Breking News
Pune Ganesh Visarjan : गणेश विसर्जन मुख्य मिरवणुकीत त्या मंडळाना पुन्हा संधीLokSamvad 2026 : ‘लोकसंवाद-२०२६’मधून पुणे मनपाच्या विविध योजनांची माहितीAyushman Bharat Card : आयुष्मान भारत कार्डचा नागरिकांनी लाभ घ्यावा – गणेश चव्हाणCaste Validity Certificate Pune : सेवा संकल्प अभियानांतर्गत जात वैधता प्रमाणपत्रासाठी विशेष शिबिरजिल्ह्यातील युवकांनी रोजगार मेळाव्यासह शासकीय योजनांचा लाभ घ्यावाPune Tax Fraud : पुण्यात ४ हजार ४२७ कोटींवर आयकर भरलाच नाहीBARTI Schemes Pune : ‘लोकसंवाद-२०२६’मधून बार्टीच्या योजनांची माहितीनांदेड सिटीतील आरोग्य शिबिरामध्ये ४०० जणांची तपासणीKoyta Case Pune : ऐन गणेशोत्सवात कोयता बाळगला, आरोपीला अटक‘सेवा संकल्प अभियान’च्या माध्यमातून आदिवासी बांधवांपर्यंत योजनांचा थेट लाभ पोहोचविण्याचा संकल्प

कारवाईची भीती दाखवली, ज्येष्ठ महिलेची २८ लाखांची फसवणूक

पोलिसांची केली बतावणी, जेष्ठाला ४८ लाखांचा ऑनलाईन गंडा

सिंहगड रस्ता पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

marathinews24.com

पुणे – परदेशातून पाठविण्यात आलेल्या पाकिटात अमली पदार्थ सापडले असून, या प्रकरणात अटकेची कारवाई करण्यात येणार असल्याची भीती दाखवून सायबर चोरट्यांनी सिंहगड रस्ता भागातील एका ज्येष्ठ महिलेची २८ लाख ५० हजार रुपयांची फसवणूक केली. या प्रकरणी सायबर चोरट्यांविरुद्ध सिंहगड रस्ता पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ज्येष्ठ महिलेने फिर्याद दिली आहे.

घरकामास ठेवलेल्या नोकराकडून ऐवज चोरी – सविस्तर बातमी 

तक्रारदार ८३ वर्षीय ज्येष्ठ महिला धायरीतील गणेशनगर भागात राहायला आहेत. सायबर चोरट्यांनी त्यांच्या मोबाइल क्रमांकावर संपर्क साधला. चोरट्यांनी दिल्लीतील विशेष पथकातून बोलत असल्याची बतावणी केली. परदेशातून पाठविण्यात आलेल्या पाकिटात अमली पदार्थ आणि बनावट आधारकार्ड सापडले. या प्रकरणी विशेष पथकाकडून कारवाई करण्यात येणार आहे, अशी भीती चोरट्यांनी त्यांना दाखविले. अटक टाळण्यासाठी तातडीने वरिष्ठ अधिकाऱ्यांशी संपर्क साधावा लागेल, असे सांगून चोरट्यांनी त्यांना धमकावले.

चोरट्यांनी त्यांच्या बँक खात्याची माहिती घेतली. चोरट्यांनी त्यांना बँक खात्यात पैसे जमा करणयास सांगितले. चोरट्यांच्या धमकीमुळे घाबरलेल्या महिलेने खात्यात वेळोवेळी २८ लाख ५० हजार रुपये जमा केले. फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर त्यंनी नुकतीच पोलिसांकडे तक्रार दिली. वरिष्ठ पोलीस निरीक्षक दिलीप दाईंगडे तपास करत आहेत. गेल्या काही दिवसात कारवाईची भीती दाखवून ज्येष्ठ नागरिकांची फसवणूक करण्याचे प्रकार वाढले आहे. चोरट्यांनी आतापर्यंत लाखो रुपयांची फसवणूक केल्याचे उघडकीस आले आहे.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×