Breking News
आवडते काय आणि येते काय, यातील फरक ओळखा-ज्येष्ठ अभिनेते प्रशांत दामलेआमदार संजय गायकवाडांविरोधात गुन्ह्याच्या मागणीसाठी रोहित पवारांचा कोथरूड ठाण्यात ठिय्याधर्मादाय आयुक्तांची परवानगी न घेता संस्थेची ५० कोटींची जमीन तारणदिशाहीन नियोजन व एफएसआय’च्या अनिर्बंध अतार्किक मंजुऱ्यां मुळे ‘पुणे वाहतुक कोंडीच्या’ संकटात…!भरती परीक्षा सुधारणांसाठी शनिवारी पुण्यात सल्लामसलतजिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांच्या अध्यक्षतेखाली चाकण एमआयडीसी परिसरातील पायाभूत सुविधा समितीची बैठक संपन्नएमडी विक्रीच्या तयारीतील त्रिकुटाला बेड्यागणेश विसर्जन मिरवणुकांमधून तंबाखू व अंमली पदार्थ विरोधी जनजागृती अभियान राबवावे- ज्योती कदमपुण्यातील सराईतांना दणका, २२ जण तडीपारपुण्यात गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर दोन सराईत तडीपार

पुण्यात गणेशोत्सवात चार बेस-चार टॉप फॉर्म्युल्याची चाचपणी

पुण्यात गणेशोत्सवात चार बेस-चार टॉप फॉर्म्युल्याची चाचपणी

बहुतांश गणेश मंडळांची संमती

marathinews24.com

पुणे – गणेशोत्सवासह दहीहंडीमध्ये डीजे वादनावर तोडगा निघण्याची शक्यता निर्माण झाली आहे. ‘चार बेस-चार टॉप’च्या पर्यायावर बहुतांश गणेश मंडळांनी पोलीस प्रशासनाकडे संमती दर्शवली आहे. मात्र, ध्वनी प्रदूषणाला कारणीभूत ठरणाऱ्या प्लाझमा आणि प्रेशर मीडसारख्या अतितीव्र आवाजाच्या उपकरणांवर बंदी कायम ठेवण्यात आली आहे. चार बेस आणि चार टॉपची ध्वनीयंत्रणा वापरण्याबाबत पोलीस आणि गणेश मंडळांच्या प्रतिनिधींमध्ये चर्चा सुरू आहे. ८० टक्के मंडळांनी या पर्यायाला सकारात्मक प्रतिसाद दिला आहे.

पुण्यातील कुख्यात गुंड सुरज ठोंबरे टोळीविरूद्ध मोक्का – सविस्तर बातमी 

गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर डीजे वादन आणि ध्वनी प्रदूषणमुळे गणेश मंडळे, राजकीय पदाधिकारी, पोलीस प्रशासनामध्ये घमासान सुरू आहे. कर्णकर्कश आवाजामुळे नागरिकांना होणारा त्रास लक्षात घेता पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी डीजेच्या आवाजावर निर्बंध घालण्याची भूमिका घेतली आहे. दुसरीकडे, गणेश मंडळांकडून उत्सव निर्बंधमुक्त वातावरणात साजरा करण्याची मागणी होत आहे. या पार्श्वभूमीवर पोलिस प्रशासनाकडून गणेश मंडळांच्या प्रतिनिधींसोबत बैठका घेण्यात येत आहेत. सुरुवातीला दोन बेस आणि दोन टॉपची ध्वनीयंत्रणा वापरण्याचा प्रस्ताव पोलिसांकडून मांडला होता. मात्र, मंडळांच्या प्रतिनिधींनी चार टॉप आणि चार बेसचा पर्याय सुचविला आहे. या पर्यायावर आता प्रशासनाकडून चर्चा सुरू असून, त्यातून सर्वमान्य तोडगा काढण्याचे प्रयत्न आहेत.

विशेषतः प्लाझ्मा आणि प्रेशर मीड यांसारख्या उपकरणांमुळे मोठ्या प्रमाणात आवाज निर्माण होतो. त्यामुळे अशा उपकरणांच्या वापराला परवानगी दिली जाणार नसल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे. या भूमिकेला गणेश मंडळांकडूनही सकारात्मक प्रतिसाद मिळत आहे.चर्चेतून अंतिम निर्णयाची शक्यता आहे. चार बेस आणि चार टॉपच्या पर्यायाला बहुतांश मंडळांनी पसंती दर्शविल्याने याच ध्वनीयंत्रणेवर अंतिम निर्णय होण्याची शक्यता आहे. ८० टक्के मंडळे या पर्यायाच्या बाजूने असल्याने उर्वरित मंडळांशी चर्चा करून सर्वमान्य नियमावली तयार करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. गणेशोत्सवापूर्वी ध्वनीयंत्रणेबाबत स्पष्ट नियम जाहीर होण्याची शक्यता आहे.

ईद-ए-मिलादच्या मिरवणुकीत नियमांचे उल्लंघन; ६ साऊंड सिस्टीम जप्त

ईद-ए-मिलादच्या मिरवणुकीत चार बेस आणि चार टॉपपेक्षा अधिक ध्वनीयंत्रणा वापरणाऱ्यांवर पोलिसांनी कारवाई केली. तसेच प्लाझ्मा आणि प्रेशर मीडचा वापर केलेल्या ६ साऊंड सिस्टीम जप्त केल्या आहेत. आवाजाच्या मर्यादेचे उल्लंघन केल्याप्रकरणी ११० पेक्षा अधिक ठिकाणी पोलिसांनी गुन्हे दाखल केले आहेत. त्यामुळे ‘चार बेस-चार टॉप’च्या पर्यायाला पोलिस प्रशासनाकडूनही एकप्रकारे पसंती मिळत असल्याचे चित्र आहे.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×