Breking News
पुण्यात डिलिव्हरी बॉयला पिस्तूल लावून लुटलेजिल्हा परिषदेच्या ‘पुणे मॉडेल स्कूल’ उपक्रमाचा १४ जून रोजी शुभारंभप्रधानमंत्री धरती आबा जनभागीदारी अभियानामध्ये सहभागी होण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे आवाहनपोलीस आयुक्त कडाडले, बेशिस्तांना कायमस्वरूपी धडा शिकवणारपिंपरी चिंचवड परिवहन कार्यक्षेत्रातील 123 ऑटोरिक्षा स्टॅंण्डना मान्यतापुणे : टेम्पोच्या धडकेत पादचारी तरूण ठारएसटी प्रवासात महिलेचे ४ लाखांचे दागिने चोरीलातब्बल २ हजार ६५ लीटर गावठी दारू जप्तभांडण लावल्याची शंका, टोळक्याकडून तरूणावर वारस्वच्छतागृह साफसफाईला दिला नकार, अल्पवयीनाला जीवे मारण्याचा प्रयत्न

शेअरमध्ये गुंतवणुकीच्या आमिषाने ४७ लाखांची फसवणूक

शेअरमध्ये गुंतवणुकीच्या आमिषाने ४७ लाखांची फसवणूक

जास्त परतावा देण्याच्या आमिषाने सायबर चोरट्यांनी केली फसवणूक 

marathinews24.com

पुणे – शेअर बाजारात गुंतवणुकीच्या आमिषाने सायबर चोरट्यांनी कोथरूड भागातील महिलेची ४७ लाख ६८ हजार रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला..याबाबत महिलेने कोथरूड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

सोसायटीमधील ७ दुचाकी पेटविणारा सराइत अटकेत – सविस्तर बातमी 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार महिला कोथरूड भागात राहायला आहेत. सायबर चोरटयांनी त्यांच्या मोबाइल क्रमांकावर फेब्रुवारी महिन्यात संदेश पाठविला होता. शेअर बाजारात गुंतवणूक केल्यास चांगला परतावा मिळेल, असे आमिष चोरट्यांनी त्यांना दाखविले होते. महिलेने सुरुवातीला चोरट्यांच्या खात्यात काही रकम जमा केली. चोरट्यांनी त्यांच्या बँक खात्यात परताव्यापोटी रकम जमा केली. परताव्याची रकम मिळाल्याने महिलेचा विश्वास बसला.

त्यानंतर महिलेने गेल्या तीन ते चार महिन्यांत चोरट्यांच्या खात्यात वेळोवेळी रकम जमा केली. परतावा, तसेच गुंतविलेली रकम परत न देण्यात आल्याने महिलेने पोलीस ठाण्यात तक्रार दिली. गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक विक्रमसिंह जाधव तपास करत आहेत.

विवाहाच्या आमिषाने तरुणीची फसवणूक

विवाहाच्या आमिषाने चोरट्यांनी ८ लाख रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याबाबत तरुणाने सायबर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. तक्रारदार तरुणी येरवडा भागात राहायला आहेत. एका विवाहविषयक संकेतस्थळावर तिची चोरट्याशी ओळख झाली होती. चोरट्याने तिला जाळ्यात ओढले. त्यानंतर पुण्यात तरुणीला भेटायला येणार आहे, अशी बतावणी चोरट्याने केली.

बेकायदा काळ्या पैसे व्यवहारात पुणे विमानतळावर पकडण्यात आले असून, कारवाई न होण्यासाठी तातडीने पैसे जमा करावे लागणार आहेत, असे त्याने सांगितले. त्यानंतर तरुणीने त्याच्या बँक खात्यात वेळोवेळी आठ लाख ३५ हजार रुपये जमा केले. फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर तिने तक्रार दिली. वरिष्ठ पोलीस निरीक्षक देवकाते तपास करत आहेत.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 403
  • Message : The request cannot be completed because you have exceeded your quota.
error: Content is protected !!
Scroll to Top