Breking News
Caste Validity Certificate Pune : सेवा संकल्प अभियानांतर्गत जात वैधता प्रमाणपत्रासाठी विशेष शिबिरजिल्ह्यातील युवकांनी रोजगार मेळाव्यासह शासकीय योजनांचा लाभ घ्यावाPune Tax Fraud : पुण्यात ४ हजार ४२७ कोटींवर आयकर भरलाच नाहीBARTI Schemes Pune : ‘लोकसंवाद-२०२६’मधून बार्टीच्या योजनांची माहितीनांदेड सिटीतील आरोग्य शिबिरामध्ये ४०० जणांची तपासणीKoyta Case Pune : ऐन गणेशोत्सवात कोयता बाळगला, आरोपीला अटक‘सेवा संकल्प अभियान’च्या माध्यमातून आदिवासी बांधवांपर्यंत योजनांचा थेट लाभ पोहोचविण्याचा संकल्पPune Crime News : अटकेची भीती दाखवून ज्येष्ठाची १९ लाखांची फसवणूकखरेदीच्या बहाण्याने सराफी पेढीतून दागिने चोरीPune Cash Seizure : गणेशोत्सवात एकाकडे ४२ लाखांची रोकड सापडली

शेअर ट्रेडींगमधील गुंतवणूकीच्या नावाखाली फसवणूक

सायबर चोरट्यांकडून ज्येष्ठ महिलेची फसवणूक

पर्वती पोलीस ठाण्यात गुन्हा  दाखल

marathinews24.com

पुणे – शेअर ट्रेडींगमध्ये गुंतवणूक केल्यास चांगला परतावा मिळवून देतो, अशी बतावणी करीत सायबर चोरट्यांनी एकाला तब्बल ३५ लाख ७० हजारांचा ऑनलाईन गंडा घातला आहे. ही घटना ३१ मार्च ते ४ ऑक्टोबर २०२५ कालावधीत पर्वती परिसरात घडली आहे. याप्रकरणी ४५ वर्षीय नागरिकाने पर्वती पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. त्यानुसार मोबाइलधारक व लिंक धारकाविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

भेकराईनगरात टेम्पोच्या धडकेत दुचाकीस्वार ठार – सविस्तर बातमी  

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार हे पर्वती परिसरात राहायला असून, ३१ मार्चला सायबर चोरट्यांनी त्यांना व्हॉटसअ‍ॅपद्वारे लिंक पाठवली. त्याद्वारे शेअर मार्वेâटमध्ये गुंतवणूक केल्यास चांगला परतावा मिळवून देतो, अशी बतावणी केली. त्यानंतर सायबर चोरट्यांनी तक्रारदाराचा विश्वास संपादित करून त्यांना गुंतवणूकीला भाग पाडले. तब्बल ३५ लाख ७० हजार रूपये गुंतवणूक केल्यानंतरही त्यांना परतावा मिळाला नाही. फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर तक्रारदाराने पोलीस ठाण्यात धाव घेतली. याप्रकरणी पोलीस निरीक्षक अनिता हिवरकर तपास करीत आहेत.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×