रीलस्टार तरुणावरील खुनी हल्ला प्रकरण
marathinews24.com
पुणे – शहरातील मध्यवर्ती डेक्कन परिसरात असलेल्या फ्लाईंग जिप्सी कॅफे मालकाने सातत्याने नियमांचे उल्लंघन केले आहे. त्यांच्या चुकांचे समर्थन केले जाणार नसून, संबंधित कॅफे मालकाविरूद्ध कठोर कारवाई करून त्याला वठणीवर आणणार असल्याची माहिती पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी दिली आहे. जो कोणी चुकेल त्याला शिक्षा भोगवीच लागणार असा गर्भित इशाराही त्यांनी दिला आहे.
मेफेड्रॉन तस्करांना बेड्या, २२ लाखांचे ड्रग्ज जप्त – सविस्तर बातमी
फ्लाईंग जिप्सी कॅफे मालकाकडून वारंवार पोलिसांच्या आदेशाचे उल्लंघन केले जात आहे. त्यातच १५ ऑगस्टला पहाटे पावणेचार वाजेपर्यंत कॅफे उघडे ठेउन त्याने पोलिसांवर शिरजोरी केली. त्यावेळी दोन रिलस्टार गटात झालेल्या वादातून तरूणाच्या डोक्यात कोयत्याने वार केल्याची घटना घडली. याप्रकरणी उशिरा जाग आलेल्या डेक्कन पोलिसांनी धाव घेत, संबंधित रिलस्टारसह तिघांना अटक केली. मात्र, कॅफे चालकावर कारवाई केली नाही. दरम्यान, राजकीय वरदहस्त लाभल्याच्या अविभार्वात वावणार्या कॅफे मालकाविरूद्ध महापालिका प्रशासन, एफडीए, पोलिस धजवत नसल्याचे दिसून आले आहे.
स्थानिकांच्या तक्रारींकडे दुर्लक्ष
फर्ग्युसन रस्ता परिसरात असलेल्या फ्लाईंग जिप्सी कॅफेविरूद्ध स्थानिक नागरिकांनी वारंवार तक्रारी दाखल केल्या आहेत. तरूणाईचा गोंधळ, आरडाओरडा, मद्यपींचा धिंगाण्याचे व्हिडिओ पोलिसांना स्थानिकांनी दिले आहेत. मात्र, त्याकडे सर्रासपणे दुर्लक्ष केले जात असल्याचा आरोप केला आहे. दरम्यान, घरातच कॅफे उघडून महापालिकेच्या नियमांचे उल्लंघन करणे, आस्थापना विहीत वेळेपेक्षा जास्त वेळ सुरू ठेवणे, रात्रगस्तीवर असलेल्या डेक्कन पोलिसांसह वरिष्ठ अधिकार्यांच्या राउंडला दाद न देणे असे प्रकार कॅफे मालकाकडून केले जात आहेत. यापुर्वीही त्याच्याविरूद्ध अनेक गुन्ह्यांची नोद असून त्याला वठणीवर आणून धडा शिकवणार असल्याची माहिती पोलीस आयुक्तांनी दिली आहे





















