Breking News
किरकोळ वादातून केला मित्राचा खून‘वारकरी भक्तीयोग’ कार्यक्रम यशस्वी करण्याकरीता सर्वांनी पुढाकार घ्यावा-उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटीलपुण्यात मेफेड्रॉनचे रॅकेट चालविणार्‍या आक्काला बेड्यापालखी सोहळ्यात ‘एआय’ तंत्रज्ञानाचा वापर करणारतब्बल १५० पेक्षा जास्त घरफोडी केलेल्या सराईताला अटकउपमुख्यमंत्री अजित पवार यांची कुंडमळा दुर्घटनास्थळी भेटखरेदीच्या बहाण्याने दागिने लांबविणारी टोळी सक्रीयजिल्हाधिकारी जितेंद्र डूडी यांनी घेतला जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाच्या कामकाजाचा आढावातरूणाला जीवे मारण्याची दिली धमकी, १५ लाखांची खंडणीची मागणीफ्लॅटचे कुलूप तोडून सव्वा लाखांचा ऐवज लांबविला

किरकोळ वादातून केला मित्राचा खून

तरुणाच्या डोक्यात दगड मारून खून

सिंहगड रस्ता परिसरातील घटना

marathinews24.com

पुणे – किरकोळ वादातून मित्रावर चाकूने वार करुन खून करण्यात आल्याची घटना सिंहगड रस्ता परिसरात मंगळवारी सायंकाळी घडली. खून करुन पसार झालेल्या आरोपीविरुद्ध सिंहगड रस्ता पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. राजू दादू आरु (वय ४२, रा. गोंदवले नाका, श्रीरामपूर, जि. अहिल्यानगर) असे खून झालेल्याचे नाव आहे.

पुण्यात मेफेड्रॉनचे रॅकेट चालविणार्‍या आक्काला बेड्या – सविस्तर बातमी

याप्रकरणी अनिल अशोक जाधव (वय ३८, सध्या रा. गायकवाड बिल्डींग, नऱ्हे, मूळ रा. श्रीरामपूर) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. पसार झालेल्या आरोपीचा पोलिसांकडून शोध घेण्यात येत असल्याची माहिती सिंहगड रस्ता पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दिलीप दाईंगडे यांनी सांगिले.

आरोपी अनिल हा चालक म्हणून नाेकरी करतो. राजू हा उपाहारृहात कामाला होता. अनिल आणि राजू हे मित्र असून, मंगळवारी दोघेही भेटल्यानंतर सायंकाळी पाचच्या सुमारास त्यांच्यात वाद झाला. रागातून अनिलने राजूच्या डाेक्यात लोखंडी बादली घातली. त्यानंतर त्याच्यावर चाकूने वार केले. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. त्याला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचारांपूर्वीच त्याचा मृत्यू झाला होता. अनिल आणि राजू यांच्यात झालेल्या वादामागचे कारण समजू शकले नाही.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 403
  • Message : The request cannot be completed because you have exceeded your quota.
error: Content is protected !!
Scroll to Top