Breking News
‘बाल्यावस्थेतील प्रारंभिक विकास’ विषयावरील कार्यशाळेचे मुख्य सचिव राजेशकुमार अग्रवाल यांच्या हस्ते उद्घाटनराष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त पुण्यात क्रीडा जागृती प्रभातफेरीऔषध निर्मिती कंपनीत नोकरीच्या आमिषाने ४ लाखांची फसवणूकविश्रांतवाडीत कौटुंबिक वादातून मुलाकडून आईचा खूनपुणे जिल्ह्यातही ‘प्लाझ्मा’, ‘लेझर’ झोतांवर बंदीराज्यातील 404 नागरिक सुरक्षित व 338 संपर्कात; प्रवास सुविधा व मदतीचे नियोजन सतर्कतेने करण्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देशहातमाग, स्थानिक कारागिरांसाठी केंद्र सरकारचा पुढाकारबिबवेवाडी परिसरात वैमनस्यातून तरुणावर शस्त्राने वारविवाहविषयक संकेतस्थळावरील ओळख महागातबेकायदा सावकारीतून कोट्यवधींची वसुली; तिघांविरुद्ध गुन्हा

पैशाच्या वादातून वडिलांनीच मुलावर अ‍ॅसिड फेकले

कोथरुडमध्ये महिलेचे दागिने हिसकावले

पुण्यातील कोथरूडमधील घटनेने खळबळ

marathinews24.com

पुणे – शहरात कायदा सुव्यवस्थेच्या अनुषंगाने मागील काही दिवसांपासून अनेक गंभीर घटना घडत आहेत. त्याचत पैशांच्या वादातून ६२ वर्षीय बापानेच मुलावर अ‍ॅसिड फेकल्याची धक्कादायक घटना कोथरूडमधील केळेवाडी परिसरातील वसंतनगरात नुकतीच घडली आहे. याप्रकरणी आरोपी बापाविरूद्ध १५ मे रोजी कोथरूड ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. बाप-लेकाच्या नात्याला काळिमा फासणार्‍या घटनेने खळबळ उडाली आहे. अ‍ॅसिड हल्ल्यात तरूणाच्या चेहर्‍याला दुखापत झाली असून त्याच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

येवलेवाडी परिसरात चिमुरडीवर अत्याचार; नातेवाईक आरोपी अटकेत – सविस्तर बातमी

तुषार शाम कदम (वय ३०, रा. कोथरूड ) असे जखमी झालेल्या मुलाचे नाव आहे. याप्रकरणी श्याम यशवंत कदम (वय ६२, रा. वसंतनगर, केळेवाडी, कोथरूड) याच्याविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कदम कुटूंबिय कोथरूडमधील केळेवाडी परिसरात राहायला आहे. १४ मे रोजी तुषारचे वडील श्यामने त्याच्याकडे पैशांची मागणी केली. मात्र, तुषारने त्यांना पैसे देण्यास नकार दिला. त्याच रागातून दोघांमध्ये टोकाचे वादविवाद झाले. वाद टोकाला गेल्याने श्यामने स्वच्छतागृहात वापरासाठी असलेल्या अ‍ॅसिडची बाटलीच मुलगा तुषारच्या अंगावर फेकली. हल्ल्यात तुषारच्या चेहर्‍यावर अ‍ॅसिडचे द्रव्य पडल्याने तो जखमी झाला आहे. त्यानंतर त्याला खासगी रुग्णालयात उपचारसाठी दाखल करण्यात आले आहे. याप्रकरणी सहायक पोलीस निरीक्षक पवार तपास करीत आहेत.

पुण्यात कौटुंबिक वादाच्या घटना वाढल्या

कौटुंबिक वादातून पुण्यात वादाच्या घटना वाढीस लागल्या असून, प्रामुख्याने महिलांमध्ये वादविवाद होत असल्याचे गुन्ह्याच्या आलेखावरून स्पष्ट झाले आहे. त्यातच दारूचे वेसन, आर्थिंक तणाव, कौटुंबिक वादातून घरातच वादविवाद होत आहेत. त्यापार्श्वभूमीवर संबंधित घटनांविरूद्ध पोलिसांकडून कारवाईचा बडगा उगारला जात आहे.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×