डेव्हलपमेंटसाठी दिलेल्या जमीन व्यवहारात फसवणूक

 ऑनलाइन टास्कच्या आमिषाने ३३ लाखांची फसवणूक

ज्येष्ठाची आत्महत्या; आरोपावरुन बांधकाम व्यावसायिकांवर गुन्हा

marathinews24.com

पुणे – विकसित करण्यासाठी दिलेल्या मिळकतीच्या व्यवहारात फसवणूक झाल्या प्रकरणात महावितरणमधील सेवानिवृत्त अधिकाऱ्याने नियोजित गृहप्रकल्पात सातव्या मजल्यावरुन उडी मारून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना बाणेर भागात घडली. ज्येष्ठाला आत्महत्येस प्रवृत्त केल्याच्या आरोपावरुन बांधकाम व्यावसायिकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. नरेश उमाकांत महाजन (वय ६९, रा. अंबरनाथ पूर्व, जि. ठाणे) असे आत्महत्या केलेल्या ज्येष्ठाचे नाव आहे. याबाबत महाजन यांचा मुलगा मयूर नरेश महाजन (वय ४१, रा. अंबरनाथ पूर्व, जि. ठाणे) यांनी बाणेर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

रास्ता पेठेत लूटमार करणारे चोरटे गजाआड – सविस्तर बातमी

महाजन यांना आत्महत्येस प्रवृत्त केल्याच्या आरोपावरुन बांधकाम व्यावसायिक जयंतीलाल ताराचंद ओसवाल (वय ५६) आणि रिषभ ओसवाल (वय ३०, दोघे रा. भवानी पेठ) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नरेश महाजन हे महावितरणमध्ये अधिकारी होते. त्यांनी बाणेरमध्ये जागा घेतली होती. सेवानिवृत्तीनंतर ते मुलांसह अंबरनाथ येथे रहात होते. त्यांनी बाणेर येथील जागा स्विटी असोसिएटसचे जयंतीलाल ओसवाल यांना विकसित करण्यासाठी दिली होती. महाजन यांनी विकसित केलेल्या जागेवर मान्य केलेल्या करार, तसेच अटी आणि शर्तीनुसार ओसवाल यांनी या मिळकतीमध्ये सदनिका देतो, असे सांगितले. मात्र, कराराचे पालन न करता त्यांना सदनिका दिली नाही. महाजन यांनी याबाबत विचारण केली.

फसवणुकीमुळे महाजन हे नैराश्यात होते. महाजन यांच्या जागेवर सात मजली गृहप्रकल्प साकारण्यात आला. गृहप्रकल्पाचे बांधकाम पूर्ण झाले आहे. गृहप्रकल्पातील अंतर्गत कामे सुरू आहेत. महाजन हे १६ फेब्रुवारी रोजी बाणेर येथील गृहप्रकल्पाच्या आवारात आले. त्यांनी कराराप्रमाणे सदनिका देण्याबाबत ओसवाल यांच्याकडे विचारणा केली. बांधकाम व्यावसायिकांनी महाजन यांना मानसिक त्रास देऊन धमकाविले. त्यानंतर ते नियोजित गृहप्रकल्पाच्या सातव्या मजल्यावर गेले. सातव्या मजल्यावरुन त्यांनी उडी मारुन आतम्हत्या केली, असे त्यांचा मुलगा मयूर याने फिर्यादीत म्हटले आहे. मयूर यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, बांधकाम व्यवासायिकांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. सहायक पोलीस निरीक्षक अनिल केकाण तपास करत आहेत.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×