Breking News
पुण्यातील नवी पेठेत महिलेचे मंगळसूत्र हिसकावले‘दगडूशेठ’ गणपती मंदिरात शेषनागाच्या प्रतिकृतीची पुष्पसजावटमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त सखी-सुखदाचा आनंदोत्सव उत्साहात साजरावेश्या व्यवसायाचा पर्दाफाश, दोघांविरूद्ध कारवाईपुण्यातही भोंदूबाबा खरातची पुनरावृत्ती, महिलेवर अत्याचारविशेष सखोल पुनरिक्षण कार्यक्रम प्रक्रिया शनिवारपासून सुरुसमाज कल्याण आयुक्त दीपा मुधोळ मुंडे यांच्या उपस्थितीत जिल्ह्यात नशामुक्त भारत अभियानाचा शुभारंभमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांच्या हस्ते पुणे- साईनगर शिर्डी एक्सप्रेस रेल्वेसेवेचा शुभारंभकल्याण रेल्वे यार्ड सुरक्षेसाठी अधिवेशनात उच्चस्तरीय बैठक‘एल निनो’च्या पार्श्वभूमीवर पशुपालकांनी चारा नियोजनाकडे विशेष लक्ष द्यावे

मनी लॉड्रींगच्या नावाखाली ९९ लाखांची फसवणूक

मनी लॉड्रींगच्या नावाखाली ९९ लाखांची फसवणूक

जेष्ठ महिलेची फसवणूक, सायबर चोरट्यांविरुद्ध गुन्हा

marathinews24.com

पुणे – मनी लॉड्रींग केल्याचा संशय असल्याची बतावणी करीत सायबर चोरट्यांनी एका जेष्ठ महिलेची तब्बल ९९ लाखांची फसवणूक केली आहे. ही घटना ३० ते ३१ ऑक्टोबरला घडली आहे. याप्रकरणी महिलेने दिलेल्या तक्रारीनुसार मोबाइलधारक, टेलीग्रामधारकाविरूद्ध सायबर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मतिमंद मुलीशी अश्लील कृत्य करणाऱ्या ज्येष्ठाविरुद्ध गुन्हा – सविस्तर बातमी 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार जेष्ठ महिलेला सायबर चोरट्यांनी ३० ऑक्टोबरला फोन केला. तुमच्या बँकखात्यातून मनी लॉड्रींग केल्याचा संशय असल्याची बतावणी सायबर चोरट्यांनी केली. त्यामुळे घाबरलेल्या महिलेने त्यांच्यासोबत संवाद केला. त्यावेळी सायबर चोरट्यांनी त्यांना बँकखात्याची चौकशी करावी लागेल असे सांगितले. महिलेचा विश्वास संपादित केल्यानंतर अवघ्या दोन दिवसांतच सायबर चोरट्यांनी महिलेच्या बँकखात्यातील तब्बल ९९ लाख रूपये ऑनलाईनरित्या वर्ग करून घेतले. फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर महिलेने सायबर पोलीस ठाणे गाठून तक्रार दाखल केली आहे. याप्रकरणी पोलीस निरीक्षक संगीता देवकाते तपास करीत आहेत.

जेष्ठाचीही ९९ लाखांची फसवणूकीची घटना ताजी

दहशतवादी संघटनेशी संबंध असल्याची भीती दाखवून सायबर चोरट्यांनी ज्येष्ठ नागरिकाची ९९ लाख रुपयांची फसवणूक केल्याची घटना नुकतीच घडली आहे. याप्रकरणी सायबर चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तक्रारदार ७३ वर्षीय ज्येष्ठ नागरिक हे कसबा पेठेतील मेट्रो स्थानक परिसरात राहायला असून, ते सेवानिवृत्त आहेत. सायबर चोरट्यांनी त्यांच्या मोबाइल क्रमांकावर ३ ऑक्टोबरला संपर्क साधला. दहशतवादी संघटनेशी संबंध असल्याची भीती त्यांना दाखविली. दहशतवादी कारवायांशी बँक खात्यातून पैसे पाठविण्यात आल्याची बतावणी करुन याप्रकरणात अटक केली जाण्याची शक्यता आहे, अशी भीती दाखवून चोरट्यांनी त्यांना तातडीने पैसे जमा करण्यास भाग पाडले.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×