Breking News
पुणेकरांच्या सुरक्षेला लागलेली कीडविषारी दारू प्रकरणात ‘सीआयडी’ने मृतांचा खरा आकडा जनतेसमोर आणावापोलीस आयुक्तांचा गुन्हेगारी घटल्याचा दावाविमान अपघाताच्या पार्श्वभूमीवर रेडबर्ड फ्लाइट ट्रेनिंग अकादमीकडून सुरक्षा उपाय अधिक कडकविषारी दारू प्रकरणात मृतांचा खरा आकडा समोर आणण्यासाठी विशेष प्रयत्न गरजेचेसोशल मीडियावरील जनगणनेच्या अफवांपासून सावध राहा : आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशीपीएमपील बस प्रवासात जेष्ठेची सोन्याची बांगडी चोरीलाकोंढव्यात हुंड्यासाठी केला छळ, महिलेची आत्महत्यापुण्यात वेगवेगळ्या अपघातांत चौघांचा मृत्यूचारित्र्याच्या संशयावरुन तरुणीचा खून

आंदेकरला तिकीट देउ नका, नाहीतर आत्मदहन करणार – कल्याणी कोमकर

गुंड आंदेकरच्या मुलीचा राजकीय पक्षांना इशारा

marathinews24.com

पुणे – नागरिकांमध्ये दहशतीच्या जोरावर बंडू आंदेकर हे लोकांची घरे उध्वस्त करीत आहेत. त्यांनी अनेकांचा खून केला आहे. त्यामुळे महापालिकेच्या आगामी निवडणूकीत आंदेकर कुटूंबियांना कोणीही फॉम देउ नका. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आंदेकरला फॉर्म देउ नये, अन्यथा मी त्यांच्या कार्यालयाबाहेर आत्मदहन करेल, असा इशारा कल्याणी कोमकर यांनी पत्रकार परिषदेत दिला आहे. बंडू आंदेकर यांची मुलगी कल्याणी कोमकर हिने नाना पेठेतील घरी पत्रकार परिषदेत घेत भूमिका स्पष्ट केली.

कुख्यात गुंड बंडू आंदेकरकडून उमेदवारी अर्ज दाखल – सविस्तर बातमी

कल्याणी कोमकर म्हणाल्या, माझ्या मुलाचा काहीही दोष नसताना आंदेकर टोळीने त्याचा खून केला आहे. मी आजही मुलाच्या न्यायासाठी लढत आहे. वनराज आंदेकर माझा भाऊ होता. मी माझ्या भावाची सुपारी का देऊ, आम्ही असे काही केले नाही, आम्ही तरीही त्रास भोगतोय. माझ्या मुलांची माझी कोणाशी वाद नव्हता. तरीही आयुषचा आंदेकर टोळीने खून केला आहे. दरम्यान, बंडू आंदेकर फॉम भरण्यासाठी घोषणाबाजी करत आले हे चुकीचे आहे. त्याबाबत मी न्यायालयात जाणार आहे. त्यांना अर्ज भरायला न्यायालयाने परवानगी द्यायला नको होती. त्यांनी मुद्दाम अर्ज अर्धवट भरला आहे. आम्हाला पण निवडणूक लढवण्याची परवानगी द्यावी, अशीही मागणी त्यांनी केली.

पोलिसांना कोयता गँग थांबवा असे उपमुख्यमंत्री अजित पवार सांगतात. मग त्यांनी आंदेकर कुटंबातील कोणालाही तिकीट देउ नये. याबाबत मी त्यांना भेटण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यांच्याकडे मोठ्या प्रमाणावर गर्दी होती. माझी अजितदादांना विनंती आहे की त्यांनी आंदेकरांना तिकीट देउ नये, अन्यथा मी त्यांच्या कार्यालयाबाहेर आत्मदहन करेल, असा इशारा कल्याणी कोमकर हिने दिला आहे. आंदेकर यांच्या विरोधात मी न्यायालयात जाणार आहे. मला माहिती नाही त्यांना कोण मदत करत आहे, पण राजकीय लोक मदत करतात हे मात्र नक्की असल्याचेही कोमकर यांनी स्पष्ट केले.

आंदेकरांना मतदान करू नका

बंडू आंदेकर टोळीने अनेकांना त्रास दिला आहे. त्यांनी लोकांची काय कामे केली आहेत. मी लोकांना आवहान करते की, त्यांनी आंदेकरांना मतदान करू नये. दहशतीखाली येउन त्यांना निवडून देऊ नये. कुठल्याही पक्षाने त्यांना फॉर्म देऊन नये. अन्याय विरोधात लढण्यासाठी मला साथ द्या. आंदेकरला अपक्ष लढू द्या पण पक्षाकडून नको. आंदेकर टोळीने विजय निंबाळकर, निखील आखाडे, आयुष कोमकर, गणेश काळे यांचे खून केल्याचा आरोप कल्याणी कोमकर यांनी केले.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×