Breking News
‘बाल्यावस्थेतील प्रारंभिक विकास’ विषयावरील कार्यशाळेचे मुख्य सचिव राजेशकुमार अग्रवाल यांच्या हस्ते उद्घाटनराष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त पुण्यात क्रीडा जागृती प्रभातफेरीऔषध निर्मिती कंपनीत नोकरीच्या आमिषाने ४ लाखांची फसवणूकविश्रांतवाडीत कौटुंबिक वादातून मुलाकडून आईचा खूनपुणे जिल्ह्यातही ‘प्लाझ्मा’, ‘लेझर’ झोतांवर बंदीराज्यातील 404 नागरिक सुरक्षित व 338 संपर्कात; प्रवास सुविधा व मदतीचे नियोजन सतर्कतेने करण्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देशहातमाग, स्थानिक कारागिरांसाठी केंद्र सरकारचा पुढाकारबिबवेवाडी परिसरात वैमनस्यातून तरुणावर शस्त्राने वारविवाहविषयक संकेतस्थळावरील ओळख महागातबेकायदा सावकारीतून कोट्यवधींची वसुली; तिघांविरुद्ध गुन्हा

भांडणाच्या रागातून कुटूंबियाला बेदम मारहाण

आंबेगाव बुद्रुक परिसरात फ्लॅटचे कुलूप तोडून ८ लाखांचा ऐवज चोरी पुणे- फ्लॅटचे कुलूप तोडून चोरट्यांनी सोन्याचे दागिने, रोकड असा ८ लाख पाच हजार रुपयांचा ऐवज लांबविल्याची घटना आंबेगाव बुद्रुक परिसरात घडली. याप्रकरणी चोरट्यांविरुद्ध भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. याबाबत एकाने फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार हे सिंहगड महाविद्यालयाच्या परिसरातील शिवालय विहार सोसायटीत राहायला आहेत. १० ऑगस्ट रोजी ते तक्रारदार हे कुटुंबीयांसह परगावी गेले होते. चोरट्यांनी सदनिकेचे कुलूप तोडले. शयनगृहातील कपाट उचकटून सोन्याचे दागिने, रोकड असा आठ लाख पाच हजार रुपयांचा ऐवज लांबविला. तक्रारदार हे रविवारी (१६ ऑगस्ट) दुपारी गावाहून परतले. तेव्हा घरफोडीचा प्रकार उघडकीस आला. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी भेट दिली. पोलिसांकडून चोरट्यांचा शोध घेण्यात येत असून, सोसायटीच्या आवारातील सीसीटीव्ही चित्रीकरण तपासण्यात आले आहे. पोलीस उपनिरीक्षक नीलेश मोकाशी तपास करत आहेत. ज्येष्ठ नागरिकाच्या सदनिकेत चोरी सिंहगड रस्ता परिसरात एका सोसायटीत राहणाऱ्या ज्येष्ठ नागरिकाच्या सदनिकेचे कुलूप बनावट चावीने उघडून चोरट्याने ३८ हजार रुपयांचे सोन्याचे दागिने चोरून नेल्याची घटना घडली. याबाबत एका ज्येष्ठ नागरिकाने पर्वती पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार ज्येष्ठ नागरिक हे सिंहगड रस्त्यावरील सईनगर सोसायटीत राहायला आहेत. चोरट्याने ज्येष्ठ नागरिकाच्या सदनिकेचे कुलूप बनावट चावीने उघडून कपाटातील चांदीच्या वस्तू, सोन्याची कुडी असा ऐवज चोरुन नेला. पोलीस उपनिरीक्षक माने तपास करत आहेत. किराणा माल दुकानातून रोकड लांबविली किराणा माल विक्री दुकानाचे कुलूप तोडून चोरट्याने गल्ल्यातील रोकड, मोबाइल संच असा मुद्देमाल चोरुन नेल्याची घटना घडली. याबाबत किराणा माल दुकानदाराने चंदननगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. येरवड्यातील रामवाडी परिसरात तक्रारदाराचे किराणा माल विक्री दुकान आहे. चोरट्यांनी दुकानाचे कुलूप तोडले. गल्ल्यातील रोकड आणि मोबाइल संच असा ३५ हजार ५०० रुपयांचा ऐवज चोरुन नेला. पोलीस उपनिरीक्षक बोराडे तपास करत आहेत.

