Breking News
Caste Validity Certificate Pune : सेवा संकल्प अभियानांतर्गत जात वैधता प्रमाणपत्रासाठी विशेष शिबिरजिल्ह्यातील युवकांनी रोजगार मेळाव्यासह शासकीय योजनांचा लाभ घ्यावाPune Tax Fraud : पुण्यात ४ हजार ४२७ कोटींवर आयकर भरलाच नाहीBARTI Schemes Pune : ‘लोकसंवाद-२०२६’मधून बार्टीच्या योजनांची माहितीनांदेड सिटीतील आरोग्य शिबिरामध्ये ४०० जणांची तपासणीKoyta Case Pune : ऐन गणेशोत्सवात कोयता बाळगला, आरोपीला अटक‘सेवा संकल्प अभियान’च्या माध्यमातून आदिवासी बांधवांपर्यंत योजनांचा थेट लाभ पोहोचविण्याचा संकल्पPune Crime News : अटकेची भीती दाखवून ज्येष्ठाची १९ लाखांची फसवणूकखरेदीच्या बहाण्याने सराफी पेढीतून दागिने चोरीPune Cash Seizure : गणेशोत्सवात एकाकडे ४२ लाखांची रोकड सापडली

अखेर त्या भोंदू महिलेसह इतरांवर गुन्हा; ३ जणांना अटक

अखेर त्या भोंदू महिलेसह इतरांवर गुन्हा; ३ जणांना अटक

कोथरूडमधील दांपत्याची १४ कोटींच्या फसवणूक प्रकरण

marathinews24.com

पुणे – शंकर महाराज अंगात येतात असा दावा करत, मुलीचा आजार बरा करण्याच्या बहाण्याने भोंदू महिलेने दांपत्याची तब्बल १३ कोटी २० लाख रुपयांची फसवणूक केली होती. अखेर कोथरूड पोलिस ठाण्यात ५ जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. वेदिका कुणाल पंढरपूरकर, कुणाल वैजनाथ पंढरपूरकर (दोघे रा. २२, कैलासदीप, लेन नं. ११, महात्मा सोसायटी, कोथरूड), दीपक जनार्दन खडके (जय शंकर फार्म हाऊस, नाशिक) यांच्यासह वेदिकाची आई आणि भाऊ (नाव माहित नाही) यांच्यावर गुन्हा दाखल केला. दरम्यान, वेदिला आणि कुणाल भोंदू बाबा दीपक खडके सह वेदिका पंढरपूरकर आणि कुणाल पंढरपूरकर यांना नाशिक येथून गुन्हे शाखेने अटक केली. दीपक पुंडलिकराव डोळस यांनी कोथरूड पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. हा प्रकार १ जुलै २०१८ ते ४ नोव्हेंबर २०२५ कालावधीत घडला.

शेअर ट्रेडींगमध्ये गुंतवणूकीचे आमिष पडले ८ लाखांना – सविस्तर बातमी 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार दीपक डोळस हे मूळचे पुण्यातील असून, इंग्लंडमध्ये आयटी क्षेत्रात कार्यरत होते. त्यांच्या दोन मुलींवर उपचारासाठी ते २०१० मध्ये भारतात परतले. डोळस यांची भजनी मंडळाच्या माध्यमातून २०१८ मध्ये दीपक खडके याच्याशी ओळख झाली. खडके याने डोळस दांपत्याची वेदिका पंढरपूरकर या महिलेशी ओळख करून दिली. वेदिका ही ‘शंकर बाबांची लेक’ असून तिच्या अंगात शंकर बाबा येतात, असे सांगण्यात आले. ती सर्व समस्या सोडवेल, मुलींचे आजार बरे करेल, अशी खात्री या दांपत्याला देण्यात आली.

भोंदू महिलेने डोळस दांपत्याचा विश्वास संपादन करून त्यांची पूर्ण माहिती घेतली. ‘तुमच्या मुलींचा आजार तुमच्या संपत्तीमुळे आहे. ही संपत्ती विकली तरच त्या बऱ्या होतील,’ असे सांगितले.महिलेच्या सांगण्यावरून डोळस दांपत्याने इंग्लंडमधील ड्युप्लेक्स घर, फार्महाऊस, कोकण आणि सासवडमधील शेतजमीन विकून सुमारे १३ कोटी २० लाख रुपये त्या महिलेच्या खात्यात वर्ग केले. इतकी मोठी रक्कम दिल्यानंतरही मुलींच्या आरोग्यात कोणतीही सुधारणा झाली नाही. मात्र, तीन वर्षे उलटूनही मुलींची तब्येत बरी झाली नाही. अखेर दांपत्याला हे सर्व एक फसवणुकीचे जाळे असल्याचे लक्षात आले. त्यांनी थेट पुणे पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांच्याकडे तक्रार दिली. कोथरूड पोलिस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल केला असून, पुढील तपास पोलिस निरीक्षक अनिल माने करत आहेत.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×