार १ जानेवारी २०२४ ते १२ जानेवारी २०२५ दरम्यान घडला. कुख्यात टिपू पठाण व त्याच्या टोळीवर जमीन बळकावणे, जीवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी दोन गुन्हे दाखल आहेत. टोळीवर मोक्काअंतर्गत दोन कारवाई झाली आहे. या गुन्ह्यात न्यायालयाने टिपू पठाण याच्यासह ६ जणांना नुकताच जामीन मंजूर केला. त्यानंतर आता आणखी एक खंडणीचा गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,मोहमदवाडीत गुलामअलीनगरमध्ये तक्रारदाराचे हॉटेल आहे. मागील सात वर्षापासन ते हॉटेल चालवितात. जानेवारी २०२४ मध्ये त्यांच्या ओळखीचा तन्वीर शेख हा त्यांच्या हॉटेलमध्ये आला.‘‘तुम्हारा धंदा अच्छा चल रहा है, और इसका मुनाफा तुमे टिपू भाई को देना पडेगा, नही तो टिपू भाई तुम्हारा हॉटेल चलने नही देगे’’ अशी धमकी दिली. त्यानंतर टिपू पठाणचे लोक भाईला खंडणी द्यावी लागेल अशी धमकी देऊन निघून जात होते. त्यानंतर काही दिवसांनी एकेदिवशी सायंकाळी इम्रान अफजल शेख याच्या सोबत तन्वीर शकील शेख हॉटेलमध्ये आला. त्याने टिपू पठाण याला फोन लावला. ‘‘मै टिपू भाई बोल रहा हू, मेरा अशरफ कुरेशी और मजर कुरेशी के साथ पार्टनरशिप मे मटण का दुकान खौला है, तुम्हारे हॉटेल के लिए मेरे आदमी से ही मटन लेना पडेगा, अगर नही लिया तो तुमको ५ हजार रुपये मेरे को देना पडगो’’ अशी खंडणीची मागणी केली. त्यानंतर तन्वीरने टिपू भाई फोन मे जो बोला ओ समजा क्या, नही तो कल भाई के दरबार मे आने का, असा दम देऊन तन्वीर निघुन गेला.

दुसर्‍या दिवशी १२ जानेवारीला संध्याकाळी तन्वीर शेख हा हॉटेलवर येऊन टिपू भाईने ऑफिसमध्ये बोलावले असल्याचे सांगितले. त्यानंतर ते टिपू पठाण याच्या ख्वाजा मंजिल येथील ऑफिसमध्ये भेटण्यासाठी गेले. त्याठिकाणी टिपू पठाण, तन्वीर शकील शेख, इरफान नासीर शेख, अजिम ऊर्फ अंट्या महमंद हुसेन शेख, सद्दाम सलीम पठाण बसले होते. त्यांना पाहून टिपू पठाण याने टेबलाचे ड्राव्हरमधील पिस्टल काढून तो हातामध्ये घेतले. ‘‘ऐ क्या है पता है क्या, मैने कल जो हुकुम दिया था, उसका क्या हो गया, तुमको बहुत मस्ती आया क्या, सय्यदनगर मे हॉटेल चलाना नही क्या, मेरी बात नही मानी तो गोली से उडा दुंगा,’’ असे त्यांना धमकाविले. त्यावेळी इरफान नासीर शेख, अजिम शेख हे टिपू पठाणला म्हणाला की, ऐ हॉटेल के मालिक बच्चे लोग को आपने हॉटेलमे बैठने अगर दारु पिने को मनाई करता है. त्यावेळी टिपू पठाण याने त्यांची कॉलर पकडून दम दिला की, ‘‘आजपासून आमचे मटण खरेदी करायला लागेल.

आमचे गँगला दरमहा ५ हजार रुपये खंडणी स्वरुपात द्यावे लागतील. आमच्या गँगमधील तन्वीर शेख, अजिम शेख, सद्दाम पठाण यापैकी कोणीही खंडणी मागण्यास तुझ्याकडे आला की त्याचेकडे ठरलेप्रमाणे ५ हजार रुपये देत जा. ’’ अशी धमकी दिली. त्यांनी मटन खरेदी करण्यास नकार दिला असता टिपू पठाण याने त्याच्या साथीदारांना याचे हात पाया तोडून टाका, असे सांगितले. तेव्हा त्यांनी घाबरुन त्यांनी मटण माझ्या हॉटेलमध्ये चालु करतो, असे सांगितले. आजचे ५ हजार रुपये मला द्यावे लागतील, नाही तर तुला सुट्टी नाही, त्यावेळी त्यांनी घाबरुन टिपू पठाण याला ५ हजार रुपये दिल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. टिपू पठाण आणि त्याच्या टोळीवर यापुर्वी देखील गंभीर गुन्हे दाखल असल्यामुळे फिर्यादींनी पोलिसात तक्रार दिली नव्हती. मात्र शेवटी फिर्यादीनी पोलिसात धाव घेत तक्रार दिली.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×