महिलेवर खुनी हल्ला; तिघांना अटक

marathinews24.com

पुणे – जुन्या भांडणाच्या रागातून टोळक्याने महिलेच्या डोक्यात लोखंडी शस्त्राने वार करीत कुटूंबियाला बेदम मारहाण केली. ही घटना २६ डिसेंबरला रात्री साडेसात वाजण्याच्या सुमारास ससाणेनगरातील समर्थनगर गल्ली क्रमांक तीनमध्ये घडली आहे. याप्रकरणी तिघाजणांना वानवडी पोलिसांनी अटक केली असून, चौघेजण पसार झाले आहे. त्यांच्या शोधार्थ पोलीस पथके रवाना करण्यात आली आहेत.

आंदेकरला तिकीट देउ नका, नाहीतर आत्मदहन करणार- कल्याणी कोमकर – सविस्तर बातमी

गणेश राम पुजारी (वय २० रा. ससाणेनगर) संतोष परमेश्वर जाधव (वय २१) साहिल विशाल सावंत (वय १९, रा. गोसावी वस्ती) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. रोहन गायकवाड, रोहित गायकवाड, दीपक सरोदे, अंबाजी शिंगे अशी पसार झालेल्या आरोपींची नावे आहेत. याप्रकरणी शेखर भारता (वय २७, रा. ससाणेनगर) यांनी वानवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार शेखर आणि त्यांची आई, चुलत भाउ २६ डिसेंबरला संध्याकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास घराजवळ बसले होते. त्यावेळी जुन्या भांडणाच्या रागातून रोहन गायकवाड शेखरच्या चुलत भावासोबत भांडण करत होता. त्यावेळी शेखरच्या आईने भांडणात मध्यस्थी केल्याच्या रागातून आरोपी रोहित गायकवाने तक्रारदाराच्या आईला जीवे ठार मारण्याच्या उद्देशाने लोखंडी हत्याराने डोक्यात मारून गंभीररित्या जखमी केले. त्यानंतर तक्रारदाराच्या चुलत भावासह मावशी चंद्रमा कंडमची यांना दगडाने मारहाण केली आहे. याप्रकरणी पोलीस उपनिरीक्षक धनाजी टोणे तपास करीत आहेत.

तरूणाला मारहाण करणारा अटकेत

भांडणाच्या रागातून तरूणाला लोखंडी हत्याराने मारून गंभीर जखमी करणार्‍या हल्लेखोराला वानवडी पोलिसांनी अटक केली आहे. ही घटना २७ डिसेंबरला रात्री सव्वा बाराच्या सुमारास वानवडीतील चौगुले मळा परिसरात घडली होती. परमजित प्रेमचंद मेहरा (वय २४ रा. मोहम्मंदवाडी, हडपसर) असे अटक केलेल्याचे नाव आहे. याप्रकरणी वानवडीत राहणार्‍या २९ वर्षीय तरूणाने फिर्याद दाखल केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार तरूण वानवडी परिसरात राहायला असून, २७ डिसेंबरला मध्यरात्रीच्या सुमारास आरोपी परमजितने त्यांना लोखंडी हत्याराने मारहाण केली होती. त्यानंतर तो पसार झाला होता. याप्रकरणी गुन्हा दाखल होताच, पोलिसांनी तातडीने आरोपीला अटक केली आहे. याप्रकरणी एका अज्ञात महिलेविरूद्धही गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस उपनिरीक्षक बाळासाहेब वाकडे तपास करीत आहेत.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×