Breking News
विषारी दारू प्रकरणानंतर उत्पादन शुल्क विभागाकडून छापेविमानात बाँम्ब ठेवल्याची धमकीडोक्यात वीट पडल्याने बांधकाम मजुराचा मृत्यू१ लाखांची लाच प्रकरणी ग्राम महसूल अधिकाऱ्याविरुद्ध गुन्हाहडपसरमधील गावठी दारु धंद्याकडे पोलिसांचे दुर्लक्षआयुर्वेदामध्ये व्याधींचे मूळ शोधण्याची क्षमता- प्रा. डाॅ. मेधा कुलकर्णीबारामती बसस्थानक राज्यात प्रथम; ‘स्वच्छ सुंदर बसस्थानक’ अभियानात १ कोटींचे पारितोषिकजनगणना वेळेत पूर्ण होण्याकरिता प्रगणकास सहकार्य करावे‘विषारी दारु पिल्यामुळे १६ जणांचा मृत्यूमहाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या डिझेल बचतीच्या अनुषंगाने उपाययोजना

दिवंगत संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणाची सुनावणी ९ जानेवारीला

आरोपीना डिजिटल पुरावे देण्यासाठी १५ दिवसांची मुदतवाढीची मागणी

म्हणून संतोष देशमुख यांचा खून केला-ॲड उज्ज्वल निकम

marathinews24.com

बीड (अनंत जाधव) – मस्साजोगचे दिवंगत सरपंच संतोष देशमुख यांची आपहरण करून क्रूर पद्धतीने हत्या दि.९ डिसेंबर २०२४ रोजी करण्यात आली होती. या क्रूर हत्येचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले होते, त्यामुळे मंत्री असलेल्या धनंजय मुंडे यांना वाल्मिक कराड त्याचा निकटवर्तीय असल्यामुळे त्यांना राजीनामा द्यावा लागला होता. त्यामुळे राज्यात खळबळ उडाली होती. दिवंगत सरपंच संतोष देशमुख या हत्या प्रकरणाची दिनांक २३ डिसेंबरला बीडच्या विशेष मकोका न्यायालयात सुनावणी पार पडली. न्यायालय परिसरात पोलीसांचा तगडा बंदोबस्त पाहायला मिळाला.

मध्यप्रदेशातील बडवाणी नर्मदा बचाव संस्थेला विद्यार्थ्यांची भेट – सविस्तर बातमी

विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम, अॅड. बाळासाहेब कोल्हे सुनावणीला उपस्थित होते. प्रकरणातील मुख्य सूत्रधार वाल्मिक कराड आणि त्यांच्या आरोपी असलेल्या सर्व साथीदारांना व्हिडिओ कॉलद्वारे न्यायालयात हजर करण्यात आले होते.

सुनावणी दरम्यान आरोपींवरील ड्राफ्ट न्यायालयाने वाचून दाखवला.मात्र वाल्मिक कराडसह सर्व आरोपींनी हे आरोप मान्य नसल्याचे न्यायालयाने म्हटले आहे . आता या प्रकरणाची पुढील सुनावणी ८ किंवा ९ जानेवारीला होणार आहे. सुनावणीनंतर प्रसार माध्यमांशी संवाद साधतांना अॅड. उज्वल निकम यांनी म्हटले की, अखेर न्यायालयाने आज आरोप निश्चित केले आहेत. खंडणी मिळण्यास अडथळा केला म्हणून संतोष देशमुख यांचा खून केला. आजही आरोपीच्या वकिलांनी या खटल्यात डी फॉर डीले आणि डी फॉर डीरेल केले गेले. खटल्यात विलंब लावणे व खटला उलथवून टाकण्याचा प्रयत्न आहे.
प्रत्यक्ष पुराव्याचे काम लवकरच सुरू होईल. तीच ती कारणे न्यायालयात मांडली जात होती त्यामुळे न्यायालयाने आदेश करावा अशी विनंती केली. आरोप निश्चित करण्यात किती वेळ लागला हे पाहिले.

खटला लवकरात लवकर चालवण्याचा प्रयत्न केला जात आहे. प्रकरण फास्टट्रॅक कोर्टात असो किंवा कोणत्याही कोर्टात असो प्रकरण लवकर निकाली काढण्यासाठीचा प्रयत्न सुरू असल्याचे अॅड. उज्वल निकम यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना म्हटले आहे .

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×