Breking News
मोशी कचरा डेपो दुर्घटना : इमारती भोवतालचा मलबा हटवून इमारतीत सुरक्षित प्रवेश मार्ग तयार करण्याच्या कामाला सुरुवातमोशी इमारत दुर्घटना: प्राथमिक पाहणीनुसार संतृप्त घनकचऱ्याच्या आडव्या दाबामुळे इमारत उलटल्याचा अंदाज‘पुनीत बालन ग्रुप’कडून आषाढी वारीतील पोलिसांना ९ हजार जीवनावश्यक वस्तूंचे किटपुण्यातून पालखी प्रस्थान सोहळ्यानिमित्त मध्यरात्रीनंतर वाहतूकीत बदलपुण्यात डाॅक्टरांकडे ५० हजारांची खंडणीची मागणीविवाहाच्या आमिषाने तरुणीवर बलात्कारमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत ‘पंढरपूर वारी आणि संतांच्या पाऊलखुणा’ माहितीपटाचा प्रीमियर‘विठू माऊली’ कार्यक्रमातून दुमदुमणार हरिनामाचा गजरपुण्यातील त्या कर्तव्यदक्ष उपनिरीक्षकाचे निलंबन मागेमोशी कचरा डेपो दुर्घटना : आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी इमारतीत अडकलेल्या नागरिकांच्या नातेवाईकांशी साधला संवाद

आधी मोबाइल हिसकावला, मग बँकखाते केले रिकामे

आधी मोबाइल हिसकावला, मग बँकखाते केले रिकामे

कोथरूडमधील घटना, युपीआयद्वारेही रक्कम काढली

marathinews24.com

पुणे – रस्त्याने पायी चाललेल्या तरूणाच्या हातातील मोबाइल दुचाकीस्वार चोरट्याने हिसकावून नेल्यानंतर युपीआयद्वारे बँकेतून तब्बल ६७ हजार रूपये काढून घेतले. त्यानंतर संबंधित मोबाइलधारकाच्या मित्राला त्याच क्रमांकाद्वारे व्हॉटसअ‍ॅपद्वारे पैशांची मागणी केली. त्याच्याकडून २५ हजार रूपये उकळून फसवणूक केली आहे. त्यामुळे नागरिकांनो तुमचा मोबाइल हरवल्यास, हिसकावून नेल्यास तत्काळ पोलीस ठाण्यात धाव घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

प्रवाशांकडून ५ लाखांच्या खंडणीची प्रयत्न; महामार्ग वाहतूक पोलिसांसह ५ जण अटकेत – सविस्तर बातमी 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार तरूण कोथरूडमधील एरंडवण्यात राहायला असून, ५ जुलैला रात्री साडेअकराच्या सुमारास पौड फाटा पुलाखालून रस्त्याने पायी जात होता. त्यावेळी दुचाकीवरून आलेल्या एका चोरट्याने तरूणाच्या हातातील १० हजारांचा मोबाइल हिसकावून नेला. त्यानंतर काही वेळानंतर चोरट्याने युपीआयद्वारे बँकखात्यातून तब्बल ६७ हजार रूपये काढून घेतले. त्यानंतर त्याने तक्रारदाराच्या मित्राला व्हॉटसअ‍ॅपद्वारे संपर्क साधून पैशांची मागणी केली. त्यानेही काही वेळातच २५ हजार रूपये पाठवले. अशा पद्धतीने चोरट्याने तरूणाला गंडा घातला आहे. याप्रकरणी सहायक पोलीस निरीक्षक घुले तपास करीत आहेत.

नागरिकांनो, पासवर्ड सेव्ह करू नका

नागरिकांनो तुमच्या फोन पे, गुगल पे खात्यांचा गोपनीय क्रमांक फोनक्रमांक लीस्टमध्ये जतन करू नका. अन्यथा, तुमचा मोबाइल चोरीला गेल्यास, गहाळ झाल्यास मोठ्या प्रमाणात आर्थिंक फटका सहन करावा लागू शकतो. तसेच नातलग, मित्रांकडून पैशांच्या मागणीसाठी आलेल्या मेसेजवर लगेचच विश्वास ठेउ नका. त्यासंदर्भात खातरजमा झाल्याशिवाय कोणालाही रक्कम वर्ग न करण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे.

टिंबरमार्केटमध्ये तरूणाचा मोबाइल हिसकावला

बसची वाट पाहत थांबलेल्या तरूणाच्या हातातून ५० हजार रूपयांचा मोबाइल दुचाकीस्वार चोरट्यांनी चोरून नेला. ही घटना ४ जुलैला पहाटे सव्वा तीनच्या सुमारास टिंबरमार्र्वेâटमधील रामोशी गेटजवळ घडली आहे. याप्रकरणी घोरपडीत राहणार्‍या ३४ वर्षीय तरूणाने खडक पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. त्यानुसार तिघा दुचाकीस्वार चोरट्यांविरूद्ध खडक पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. पोलीस उपनिरीक्षक अशोक खाडे तपास करीत आहेत.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×