Breking News
कारवाईची भीती दाखवून पावणेपाच लाखांची फसवणूकग्रीन कॉरिडॉरमुळे दात्याचे फुफ्फुस वेळेत डीपीयू सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये; ५०वे हृदय-फुफ्फुस प्रत्यारोपण यशस्वीस्वारगेट परिसरात बेशिस्त रिक्षाचालकांवर कारवाईचा बडगावादातून सोसायटीतील वाहने पेटवून देणारा गजाआडउपाहारगृहातील रोखपालाकडून रोकड लंपासमुंबई-बंगळुरू बाह्यवळण मार्गावर वाहनावर ट्रक आदळून चालकाचा मृत्यूकात्रज चौकात डंपरच्या धडकेत ज्येष्ठ महिलेचा मृत्यूवैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयाला स्वायतत्ता देण्यासाठी समिती स्थापनफुकट गोवऱ्या-लाकडे दिल्याच्या रागातून स्मशानभूमीतील कर्मचाऱ्यावर सत्तूरने हल्लापंडित दीनदयाल उपाध्याय रोजगार मेळाव्याचे आयोजन

हडपसरमध्ये मजुरांच्या वसाहतीत आग

हडपसरमध्ये मजुरांच्या वसाहतीत आग

१९ झोपड्या भस्मसात

marathinews24.com

पुणे – शहरातील हडपसर भागातील राममनोहर लाेहिया उद्यानाजवळ असलेल्या मजुरांच्या वसाहतीत शनिवारी मध्यरात्री आग लागली. आगीत १९ झोपड्या, तसेच तीन दुचाकी भस्मसात झाल्या. आग लागल्यानंतर मजूर, तसेच कुटुंबीय बाहेर पडल्याने मोठी दुर्घटना टळली. अग्निशमन दलाच्या जवानांनी अथक प्रयत्नानंतर आग आटोक्यात आणली. सुदैवाने या घटनेत कोणी जखमी झाले नाही. आगीमागचे कारण समजू शकले नाही.

स्वतः कटींगचे दुकान सुरु केल्याने केले तरूणाचा खून; तिघांना अटक – सविस्तर बातमी 

पुणे-सोलापूर रस्त्यावर राममनोहर लोहिया उद्याना आहे. उद्यानाच्या मागील बाजूस मजुरांची वसाहत आहे. मध्यरात्री अडीचच्या सुमारास वसाहतीतील एका झोपडीला आग लागली. झोपड्या तात्पुरत्या स्वरुपात बांबू आणि पत्र्याचा वापर करुन बांधण्यात आल्या आहेत. गृहोपयोगी साहित्याने पेट घेतल्यानंतर आग भडकली. आग भडकल्यानंतर शेजारी असलेल्या झोपड्यांनी पेट घेतला. आग लागलात वसाहतीतील मजूर आणि कुटुंबीय बाहेर पडल्याने मोठी दुर्घटना टळली. आग लागल्याची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे पाच बंब, टँकर घटनास्थळी दाखल झाले. आग भढकल्याने जवानांनी चहुबाजूंनी पाण्याचा मारा सुरू केला. दोन तासांच्या अथक प्रयत्नानंतर आग आटोक्यात आणण्यात यश आले.

आगीत १९ झोपड्या भस्मसात झाल्या, तसेच तीन दुचाकीही जळल्या. आगीत कपडे, धान्य, तसेच अन्य साहित्य जळाले. मध्यरात्री आग लागल्याने मोठी दुर्घटना घडण्याची शक्यता होती. मात्र, प्रसंंगावधान राखून मजूर आणि कुटुंबीय बाहेर पडल्याने मोठी दुर्घटना टळली. अग्निशमन अधिकारी प्रमोद सोनवणे, विलास दडस यांच्या मार्गदर्शनाखाली जवानांनी पाण्याचा मारा करुन आग आटोक्यात आणली.
हडपसरमधील राम मनोहर लोहिता उद्यानाजवळ तात्पुरत्या स्वरुपात झोपड्या उभारण्यात आल्या आहेत. या भागात राहणारे मजूर आणि कुटुंबीयांचे हातावर पोट आहे. आग लागल्यानंतर त्वरीत वसाहतीत सर्वजण बाहेर पडल्याने गंभीर दुर्घटना टळली. आगीत गृहोपयोगी साहित्य जळाल्याने मजुरांच्या कुटुंबीयांना अश्रृ अनावर झाले.

बोपोडीत भंगार मालाच्या दुकानात आग

बोपोडीतील छाजेड पेट्रोल पंपाजवळ असलेल्या भंगार मालाच्या दुकानाला शनिवारी पहाटे आग लागली. आग लागल्याची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी दाखल झाले. जवानांनी पाण्याचा मारा करुन आग आटोक्यात आणली. आगीत कोणी जखमी झाले नाही, अशी माहिती अग्निशमन दलाकडून देण्यात आली. उन्हाळा सुरू झाल्यानंतर आग लागण्याच्या घटना वाढतात. उष्णतेमुळे आग भडकते. शाॅर्टसर्किटमुळे आग लागण्याच्या घटना घडतात, अशी माहिती अग्निशमन दलाकडून देण्यात आली.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 403
  • Message : The request cannot be completed because you have exceeded your quota.
error: Content is protected !!
Scroll to Top
×