मध्यप्रदेशातील बडवाणी नर्मदा बचाव संस्थेला विद्यार्थ्यांची भेट

मध्यप्रदेशातील बडवाणी नर्मदा बचाव संस्थेला विद्यार्थ्यांची भेट

कर्वे समाज सेवा संस्थेच्या विद्यार्थ्यांनी घेतली माहिती

marathinews24.com

पुणे : (अनंत जाधव) – शहरातील कर्वे समाज सेवा संस्थेच्या मास्टर ऑफ सोशल वर्क मानव संसाधन विकास विभागाच्या द्वितीय वर्षात शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांनी मध्यप्रदेश राज्यातील बडवाणी येथील नर्मदा बचाव संस्थेला दिनांक २१ डिसेंबरला अभ्यासात्मक भेट दिली. यावेळी नर्मदा बचाव आंदोलनाच्या ज्येष्ठ नेत्या व सामाजिक कार्यकर्त्या मेधाताई पाटकर यांनी विद्यार्थ्यांशी सविस्तर संवाद साधला. आंदोलनाची कार्यपद्धती, उद्दिष्टे, विचारधारा, संघटनेची भूमिका, संघर्षाची दिशा, प्रशासनाशी चाललेला लढा, आंदोलनातून मिळालेले यशाविषयी मार्गदर्शन केले. विकासाच्या नावाखाली होणारे विस्थापन, अपूर्ण पुनर्वसन, पर्यावरणीय हानी आणि मानवी हक्कांचे प्रश्न यावर त्यांनी विद्यार्थ्यांचे लक्ष वेधले.

राष्ट्रीय पत्रकार महासंघाच्या समन्वयकपदी पत्रकार देवेंद्र जैन यांची नियुक्ती – सविस्तर बातमी 

मेधाताई पाटकर यांनी नर्मदा बचाव आंदोलनाच्या माध्यमातून विस्थापित, आदिवासी व वंचित घटकांच्या हक्कांसाठी चालविलेल्या दीर्घकालीन अहिंसक संघर्षाचा अनुभव विद्यार्थ्यांसमोर मांडला. “विकास हा माणूसकेंद्रित असला पाहिजे,” ही भूमिका स्पष्ट करत त्यांनी युवकांनी सामाजिक न्यायासाठी संघटितपणे काम करण्याची गरज अधोरेखित केली. युवकांची सामाजिक कार्यातील सक्रियता हीच भविष्यातील बदलाची खरी ताकद असल्याचे त्यांनी यावेळी नमूद केले. अभ्यास दौऱ्यात विद्यार्थ्यांनी पुनर्वसित तसेच अद्याप पुनर्वसन न झालेल्या गावांना नर्मदा बचाव संस्थेच्या कार्यकर्त्यांसोबत भेटी दिल्या. तसेच तेथील गावकऱ्यांशी थेट संवाद साधून त्यांनी विस्थापन, उपजीविका, पाणी, जमीन आणि मूलभूत सुविधांशी संबंधित अडचणी समजून घेतल्या. गाव।भेटीमुळे विद्यार्थ्यांना सामाजिक कार्याचे प्रत्यक्ष व वास्तव स्वरूप अनुभवता आले.

भेटीसाठी विद्यार्थ्यांसोबत मार्गदर्शक डॉ. प्राध्यापिका शर्मिला रामटेके, अमूल्य निधी जन स्वास्थ्य संस्थेचे प्रमुख आणि कर्वे समाज सेवा संस्थेचे माजी विद्यार्थी यांचे सहकार्य लाभले. शैक्षणिक भेटीत सहभागी सुचिता देशमुख, ग्रेस मरीन, प्रथम कुंभार, योगेश दळवी, वैभव सुलतान, धनराज माने, धनराज निंबाळकर, अमित वाघमारे, हर्षल घाडगे, साजिद शेख हे विद्यार्थी उपस्थित होते. विद्यार्थ्यांनी आंदोलनासंदर्भात चिकित्सक प्रश्न विचारून संघर्षाची दिशा व सामाजिक कार्यातील आव्हाने समजून घेतली. मार्गदर्शनाबद्दल विद्यार्थ्यांनी मेधाताई पाटकर यांचे आभार मानले.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×