Breking News
विषारी दारू प्रकरणानंतर उत्पादन शुल्क विभागाकडून छापेविमानात बाँम्ब ठेवल्याची धमकीडोक्यात वीट पडल्याने बांधकाम मजुराचा मृत्यू१ लाखांची लाच प्रकरणी ग्राम महसूल अधिकाऱ्याविरुद्ध गुन्हाहडपसरमधील गावठी दारु धंद्याकडे पोलिसांचे दुर्लक्षआयुर्वेदामध्ये व्याधींचे मूळ शोधण्याची क्षमता- प्रा. डाॅ. मेधा कुलकर्णीबारामती बसस्थानक राज्यात प्रथम; ‘स्वच्छ सुंदर बसस्थानक’ अभियानात १ कोटींचे पारितोषिकजनगणना वेळेत पूर्ण होण्याकरिता प्रगणकास सहकार्य करावे‘विषारी दारु पिल्यामुळे १६ जणांचा मृत्यूमहाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या डिझेल बचतीच्या अनुषंगाने उपाययोजना

अडचणींना फिनिक्स पक्ष्याप्रमाणे सामोरे जा- गजाला शेख

‘द फिनिक्स पाथ’ पुस्तकाचे प्रकाशन

marathinews24.com

पुणे – आयुष्यातील कधीच न बदलणाऱ्या तीन गोष्टी सत्य आहेत, त्या म्हणजे आयुष्यातील प्रश्न, मृत्यू आणि घडणारे बदल. या तीनही गोष्टींना समजून घेत आयुष्य कायम आनंदाने जगा, अडचणींवर मात करत फिनिक्स पक्ष्याप्रमाणे भरारी घ्या, आयुष्य आनंदाने न जगल्यास ते व्यर्थ ठरते, अशा भावना प्रसिद्ध लेखिका गजाला शेख यांनी व्यक्त केल्या. गजाला शेख लिखित ‘द फिनिक्स पाथ’ पुस्तकाचा प्रकाशन समारंभ द पूना क्लब, कॅम्प येथे पार पडला. त्यावेळी आयोजित संवादात्मक कार्यक्रमात त्या बोलत होत्या. गजाला शेख यांच्याशी अंशुमन आनंद यांनी संवाद साधला. ज्येष्ठ अभिनेते डॉ. मोहन आगाशे, उदयन पाठक, ज्योतिषतज्ज्ञ संदीप अवचट, पार्थो सारथीदास यांची प्रमुख उपस्थिती होती.

दिवंगत संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणाची सुनावणी ९ जानेवारीला – सविस्तर बातमी

गजाला शेख म्हणाल्या, आयुष्यात लहान पणापासूनच अनेक बरे-वाईट अनुभव आहे. तेंव्हा पासूनच आयुष्य शिकायला सुरुवात केली. माझ्या आयुष्याच्या पुस्तकाची सुरुवात तेंव्हाच झाली. चांगल्या-वाईट प्रसंगांमुळे आयुष्याचा आलेख खालीवर होत असतो. अडचणींच्या काळात न डगमगता तोंड दिल्यास आयुष्य सुखावह होते. तर डॉ. मोहन आगाशे म्हणाले, गजालाच्या पुस्तकातून तिने कठीण प्रसंगांना तोंड देत सावरलेले आयुष्य मला समजले. तिला कोणाचाही पाठींबा अथवा सहानुभूतीची अपेक्षा नाही. प्रत्येक प्रसंगात तिच्या आयुष्याची लढाई तिनेच लढली आहे आणि आजही लढत आहे. या पुस्तुकाद्वारे आयुष्य जगत असताना अडचणींवर मात करत स्वत:ला कसे सांभाळायचे, जपायचे हे समजते. स्त्रीची ताकद काय असते हे तिच्या कथेतून वाचकांसमोर येईल. यातूनच समजातील पुरुषांनी स्त्रीकडे बघण्याचा दृष्टीकोन बदलण्याची गरज आहे.

संदीप अवचट म्हणाले, गजाला यांचा प्रवाह हा केवळ पुस्तकासाठी नाही. यातून त्यांनी आपले अंतरंग उलगडले आहेत. त्यांचे व्यक्तिमत्वच खूप विलक्षण आहे. त्यांचे आयुष्य झपाटून टाकणारे आहे. त्या लेखिका नसल्यातरी त्यांनी आपल्या आयुष्याची कहाणी या पुस्तकात प्रामाणिकपणे मांडली आहे. राखेतून झेप घेणाऱ्या फिनिक्स पक्ष्याचा प्रवासाप्रमाणे त्यांचे आयुष्य आहे. हे पु्स्तक पथदर्शी असून त्याची मराठी आवृत्ती देखील प्रकाशित व्हावी.

उदयन पाठक म्हणाले, मी आणि गजाला फेसबुकवर जोडले गेलो. जेव्हा आम्ही भेटलो तेव्हा तिचे कौतुक वाटले. तिचे धैर्य कौतुकास्पद आहे. ‘महाराष्ट्राची मलाला’ ही तिच्यावरील कथा वाचल्यानंतर तिच्याविषयी उत्सुकता निर्माण झाली. तिने रेखाटलेली चित्रेही प्रेरणादायी आहेत. तिने समाजातील अनेक अनाथ मुलांना, संस्थांना मदतीता हात दिला आहे.

पार्थो सारथीदास म्हणाले, जीवन जगताना ठेच लागली की त्यातून धडे मिळतात. समाज काय बोलतो याकडे लक्ष न देता गजाला यांनी आपले काम पुढे सुरू ठेवले. त्या खऱ्या अर्थाने योद्धा आहेत. त्यांचा जीवनप्रवास प्रेरणादायक आहे. नकारात्मकता न घेता जीवन सकारात्मकतेने जगणे हे त्यांच्या कथेतून प्रकर्षाने जाणवते. तसेच जारा शेख हिने आपल्या आईविषयीच्या भावना व्यक्त केल्या. ‘रायटर्स पॉकेट’तर्फे पुस्तक प्रकाशित करण्यात आले आहे.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×