Breking News
Caste Validity Certificate Pune : सेवा संकल्प अभियानांतर्गत जात वैधता प्रमाणपत्रासाठी विशेष शिबिरजिल्ह्यातील युवकांनी रोजगार मेळाव्यासह शासकीय योजनांचा लाभ घ्यावाPune Tax Fraud : पुण्यात ४ हजार ४२७ कोटींवर आयकर भरलाच नाहीBARTI Schemes Pune : ‘लोकसंवाद-२०२६’मधून बार्टीच्या योजनांची माहितीनांदेड सिटीतील आरोग्य शिबिरामध्ये ४०० जणांची तपासणीKoyta Case Pune : ऐन गणेशोत्सवात कोयता बाळगला, आरोपीला अटक‘सेवा संकल्प अभियान’च्या माध्यमातून आदिवासी बांधवांपर्यंत योजनांचा थेट लाभ पोहोचविण्याचा संकल्पPune Crime News : अटकेची भीती दाखवून ज्येष्ठाची १९ लाखांची फसवणूकखरेदीच्या बहाण्याने सराफी पेढीतून दागिने चोरीPune Cash Seizure : गणेशोत्सवात एकाकडे ४२ लाखांची रोकड सापडली

वादातून वडिलांवर चाकूने वार करुन खून

कोथरूडमधील घटना

marathinews24.com

पुणे – किरकाेळ वादातून मुलाने वृद्ध वडिलांवर चाकूने वार करुन त्यांच्या खून केल्याची धक्कादायक घटना कोथरूडमधील जय भवानीनगर परिसरात घडली. याप्रकरणी कोथरूड पोलिसांनी मुलाला अटक केली.

बतावणी करुन ज्येष्ठ नागरिकाची फस‌वणूक – सविस्तर बातमी

तानाजी पायगुडे (वय ७२, रा. जयभवानीनगर, पौड रस्ता, कोथरूड) असे खून झालेल्यांचे नाव आहे. या प्रकरणी मुलगा सचिन तानाजी पायगुडे (वय ३३) याला अटक करण्यात आली. याबाबत तानाजी यांची पत्नी सुमन (वय ६८) यांनी कोथरूड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पायगुडे कुटुंबीय जयभवानीनगर भागातील चाळीत राहायला आहेत. पायगुडे यांचे बैठे घर आहे. गुरुवारी (२ ऑक्टोबर) दुपारी साडेबाराच्या सुमारास तानाजी पायगुडे आणि त्यांचा मुलगा आरोपी सचिन हे पोटमाळ्यावर होते. दसरा असल्याने पायगुडे कुटुंबीय घरात होते. तानाजी यांच्या डोळ्यात ओैषध टाकायचे होते. त्यांनी मुलगा सचिन याला दूरचित्रवाणी संच बंद करण्यास सांगितले. या कारणावरुन सचिन आणि वडील तानाजी यांच्यात वाद झाला. वादातून सचिनने घरातील चाकूने वडील तानाजी यांचा गळा आणि चेहऱ्यावर चाकूने वार केले. पोटमाळ्यावरील आरडा-ओरडा ऐकून तानाजी यांची पत्नी सुमन या पोटमाळ्यावर गेल्या. तेव्हा तानाजीे हे गंभीर जखमी अवस्थेत पडल्याचे त्यांनी पाहिले.

आरोपी सचिन घरातून पसार झाला होता. गंभीर जखमी अवस्थेतील तानाजी यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचारांपूर्वीच त्यांचा मृत्यू झाला. या घटनेची माहिती पोलिसांना कळविण्यात आली. परिमंडळ तीनचे पाेलीस उपायुक्त संभाजी कदम, सहायक आयुक्त भाऊसाहेब पटारे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक संदीप देशमाने यांनी घटनास्थळी भेट दिली. पसार झालेला आरोपी सचिन याला वडिलांचा खून केल्या प्रकरणी अटक करण्यात आली असून, सहायक पोलीस निरीक्षक पवार तपास करत आहेत.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×